तुमचे ७ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

0 13
तुमचे ७ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

बाळाचात्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर विकास होतोलहान असले तरी प्रत्येक बाळ मागच्या आठवड्यापेक्षा पुढच्या प्रत्येक आठवड्यात नवीन विकास किंवा वाढ दर्शवेलया लेखातआम्ही ७ आठवड्यांच्या बाळाच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यांविषयी चर्चा करूजर आपल्या बाळाने ७आठवड्यांचा टप्पा ओलांडला असेल आणि तुम्ही त्याच्याशी संबंधित विविध गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करीत असाल तर या लेखामध्ये आपल्या ७ आठवड्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी यासंबंधी आवश्यक माहिती आणि टिप्स दिलेल्या आहेत.

तुमच्या ७ आठवड्यांच्या बाळाचा विकास

जन्मानंतर पहिल्या काही आठवड्यांमध्ये बाळाची झपाट्याने वाढ होते आणि जेव्हा तुमचा लहान बाळ ७ आठवड्यांचा होतो तेव्हाच आपण त्याच्यात उल्लेखनीय बदल झालेले पहालतुमच्या बाळाचे दर आठवड्यात अंदाजे २०० ग्रॅम वजन वाढलेले असेल आणि अशा प्रकारे आपल्या ७ आठवड्यांच्या बाळाचे वजन २ ते ३ पौंड वाढलेले असेलतथापिजर बाळाचे वजन यापेक्षा कमी झालेले किंवा जास्त वजन वाढलेले असेल तरकाळजी करण्याचे कारण नाही कारण प्रत्येक बाळाची वाढ वेगळी असू शकते.

आपल्या बाळासोबत बोलणेगाणे म्हणणे आणि विनोद करणे इत्यादीसाठी ही वेळ चांगली आहेजरी बाळाला काही समजत नसेलतरीही त्याचा मेंदू आजूबाजूच्या गोष्टी समजण्यास सुरवात करेलआपल्या लक्षात येईल की आपल्या बाळाचे डोळे देखील बदलत आहेततो डोळ्यांशी संपर्क साधण्यास सुरवात करेल – कदाचित वस्तूंचा मागोवा घेण्यासही सुरवात करेल.

सात आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

आपल्या ७ आठवड्यांच्या बाळाचे आपल्याला लक्षात येऊ शकतील असे काही सामान्य टप्पे येथे आहेतः

  • आपले बाळ त्याच्या डोळ्यांनी वस्तूंचा मागोवा ठेवण्यास सक्षम असेल.
  • आपल्या बाळाची मान आता बळकट आहे आणि तो मान वळवण्यास सक्षम असेल.
  • या वयात आपले बाळ अधिक सामाजिक होत आहेतो कदाचित तुमच्याकडे पाहू शकेल आणि तुमचा चेहरा ओळखू लागेल.

सात आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

७ आठवड्यांच्या सर्व बाळांमध्ये हे टप्पे सामान्यतदिसतातआता विकासाचे टप्पे पार करण्याच्या इतर बाबींवर तपशीलवार नजर टाकूया.

दूध पाजणे

ह्या वयात तुमच्या बाळाने स्तनपान घेण्याचे चांगले कौशल्य प्राप्त केलेले असेलत्याला आता दूध कसे शोषून घ्यावे याची अधिक जाणीव आहे आणि अधिक कार्यक्षमतेने ते गिळू देखील शकेलकदाचित त्याने आपल्या गरजा भागविण्यासाठी आहार पध्दतीशी जुळवून घेतले असेलएक स्तनपान देणारी आई म्हणूनतुमचे स्तन तुम्हाला हलके वाटतील कारण आपल्या बाळाच्या गरजा आणि मागणीनुसार आपल्या दुधाचा पुरवठा आता होऊ लागला आहेतुमच्या बाळाची वेगाने वाढ होत आहेत्यामुळे तुमच्या ७ आठवड्यांच्या बाळाचे पोषण वाढते किंवा तुमच्या बाळाला आता अधिक वारंवार फीड्सची आवश्यकता असू शकतेतुमच्या बाळाच्या वाढीव आवश्यकतेनुसार दूध पुरवठा करण्यासाठी दोन दिवस लागू शकतातपरंतु तसे होईलआवश्यक असल्यास आपण दुग्धपान तज्ञाशी संपर्क साधू शकता.

जर स्तनपान करणे शक्य नसेल आणि आपल्या बाळाला बाटली दिली गेली असेल तरतुमच्या बाळाच्या वाढीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तुम्ही दुधाचे प्रमाण वाढवू शकता.

शौचाची वारंवारिता

जर आपले बाळ जास्त फीड घेत असेल तर याचा अर्थ असा नाही की त्याला वारंवार शौचास होईलतो ३ ते ७ दिवसांत एकदा शौचास करेल किंवा दिवसातून १० वेळा सुद्धा शौचास करू शकतो आणि दोन्ही सामान्य आहेतजास्त वेळा दूध प्यायल्यामुळे आपल्या बाळाला आरोग्याचा त्रास होत नाही याची खात्री करण्यासाठी तुम्ही शौचाच्या रंगावर बारीक लक्ष ठेवू शकताकधीकधीआहार नियमित नसल्यास बाळांना बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतोअशा परिस्थितीतबाळाचे स्तनपानाचे रुटीन नियमित होण्यासाठी तुम्ही नियमित अंतराने आपल्या बाळाला दूध पाजू शकताबाळाला भूक नसल्यास बाळ प्रथम प्रतिकार करू शकेल परंतु शेवटीत्याने ते स्वीकारले पाहिजे आणि सवयीने अंगवळणी पडले पाहिजेआपल्याला बाळाला पाजणे अद्याप कठिण जात असल्यासत्वरित बालरोग तज्ञांचा सल्ला घ्या.

झोप

आपल्याला रात्री आठ तासांची सुंदर झोप मिळू शकेल की नाही याबद्दल आपण विचार करत असाल तर या टप्प्यावर हे स्वप्न थोडेसे दूर दिसतेतथापिजर आपल्या बाळाला गेल्या २४ तासांच्या चक्रात चांगला आहार मिळाला असेल तरआपले ७ आठवड्यांचे बाळ रात्री सहा तासांपर्यंत झोपू शकतेचांगली बातमी अशी आहे की ७ आठवड्यापर्यंत बाळ किती वेळ झोपेल ह्याचा अंदाज तुम्हाला येऊ लागतो किंवा त्याच्या झोपेचे रुटीन तयार होऊ लागतेपरंतुदररोज रात्री आपले बाळ सलग ५ ते ६ तास झोपलेले असतेचांगली झोप येण्यासाठी तुम्ही झोपेच्या वेळेस अर्धा ते एक तास आधी बाळाला दूध देऊ शकताझोपेच्या वेळेची तयारी करणे ही चांगली कल्पना आहे कारण झोपेची वेळ झालेली आहे हे तुमच्या बाळाला समजेलजर रात्री आपले बाळाला जागे होत असेल तरत्याच्या पाठीवर थोपटून आणि त्याला उचलून न घेता झोपवण्याचा प्रयत्न कराजर तो निराश झाला नाही तर आपण त्याला खायला देऊ शकता.

वागणूक

यावेळेस आपले बाळ अभिव्यक्त होऊ शकतेबाळाने काढलेले वेगवेगळे आवाज ऐकण्यासाठी सज्ज व्हातुम्ही तुमच्या बाळाला बोलायला आणि अगदी गायलाही सांगू शकताजरी त्याला त्यावरून जास्त अर्थ बोध होऊ शकला नसेल तरी तो ऐकण्याने त्याला नक्कीच मजा येईल आणि यामुळे त्याच्या लहान मेंदूत उत्तेजन मिळण्यास मदत होईल.

वागणूक

तुम्ही दररोज थोड्या वेळासाठी पुढील योजना आखण्याची शिफारस केली जातेतुमच्या बाळाला टणक पृष्ठभागावर त्याच्या पोटावर झोपायला लावा आणि त्याला डोके वर उचलण्याचा प्रयत्न करू द्याजरी त्याने पूर्वीपेक्षा जास्त काळासाठी डोके उचलले असले तरीबाळाची मान अजूनही पुरेशी मजबूत नाहीम्हणून सावध रहातुमच्या देखरेखीखाली त्याला थोडावेळ पोटावर झोपू द्या.

बाळाचे रडणे

तुमच्या बाळाच्या रडण्यामध्येही महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतातजोरात उंच आवाजात रडणारे बाळ आता मोठमोठ्याने रडू लागेलेले आपल्या लक्षात येईलवेगवेगळ्या कारणांसाठी रडणे विविध प्रकारचे असू शकतेभूकथकवाअस्वस्थता आणि डायपर बदलण्याची याचना करणारे रडणे भिन्न असू शकतेकाही रडण्याच्या सत्रांना त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता नसतेतर काहीवेळा लगेच लक्ष देणे जरुरीचे असतेपालक म्हणूनआपल्या बाळाला काय पाहिजे आहे आणि आपल्या बाळाला कसे वाटते आहे हे आपल्याला चांगले माहिती असेलतुम्हाला आतून काय वाटते त्यानुसार आवश्यक कृती करा

आतापर्यंततुमचे बाळ ७ आठवड्यांचे झालेले असेल त्यामुळे तुम्ही काय अपेक्षा करू शकता ह्याची कल्पना तुम्हाला असणे आवश्यक आहेतुमच्यासाठी हे थोडे अधिक सोयीस्कर होण्यासाठी तसेच आपल्या ७ आठवड्याच्या बाळाची वाढ आणि विकास कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी आपण काही टिप्स वापरू शकता.

७ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स

आपल्या ७ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेताना लक्षात घेतल्या पाहिजेत अशा काही टिप्स

  • तुमच्या बाळाची वाढ वेगाने होत आहे आणि बाळ पूर्वीपेक्षा जास्त वेळा दुधाची मागणी करू शकतेबाळाला भूक लागल्याची चिन्हे दिसताच बाळाला दूध द्या
  • आपले बाळ रात्रीच्या वेळी ६ तासांपर्यंत झोपू शकतेखात्री करुन घ्या की बाळ तंदुरुस्त आहे आणि सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात झोपला आहेतो झोपेत असताना बाळाचा चेहरा झाकलेला नाही याची खात्री करा
  • दररोज पोटावर झोपवल्याने बाळाची मान आणि पाठीचे स्नायू विकसित होण्यास मदत होईलतुमच्या देखरेखीखाली त्याला दररोज थोडावेळ पोटावर झोपवण्यासाठी वेळ द्या
  • तुम्ही तुमच्या बाळाशी बोलावे अशी शिफारस केली जातेत्यामुळे तुमच्या ७ महिन्यांच्या बाळाला कम्फर्टेबल वाटू शकते आणि त्यामुळे त्याचे ऐकण्याचे कौशल्य वाढण्यास मदत होईल
  • आपल्या बाळाचे डायपर नियमितपणे बदला कारण मुलांना डायपरमुळे पुरळ होण्याची शक्यता असतेत्याच्या मांडीचा भाग कोरडा आणि स्वच्छ ठेवा
  • बाळाने दूध ओकून बाहेर काढू नये म्हणून बाळाला नियमित अंतराने दूध द्याआपल्या बाळाला शांत ठेवा आणि प्रत्येक वेळी थोडेसे दूध किंवा फॉर्मुला द्यापरंतु जर आपल्या बाळासाठी आईचे दुध पुरेसे असेल तर आपल्याला त्याला फॉर्म्युला देण्याची आवश्यकता नाही
  • आपल्या बाळाला जोरजोरात हलवू नका कारण यामुळे त्याच्या मेंदूला कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते
  • पोटातील वायू बाहेर पडण्यास मदत करण्यासाठी प्रत्येक वेळेला दूध दिल्यानंतर बाळाची ढेकर काढा.
  • बाळाला स्तनपान देत आहात तोपर्यंत मद्यपान आणि धूम्रपान करण्यापासून दूर रहा
  • तुम्ही तुमच्या कोणतीही अनावश्यक गडबड आणि कुतूहल टाळण्यासाठी आपल्या बाळाच्या दूध पिण्याच्या आणि झोपेच्या वेळा पाळा.
  • तुमच्या ७ आठवड्यांच्या बाळासाठी आवश्यक असलेल्या सर्व आवश्यक तपासण्या करून घ्या आणि लसी द्याखाली आपण या बद्दल थोडक्यात चर्चा करू.

७ आठवड्यांच्या बाळाची तपासणी

जेव्हा तुम्ही तुमच्या ७ आठवड्यांच्या बाळास नियमित तपासणीसाठी घेऊन जाता तेव्हा आपले डॉक्टर खालील गोष्टी करू शकतात.

  • आपल्या बाळाचे डोके आणि डोक्याचा घेर तपासतील
  • आपले बाळ आवाजाला कसा प्रतिसाद देतो हे पाहण्यासाठी आणि संक्रमण तपासण्यासाठी
  • कानांची तपासणी करतील
  • अश्रु वाहिनींमधील अडथळा तपासण्यासाठी किंवा डोळ्यांत जन्मजात समस्या आहे का ते पाहण्यासाठी आपल्या बाळाचे डोळे तपासतील
  • तोंडाचे किंवा इतर संक्रमण आहे का हे पाहण्यासाठी डॉक्टर बाळाच्या तोंडाची तपासणी करतील
  • श्वासोच्छवासाच्या किंवा हृदयाच्या कोणत्याही असामान्यतेसाठी तुमचे डॉक्टर तुमच्या बाळाच्या हृदयाचे आणि फुफ्फुसांचे परीक्षण करतील
  • रिफ्लेक्ससाठी स्नायूंची तपासणी करतील आणि रॅशसाठी त्वचेची तपासणी करतील
  • कोणतेही पुरळ किंवा संसर्ग नाही ना हे पाहण्यासाठी बाळाच्या गुप्तांगाची तपासणी केली जाईल
  • कोणतेही वाढलेले अवयव किंवा हर्नियाची लक्षणे तपासण्यासाठी आपल्या बाळाच्या पोटाची तपासणी करतील
  • लवचिकता तपासण्यासाठी आपल्या बाळाचे पाय आणि नितंबांचे सांधे हलवून पाहतील

आपल्या ७ आठवड्यांच्या बाळासोबत तुम्ही कोणते क्रियाकलाप करू शकता ह्यावर एक नजर टाकूहे क्रियाकलाप आपल्या बाळाची कौशल्ये वाढवण्यासाठी आणि तुमच्यातील बंध वाढविण्यात मदत करतात.

७ आठवड्यांच्या बाळासाठी खेळ आणि क्रियाकलाप

आपल्या ७ आठवड्यांच्या बाळाचे हात आणि डोळ्यांचे एक चांगले संयोजन आहे आणि त्याच्या भोवतालच्या आवाजाला देखील बाळ चांगला प्रतिसाद देतेत्याचे उत्तम मोटर कौशल्यऐकण्याची कौशल्येसंज्ञानात्मक कौशल्ये आणि इतर विविध कौशल्ये विकसित करण्यात मदत करण्यासाठी आपण बाळाला विविध खेळ आणि क्रियाकलापांमध्ये गुंतवू शकताया वयात आपण आपल्या बाळाला गुंतवू शकता असे काही खेळ आणि क्रियाकलाप खालीलप्रमाणे आहेतः

  • रॅटल टॉय विग्लिंग – त्याच्या ऐकण्याच्या कौशल्यास मदत करण्यासाठी.
  • तुमच्या बाळासाठी गाणे – त्याच्या भाषिक आणि ऐकण्याच्या कौशल्यांना मदत करण्यासाठी.
  • तुमच्या बाळाची मालिश करणे – चांगले संबंध आणि शरीर जागरूक राहण्यासाठी
  • तुमच्या बाळासाठी वाचणे – भाषा आणि संज्ञानात्मक विकासाच्या अधिक चांगल्या आकलनासाठी.
  • तुमच्या खेळायला रंगीबेरंगी खेळणी देणे – आपल्या बाळाची सवेदनाक्षम कौशल्ये सुधारण्यासाठी

ह्या अशा काही क्रिया आहेत ज्याद्वारे आपण आपल्या मुलाचे वय ७ आठवड्याचे झाल्यावर त्याला व्यस्त ठेवू शकता.

आपले बाळ नाजूक असल्याने काही गोष्टींमुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतातबाळाच्या नेहमीच्या तपासण्या चुकवू नकापरंतुकाही वेळा बाळाला बालरोगतज्ज्ञांकडे न्यावे का असाही विचार तुम्हाला पडेलत्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा

बालरोगतज्ञांशी केव्हा संपर्क साधाल?

प्रत्येक बाळ आपल्या गतीने वर सांगितलेले महत्त्वाचे टप्पे गाठू शकतोतथापिकधीकधी बाळाचे विकासाचे प्रश्न आणि आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात ज्यासाठी त्वरित वैद्यकीय मदत घेण्याची आवश्यकता असू शकतेयेथे अशी काही लक्षणे आहेत जी आपल्या ७ आठवड्यांच्या बाळासाठी त्वरित वैद्यकीय मदत घेण्याची आवश्यकता दर्शवू शकतात:

  • तुमचे बाळ मोठ्या आवाजाला प्रतिसाद देत नसेल तर
  • तुमचे बाळ विविध आवाज ऐकण्यास सतर्क नसेल तर
  • तुमचे बाळ झोपलेले असताना डोके वर काढण्यात अक्षम असेल तर
  • तुमचे बाळ तुम्हालातुमच्या पतीला किंवा तो दररोज पाहत असलेल्या लोकांना ओळखत नाही

तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधाआपल्या ७ आठवड्यांच्या बाळामध्ये झालेल्या लहान बदलांकडे बारीक लक्ष दिल्यास आपण त्याला आरोग्याच्या मोठ्या समस्यांपासून दूर ठेवू शकताआपल्या बाळाच्या आयुष्यात प्रत्येक टप्पा महत्वाचा असतोसावधगिरी बाळगावर दिलेल्या टिप्स काळजीपूर्वक पाळा आणि तुमच्या छोट्या गोड़ बाळाचा आनंद घ्या!

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User