तुमच्या १२ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

0 101
तुमच्या १२ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या कदाचित लक्षात आले असेल की प्रत्येक महिन्याला किंबहुना प्रत्येक आठवड्याला तुमच्या बाळाच्या शरीरात खूप बदल होत असतातबाळाची शारीरिक वाढ आणि विकासाच्या दृष्टीने ही खूप अचंबित करणारी प्रक्रिया आहेतुमचे बाळ आता इकडे तिकडे दुडूदुडू धावू लागतेत्यांची संपूर्ण स्वरक्षमता वापरून ते आई‘ अशी हाक मारूलागेलजर बाळ अजूनही रांगत असेल तर काळजी करण्याचे काहीही कारण नाहीतुमचे बाळ लवकरच चालायला लागेल आणि धावू लागेल.

बाळाची वाढ

बाळाची वाढ

तुमच्या बाळाची शारीरिक वाढ होताना बाळाचा स्वतःचा वेग असेल आणि प्रत्येक महिन्याला तुमच्यासाठी नवीन आश्चर्य बाळ घेऊन येणार आहे आणि नवीन गोष्टींची तुम्ही वाट पाहणार आहात.

बाळाचा विकास

तुमचे बाळ विकासाच्या १२ महिन्यांच्या टप्प्यावर पोहोचले आहेह्या टप्प्यावर बाळाला मूलभूत सूचना समजतात आणि बाळ थोडेसे चालू शकतेबाळ कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतर ओळखीचे चेहरे ओळखू शकते तसेच आवडीच्या गोष्टींकडे आनंदाने बोट दाखवते.

बाळाची बडबड अखंड चालू राहते तसेच आजूबाजूच्या जगाचा बाळ अखंड शोध घेत राहतेआता आणखी विकासाचे टप्पे बाळ पार करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तयार रहा.


  • ४८ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमचे बाळ आता हळूहळू चालू लागले आहे आणि बाळामधील होणाऱ्या ह्या बदलांसाठी तुम्ही खूप उत्सुक आहातबाळाची बडबड आता नुसती बडबड राहिली नसून त्याचे अर्थपूर्ण शब्द आणि वाक्यांमध्ये रूपांतर झाले आहेबाळाचे रांगण्याचे रूपांतर छोटी छोटी पावले टाकण्यात झाले आहेतुमच्या ११ महिन्यांच्या बाळाकडून तुम्ही पुढील विकासाचे टप्पे अपेक्षित धरू शकतातुमचे बाळ चालू लागेल परंतु जवळ असणाऱ्या गोष्टींचा आधार घेऊन ते चालू लागेलजर त्यांना स्वतःहून चालायचे नसेल तरी सुद्धा हरकत नाहीबाळ लवकरच स्वतःचे स्वतः चालू लागेलबाळाचे बोबडे बोल आता लवकरच प्रश्न उत्तरे होतील आणि ते मोठ्या माणसांसारखे व्यक्त होणे असेल.

  • ४९ आठवड्यांच्या बाळाचा विकास

आपण यशस्वीरीत्या टप्पा पार केला आहाततुमचे बाळ आता १२ महिन्यांचे झाले आहे आणि त्याचा तुम्हाला अभिमान आहेतुम्ही तुमच्या बाळाचे बाटलीने दूध पिणे हळूहळू बंद केले पाहिजे आणि मोठ्या माणसांसारखे बाळासाठी आता जेवणाच्या पर्यायांचा विचार केला पाहिजेफक्त झोपताना बाळाला बाटलीने दूध दिले तर चालेल परंतु हळू हळू कपने दूध पिण्याची बाळाला सवय लावली पाहिजे आणि झोपताना बाळासाठी गोष्टी वाचल्यास बाळाला मजा येईल.

बाळाच्या बोलण्याचा विचार केल्यास बाळाचे बोलणे आता अर्थपूर्ण शब्दांमध्ये रूपांतरित झालेले असेल होणं नाबाळाच्या बडबडीला प्रोत्साहन द्याबाळाच्या तोंडातून येणाऱ्या प्रत्येक आवाजाला प्रतिक्रिया द्या आणि प्रोत्साहित करा.

  • ५० आठवड्यांच्या बाळाचा विकास

हो तुमचे बाळ आता चालू लागले आहेबाळाचे वजन आता त्यांच्या जन्माच्या वजनाच्या तिप्पट झाले आहेबाळाच्या वजनात वाढ झाली आहे आणि बाळाच्या पायांचे स्नायू मजबूत झाले आहेतसाधारणपणे वयाच्या १२ ते १३ महिन्यादरम्यान बाळ पहिले पाऊल टाकतेबाळाचा शब्दसंग्रह विकसित झाला आहे आणि तुम्ही आई बागेत जात आहे ” असे म्हणण्याऐवजी ” मी बागेत जात आहे” अशा शब्दप्रयोगांचा वापर केला पाहिजे.

  • ५१ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमचे बाळ वर्षाचे होण्यास आता फक्त एक आठवड्याचा कालावधी आहे आणि तुम्ही तुमच्या बाळाचे स्तनपान सोडवण्याचा प्रयत्न करीत आहातत्याला चालण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी प्रोत्साहन देत आहातत्यांना बाटली सोडणे कठीण जाईल परंतु तुम्ही दुधामध्ये पाणी घालून नंतर हळूहळू बाळाला कप ची सवय लावालक्षात ठेवा त्यांची सगळी ऊर्जा कारणी लागण्यासाठी त्यांना दिवसभर सक्रिय ठेवा.

तुमचे बाळ आता खूप सक्रिय झाल्यामुळे त्यास खूप आव्हानांना सामोरे जावे लागत आहेउदातुमचे बाळ आणि कुटुंबातील तुमचा सदस्य असलेला कुत्रा दूर ठेवले पाहिजेतकॉटचे दांडे झोका म्हणून वापरेल.

बाळाचे आरोग्य

तुमच्या बाळाचे वजन वाढले आहे आणि बाळाच्या स्नायू मजबूत झाले आहेत त्यामुळे त्यांच्या छोट्याशा शरीराला पेलण्याची ताकद बाळाला येतेबरीच बाळे ह्या टप्प्यावर २५ सेमी इतकी वाढतातबाळ ह्या कालावधीत सक्रिय असल्यामुळे त्यांचे वजन कमी होते आणि ते चांगले आहेबाळ उंच आणि बारीक होते कारण ह्या काळात बाळाचा खूप व्यायाम होतो.

बाळाच्या विकासाचे टप्पे – १२ महिने

तीन प्रकारच्या विकासावर तुमचे लक्ष असले पाहिजे – आकलनशारीरिक आणि सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे

  • मदतीशिवाय बसणे
  • उभे राहण्यासाठी आधार घेणे
  • फर्निचर धरून चालणे
  • काही पावले आधाराशिवाय टाकणे
  • बाळ कधी कधी वस्तू दोन बोटांच्या चिमटीत किंवा संपूर्ण हाताने पकडते
  • तर्जनीच्या साह्याने गोष्टी दाखवते
  • वर दोन आणि खाली दोन दात येतात
  • हात आणि डोळ्यांचा समन्वय सुधारल्याने दृष्टी सुधारते आणि अंतराचा अंदाज येतो

वर्तणूक

तुमच्या लक्षात येईल की ह्या वयात आई दूर गेली की बाळ चिंतीत होतेत्यांना आजूबाजूच्या गोष्टींचा अभ्यास करायचा असतो तसेच त्यांना तुम्ही दूर तर जाणार नाही ना ह्याची चिंता सुद्धा वाटत राहतेकाही बाळे ही खूप लाजाळू असतात तर काही लगेच मिसळताततुमच्या बाळाला खूप जास्त जबरदस्ती करू नकात्यांना पाहिजे तेवढा वेळ घेऊ द्याकाही वेळा बाळ चिडचिड करते कारण त्यांना नवीन झोपेच्या वेळापत्रकानुसार स्वतःला समायोजित करावे लागते तसेच बाटली सोडण्याचाही बाळाला त्रास होतोबऱ्याच वेळेला बाळाला विशिष्ट पदार्थच आवडतात.

१२ महिन्यांच्या बाळाचे क्रियाकलाप

क्रियाकल्पांमुळे बाळाचे वेगवेगळे कौशल्य वाढते आणि त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला मजा वाटते

  • चांदणीच्या किंवा बाळाच्या आवडत्या प्राण्याच्या आकाराचा एक तुकडा कापून एका विशिष्ट उंचीवर लावा आणि एखाद्या घट्ट ठोकळ्यावर बाळाला उभे करून तो घ्यायला सांगात्यामुळे तुमचे बाळ बराच काळ व्यस्त राहील आणि बाळाला उभे राहण्यास प्रोत्साहन मिळेलटांगलेल्या गाजराच्या गोष्टीवर आधारित हा खेळ आहे परंतु गाजराऐवजी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही वस्तूचा वापर करून तुम्ही हा खेळ आणखी मजेदार करू शकता.
  • ब्लॉक गेम्स तयार करण्यामागे लॉजिक असते आणि तुम्हाला वाटते तसे फक्त पैसे कमावण्यासाठी ते तयार केले जात नाहीतब्लॉक गेम्स बाळाचे हस्तकौशल्य आणि रंगांशी समन्वय वाढतो तसेच लहान बाळांमध्ये हात आणि डोळ्यांचा समन्वय सुद्धा वाढीस लागतेह्यामध्ये रंगानुसार ब्लॉक्स एका टोपलीतून दुसऱ्या टोपलीत टाकले जातातकिंवा आकारानुसार ते त्या विशिष्ट साच्यात बसवले जातात. (चांदणीच्या आकार विशिष्ट साच्यात बसवल्यावर बाळाला समन्वय समजू लागते तसेच आकलनशक्ती सुद्धा वाढीस लागते.) हो,हे खेळ तयार करताना मानशास्त्राचा खूप अभ्यास केलेला असतोजरी हे खेळ बाळाला खेळता आले नाहीत तरी काळजी करण्याचे अजिबात कारण नाही कारण काही विषय तुम्हाला शाळेत नीट येत नसले तरी तुम्ही तो टप्पा नीट पार केलाच ना!
  • खेळातील टेलिफोन हा बऱ्याच पालकांचा आवडता खेळ आहे ह्या मुळे संवादकौशल्य वाढते आणि समन्वय सुद्धा वाढतोतुमचे बाळ तुमच्या मदतीने तो कसा वापरयाचा आणि त्याचा काय उपयोग आहे हे समजू शकतेतुमच्या बाळाशी ह्या क्रियेद्वारे बोलत राहिल्यास बाळाचा शब्दसंग्रह वाढण्यास सुद्धा मदत होतेतुमच्या बाळाचा विकास होताना बघतानाचा हा काळ मनात साठवून ठेवा.

१२ महिन्यांच्या बाळाची काळजी

तुमच्या बाळाची पथ्ये वाढीच्या प्रत्येक बदलत असतात आणि १२ महिन्याच्या वाढीचा टप्पा हा काही ह्यास अपवाद नाहीतुमच्या बाळाच्या नवीन रूपाचा तुम्हाला सामना करावा लागेल कारण बाळाला नवीन गोष्टी खाण्यासाठी हव्या असतील कारण बाळाचे बाटलीने दूध पिणे बंद झाले असेल तसेच बाळाचा दिनक्रम सुद्धा बदलेला असेल कारण त्यांना लक्षात येईल की नुसते झोपून राहण्यापेक्षा जगात खूप काही गोष्टी नवीन शिकण्यासारख्या आहेतबाळाच्या पायांना संरक्षण मिळावे म्हणून नवीन शूज आणण्याची सुद्धा गरज निर्माण झाली आहेलक्षात ठेवा की मऊ टाचेच्या किंवा लाईट व आवाजाचे शूज बाळासाठी घेणे चांगले त्यामुळे बाळाला आणखी चालण्यासाठी प्रोत्साहन मिळतेपुनहा मानसशास्त्राचा अभ्यास इथे सुरु होतो.

आता बाळ सगळ्या प्रकारचे नवीन अन्नपदार्थ खात असते आणि त्यांचे दात आता ठळक दिसू लागतातबाळाचे दात मऊ ब्रश ने घासण्यास सुरुवात करणे चांगले किंवा त्यासाठी मऊ आणि स्वच्छ कापड वापरले तरी चालेलतसेच तुमच्या बाळाची दंतवैद्यांशी पहिली भेट ठरवून ठेवा.

बाळाला भरवणे

ह्या काळात तुम्ही स्तनपानाऐवजी बाळाला फॉर्मुला किंवा गाईचे दूध देऊ शकताकमी चरबीचे दूध वापरू नका कारण बाळाला वाढीसाठी चरबीची गरज असतेह्याचा संदर्भ तुमच्या बाळाच्या मेंदूच्या आणि शरीराच्या विकासाशी आहेआधी सांगितल्याप्रमाणे ह्या काळात बाळाची बाटली बंद करून कप वापरण्यास सुरुवात करू शकता आणि तुमच्या डॉक्टरांशी बोलून बाळाला प्युरी किंवा घनपदार्थ सुद्धा देऊ शकताबाळाला भरवण्याची वेळ ही खूप मजेशीर आणि तुमचे बाळ त्याची वाट बघू लागतेबाळाला तोंडात टाकायला थोडा नाश्ता दिला तर परिस्थिती आणखी चांगली होते.

आता तुमचे बाळ मोठे अन्नपदार्थ खाऊ लागते त्यामुळे बाळाच्या घशात काही अडकणार तर नाही ना ह्यावर जेवणाच्या वेळी लक्ष दिले पाहिजेमध हा एक अन्नपदार्थाचा पर्याय आहे.

बाळाची झोप

तुमचे बाळ आधीपेक्षा कमी वेळ झोपेलत्यांची झोप तर कमी होतेच पण त्यांना नवीन गोष्टी जाणून घेण्याची खूप उत्सुकता असतेकारण बाळाने नुकतीच चालण्यास सुरुवात केलेली असतेअजिबात काळजी करू नका कारण हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे आणि ही त्यांची टॉडलर बनण्याकडे वाटचाल सुरु असून त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी हे गरजेचे आहेआधीप्रमाणे बाळ सकाळी झोपणार नाही आणि तुम्हाला तुमचा दिनक्रम नीट आखून बाळाला अधिक क्रियाकलाप दिले पाहिजेत ज्या त्यांच्या नवीन दिनक्रमासाठी योग्य असतील.

बाळ २ वर्षांचे होईपर्यंत त्यांना १४ तासांची झोप मिळाली पाहिजेतुमच्या बाळाला २ वर्षांचे होईपर्यंत ९० मिनिटे किंवा ३ तासांची झोप मिळणे आवश्यक आहे कारण त्यांना दिवसातून तेवढा आराम मिळणे गरजेचे आहेतसेच आता इथूनपुढे तुम्हाला थोडा वेळ स्वतःसाठी आणि आरामासाठी मिळणार आहे.

पालकांसाठी टिप्स

पालकत्वाच्या प्रवासात दिशा मिळण्यासाठी काही टिप्स महत्वाच्या आहेत कारण तुमच्या १ वर्षाच्या बाळाच्या प्रगतीस प्रोत्साहन मिळावे म्हणून तुम्हाला काही गोष्टी केल्या पाहिजेतइथे काही टिप्स दिल्या आहेत त्या तुमच्या पालकत्वाच्या प्रवासात तुम्हाला उपयोगी पडतील.

  • बाळाला झोपवण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतीलह्यामुळे तुमच्या बाळाची उरलेल्या दिवसाची सगळी ऊर्जा खर्च होईलबाळाला थोडी मस्ती करून थकून जाऊद्यात्याला अंघोळ घाला किंवा बाळासाठी गाणी म्हणातुम्ही घरी किंवा बाहेर असलात तरीसुद्धा हे रुटीन नियमित राहील ह्याची खात्री करातुमच्या व्यतिरिक्त दुसरे कुणी बाळाची काळजी घेत असेल तर त्यांना सुद्धा नवीन रुटीनची माहिती द्यात्यामुळे बाळाला आराम मिळतो आणि त्यांना आहे त्या वातावरणात नियंत्रित राहता येते.
  • तसेच तुमच्या बाळाचे टॉडलरच्या टप्प्यावर असताना रुटीन नियमित राहील ह्याची खात्री करा१ वर्षाच्या बाळाच्या क्रियाकलापांमध्ये सुद्धा नियमितता राखली पाहिजेबाळाला बागेत घेऊन जाणेदुपारच्या झोपेची वेळबाळाला भरवण्याची किंवा भाजण्याची वेळ किंवा आई बाबा घरी येण्याची वेळ ह्या सगळ्या वेळा नियमित पाळल्या पाहिजेत.
  • तुमच्या १२ महिन्यांच्या बाळासाठी संपूर्ण चरबी असलेले अन्नपदार्थ टाळू नका कारण बाळाचे वजन त्याच्या जन्माच्या वजनाच्या तिप्पट असले पाहिजेबाळाच्या वाढीस ते मदत करते आणि बाळाची प्रतिकार प्रणाली सुद्धा वाढतेकुटुंबाचा आहार कसाही असला तरीतुमच्या बाळाची तब्येत सर्वात आधी येते आणि मेंदूच्या वाढीसाठी चरबीची गरज असते.

तुमच्या लहान बाळाचा नवीन प्रवास सुरु झाला आहे आणि ते ह्या नवीन जगात रुळत आहेलवकरचतुमच्या आयुष्यात एक छोटासा सदस्य असणार आहे जो त्यांच्या गरजा आणि मागण्या तुम्हाला सांगणार आहे आणि अनेक मार्गानी तुमच्याबद्दल वाटणारी आपुलकी दर्शवणार आहेह्या टप्प्याचा आनंद घ्या आणि तुमच्या बाळाची काळजी घेताना वरील गोष्टी जरूर विचारात घ्या.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User