गरोदरपणात अंडी खाणे

0 13
गरोदरपणात अंडी खाणे

गरोदरपणात स्त्रीच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कारण त्याचा थेट परिणाम बाळाच्या विकासावर होतोपौष्टिक आहार घेणे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेअंड्यामध्ये प्रथिने आणि इतर पौष्टिक पदार्थ भरपूर प्रमाणात असतातआहारात समावेश करण्यासाठी अंडी हा उत्तम पर्याय आहेतथापिगर्भवती महिलांसाठी अंडे खाणे सुरक्षित आहे कायगरोदरपणात अंडी खाण्याचे फायदे तसेच त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात हे जाणून घेऊयात.

गरोदर स्त्री अंडी खाऊ शकते का?

” गरोदरपणात अंडी खाणे योग्य आहे का?”अनेक गरोदर स्त्रियांना असा प्रश्न पडत असेलतर ह्या प्रश्नाचे उत्तर हो असे आहेमात्र अंडी खाण्याआधी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहेअंड्यांमध्ये खनिजद्रव्येजीवनसत्वे आणि चांगली चरबी असतेगरोदरपणात अंडी खाल्ल्याने आईला आणि बाळाला आवश्यक पोषणमूल्यांचा पुरवठा होतोगरोदरपणात कच्ची किंवा न उकडलेली अंडी खाण्यापेक्षा उकडलेली अंडी खाण्याचा सल्ला दिला जातोकारण त्यामुळे अंड्यांमधील हानिकारक जिवाणू नष्ट होऊ शकतातअंडी खरेदी करताना ती फ्रेश असल्याची खात्री करात्यासाठी पॅक केल्याची तारीख पडताळून पहाअंडी घेताना स्वच्छ ठिकाणाहूनच खरेदी करा.

अंडी खाण्याचे फायदे

अंडी पोषक मूल्यांनी भरलेली असतात आणि आवश्यक पौष्टिक पदार्थांचा समृद्ध स्त्रोत असतातखाली नमूद केलेले मुद्दे गर्भधारणेदरम्यान अंडी खाण्याचे महत्त्व अधोरेखित करतात

प्रथिनांचे जास्त प्रमाण

प्रथिने म्हणजे पेशींचे बिल्डिंग ब्लॉक्स समजले जातात आणि बाळाच्या विकासात मदत करतातयोग्य प्रमाणात अंडी खाल्याने बाळाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक असलेली प्रथिने मिळतात.

मेंदूचा विकास

अंड्यांमध्ये कोलिन असते आणि ते मेंदूच्या वाढीसाठी आणि विकासासाठी महत्वाचे असतेस्पिना बायफिडा आणि अनेनसिफली ह्या रोगांपासून बाळाचे संरक्षण होते.

ऊर्जेचा चांगला स्रोत

एका अंड्यापासून ७० कॅलरीज मिळतातबाळाच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यक असणारी ऊर्जा ह्यातून मिळते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते

अंडी खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होतेपरंतु स्त्रियांनी फक्त अंड्याचा पांढरा भाग खाल्ला पाहिजेजर आधीच कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर गरोदरपणात पिवळा बलक खाणे टाळावे.

डीके ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात

अंड्यांमध्ये ही चार फॅट सोल्युबल व्हीटॅमीन्स असतातविशेषकरून व्हिटॅमिन ए हे लागणारे पोषकमूल्य आहेते गरोदरपणात बाळाच्या वाढीस आणि विकासास मदत करतेह्यामध्ये फुप्फुसेकिडनीहृदय आणि इतर अवयवांचा समावेश होतो.

इतर पोषणमूल्ये

अंड्यांमध्ये ल्युटीन आणि झियाझानथिन नावाची अँटीऑक्सडान्टस असतात आणि ही अँटिऑक्सिडंट्स डोळे आणि चांगली दृष्टी ह्यासाठी आवश्यक असताततसेचअंड्यांमुळे व्हिटॅमिन डी.व्हिटॅमिन बी १२ तसेच व्हिटॅमिन ब २ सुद्धा मिळते.

गरोदरपणात अंडी खाण्याचे धोके

गरोदर स्त्रीसाठी अंडी म्हणजे पोषकमूल्यांचा समृद्ध स्रोत आहेत योग्य काळजी न घेता गरोदरपणात अंडी खाल्ली तर त्याचे धोके सुद्धा आहेत.

साल्मोनेला विषबाधा

कच्च्या आणि न शिजवलेल्या अंड्यांमध्ये साल्मोनेला नावाचे जिवाणू असतातह्या जिवाणूंमुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते आणि त्यामुळे उलट्याजुलाबतापडोकेदुखीपोटदुखी आणि निर्जलीकरण होऊ शकतेकाही वेळा ही लक्षणे गंभीर असतात आणि त्यामुळे अकाली प्रसूती किंवा गर्भपात सुद्धा होऊ शकतोह्या स्थितीला सालमोनेला पॉयझनिंग असे म्हणतात.

इतर धोके

ज्या स्त्रियांमध्ये आधी कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते अशा स्त्रियांमध्ये अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने समस्या निर्माण होऊ शकतातअंडी खाल्ल्याने स्किन रॅशनाक चोंदणेपित्ताच्या गाठी इत्यादी त्रास होऊ शकतात.

गर्भवती स्त्री किती अंडी खाऊ शकते?

कोलेस्टेरॉलची पातळी किती आहे त्यानुसार दिवसाला एक किंवा दोन अंडी खाण्याचा सल्ला दिला जातोएका अंड्यामध्ये साधारणपणे १८५ मिग्रॅ कोलेस्टेरॉल असते आणि शरीराला दिवसाला ३०० मिग्रॅ कोलेस्टेरॉलची गरज असतेजर कोलेस्टेरॉलचे प्रमाण शरीरात आधीच जास्त असेल तर दररोज एक अंडे खाल्ल्याने समस्या निर्माण होऊ शकतातदररोज किती अंडी खावीत हे तुमच्या आहारातील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावर सुद्धा अवलंबून असतेमहिन्याला २० अंड्यांपेक्षा कमी अंडी खाणे हे सर्वात सुरक्षित मानले जातेबऱ्याच डॉक्टरांच्या मते गरोदर स्त्रियांनी फक्त अंड्याच्या पांढरा भाग खाणे चांगले.

चांगली अंडी कशी निवडून घ्यावीत?

अंडी निवडताना ती स्वच्छ जागेत ठेवली आहेत ना ते आधी पहाबऱ्याच देशांमध्ये अंडी खाण्यायोग्य आणि जिवाणूविरहित असल्याचा सर्टिफिकेशन मार्क असतोइतर अन्नपदार्थ खरेदी करताना सुद्धा अंडे असलेले खाद्यपदार्थ टाळा कारण त्यामध्ये घातलेल्या अंड्यांचा स्रोत तुम्हाला माहिती नसतो.

अंडी साठवून ठेवण्याचा योग्य मार्ग कोणता?

अंडी सालमोनेला विरहीत राहण्यासाठी त्यांना नीट साठवून ठेवणे महत्वाचे आहे.

  • अंडी नेहमी फ्रिज मध्ये ठेवात्यामुळे अंडी खराब होण्याची शक्यता कमी होते
  • इतर अन्नपदार्थांपासून अंडी दूर ठेवाविकत घेताना अंडी ज्या बॉक्स मध्ये असतात त्यातून काढून वेगळ्या बॉक्स मध्ये ठेवा
  • उकडलेली अंडी तीन दिवसात खाऊन संपवा
  • कवच खराब असलेली अंडी टाळा कारण त्यामध्ये घाण आणि जिवाणू असण्याची शक्यता असते
  • अंडी वापरण्याच्या तारखेवर लक्ष ठेवा आणि ती टळून तर गेलेली नाही ना ते पहा

अंडी कशी शिजवावीत?

गरोदरपणात सुद्धा अंडे शिजवण्याची पद्दत आपण नेहमी करतो तशीच असतेह्यामध्ये मूळ उद्धेश साल्मोनेला हा जिवाणू शिजवण्याच्या प्रक्रियेत मारला जातो हा आहे.

अंडे शिजवण्यासाठीअंडे पाच ते सात मिनिटांसाठी पाण्यात उकळून घ्याकिंवा तुम्ही अंडे दोन्ही बाजूनी भाजून घेऊ शकताअंड्याचा बलक पूर्णपणे घट्ट झाला पाहिजेह्या प्रक्रियेला साधारणपणे ५ मिनिटे लागतातअंडे असलेले अन्नपदार्थ खाताना विशेष काळजी घेतली पाहिजे तसेच तो पदार्थ घरीच केलेला असला पाहिजे.

अंडी किती काळापर्यंत टिकतात?

अंडे घातल्यापासून ते २८ दिवसांच्या आत खाल्ले पाहिजेउकडलेली अंडी उकडल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये खाल्ली पाहिजेतअंडी घातलेले अन्नपदार्थ ताबडतोब खाल्ले पाहिजेत.

अंडी खाताना जिवाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी काही सूचना

  • अंडी हाताळताना हात आधी नीट स्वच्छ धुतलेले हवेत
  • कच्च्या अंड्याचे शिंतोडे इतर भांड्यांवर आणि अन्नपदार्थांवर उडू नयेत ह्याची काळजी घ्या
  • गरम पाण्याने आणि साबणाने धुतलेली भांडी वापरा
  • अंड्यानं तडा गेलेला असो किंवा नसो अंडी इतर अन्नपदार्थांसोबत ठेवू नका
  • अंडी शिजवून झाल्यानंतर भांडीकिचन ओटा आणि आजूबाजूच्या गोष्टी गरम साबणाच्या पाण्याने स्वच्छ करा

अगदी सहज उपलब्ध असलेला प्रथिनांचा स्रोत म्हणजेच अंडी हा गरोदरपणातील आहारात समावेश करण्यासाठी उत्तम पदार्थ आहेवरील मुद्द्यांचा विचार करून अंड्यांचा तुमच्या जेवणात समावेश करा आणि पौष्टिकता वाढवा.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User