तुमचे ३ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

0 6
तुमचे ३ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

आपल्या बाळासोबत काही आठवडे घालवल्यामुळे तुम्ही एकमेकांना आता चांगले ओळखत आहात असा विश्वास तुम्हाला वाटू लागतोत्यामध्ये किती तथ्य आहे हे कळण्याआधीच बाळ आणखी काही नवीन गोष्टी करणे सुरू करतेत्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित होऊ शकता आणि विचार करू लागता की आपण आपल्या बाळाला खरोखरच ओळखत नाही कि कायकाळजी करू नकाकारण ही सर्व आपल्या बाळाच्या वाढीची चिन्हे आहेतबाळाचे त्याच्या आजूबाजूच्या जगाबद्दलचे आकलन वेगाने वाढत आहे.

३ आठवड्यांच्या बाळाचा विकास

प्रत्येक बाळ दुसऱ्यापेक्षा थोडेसे वेगळे वाढतेम्हणूनचबाळाची निरोगी वाढ मोजण्यासाठी कोणताही विशिष्ट नियम किंवा बेंचमार्क नाही३ आठवड्यांच्या बाळाची वाढ वेगाने होण्याची शक्यता असतेत्यामुळे आपले बाळ कमी कालावधीत वेगळे दिसू लागेल.

तुमचे बाळ पूर्वीपेक्षा आणखी आवाज काढण्यास सुरवात करेल आणि हळू हळू मान वळवून आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न करू लागेलडोळ्यांना थोडी स्थिरता येण्यास सुरवात होईल आणि तो एका योग्य दिशेने पाहण्यास सक्षम होईल.

तीन आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

सामान्यपणे ३ आठवड्यांच्या बाळाचे वजन आणि उंचीमुलगा आणि मुलगी ह्यानुसार निश्चित केली जातेमुली साधारणपणे ५२५३ सेमी लांबीच्या असतातवजन सुमारे ३.५ ते ४ किलो असतेतर मुलांची लांबी ५३५४ सेमी आणि वजन सुमारे ४.५ किलो शकतेनेहमीपेक्षा मोठ्या किंवा अकाली जन्मलेल्या मुलांची लांबी आणि उंची वर नमूद केलेल्या प्रमाणाबाहेर असू शकते.

ह्या वयातचबाळे असंख्य प्रकारे आपली मान हलवू लागतील आणि काही आवाजांना प्रतिसाद देताना किंवा आपला चेहरा पाहताना थोडेसे हसू लागतीलआपले बाळ हळू हळू वेगवेगळे आवाज काढण्यास सुरवात करेल.

जेव्हा आपल्या बाळाच्या शरीराच्या वरच्या भागाची शक्ती वाढू लागतेतेव्हा तुमच्या देखरेखीखाली पोटावर झोपवल्यावर बाळ डोके उंचावण्याचा प्रयत्न करतो किंवा समर्थन करण्यासाठी हात वापरण्याचा प्रयत्न करतोया प्रयत्नांसहस्वतःस आधार देण्यासाठी आवश्यक सामर्थ्य बाळे विकसित करू शकतात.

तीन आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

तुमच्या बाळाला तुम्ही आणि इतर लोकांमधील फरक समजू शकेलइतर बाळे आणि त्यांच्या आई बाबांशी संवाद साधूनतुमचे बाळ जीवनाचे सामाजिक पैलू समजू शकते आणि आजूबाजूच्या विविध लोकांचे निरीक्षण करू लागते.

स्तनपानदूध देणे

पूर्वीच्या तुलनेत ३ आठवड्यांच्या बाळाची दूध घेण्याची वारंवारिता वाढतेअधिक दूध शोषण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतातत्यामुळे बाळाला थकवा येऊ शकतोम्हणून बाळ दीर्घकाळ झोपते किंवा दूध पाजल्यानंतर लगेच झोपी जाते.

पोट अद्याप लहान असल्याने त्यामध्ये जास्त दूध मावत नाही त्यामुळे बाळाला वारंवार म्हणजेच दर दोन तासांनी एकदा दूध पाजावे लागेलजर आपल्या बाळास स्तनपान देण्यास त्रास होत असेल आणि तुम्ही बाटलीने दूध देण्याचा पर्याय निवडला असेल तर हे प्रमाण दर ४ तासांनी एकदा असू शकतेनियमित रुटीन लागू करणे ह्या काळात थोडे अवघड आहे कारण बाळाची वाढ वेगाने होत असते.

झोप

दूध पिण्याची वारंवारिता वाढल्यामुळे बहुतेक वेळेस थकवा येतो आणि बाळाला लगेच झोप येते आणि बाळ झोपून जातेबाळाला दूध दिल्यानंतर थोडे जवळ घेऊन थोपटल्यास बाळ झोपी जातेपोट भरल्याने तुमचे बाळ समाधानी व शांत राहते आणि बाळाच्या शरीराला आता झोपले पाहिजे हे समजते.

बाळाला सतत भूक लागत असल्याने ३ आठवड्यांच्या बाळाच्या झोपेचा विशिष्ट नमुना ठरत नाहीकारण एकदा दूध प्यायल्यानंतर काही तासांत बाळ पुन्हा दूध पिण्यासाठी तयार होईलदूध पाजल्यानंतरसुद्धा जर बाळाला झोप लागत नसेल तर डॉक्टरांना त्याबद्दल माहिती देणे महत्वाचे आहेअपेक्षेनुसार वजन वाढते आहे की नाही हे प्रामुख्याने तपासले पाहिजेजन्माच्या वेळची गुंतागुंत किंवा अकाली जन्मलेल्या बाळांचे वजन वाढण्यास थोडा जास्त वेळ लागू शकतो.

झोप अधिक अनुकूल बनविण्यासाठीआपल्या बाळास हलक्या कपड्यात लपेटून क्रिबमध्ये किंवा पाळण्यात ठेवाकाही वेळालहान बाळे दचकून उठतात आणि स्वतला किंवा क्रिबवर हाताने मारतातकपड्यात त्यांना गुंडाळल्यामुळे अशा हालचालींवर प्रतिबंध होतोबाळाला नेहमी पाठीवर झोपवा.

वागणूक

सर्व माणसे त्यांच्यात काही विशिष्ट प्रतिक्षिप्त क्रिया घेऊन जन्माला येतात आणि बाळांमध्ये ह्या टप्प्यावर त्या अधिक स्पष्ट होऊ लागतातस्तनांमधून दूध ओढणेवस्तूंचे आकलन करणे किंवा स्तनावर घट्ट पकड आणि पाय हलविणे या सर्व गोष्टी बाळ स्वतःचे स्वतः करू लागतेह्या काळात झोपेतून जागे होणे किंवा झोपेत असताना हात पाय हलविण्यासारख्या प्रतिक्षिप्त क्रिया उद्भवू शकतात आणि हे पुढील अनेक वर्षे सुरु राहते.

जागे झाल्यावरबाळ आधीपेक्षा कितीतरी जास्त तरतरीत वाटू लागतेकारण आवाज आणि चेहरा ओळ्खल्याचा प्रतिसाद वाढू लागतोबाळ तुमच्या चेहऱ्यावरील नाककान आणि इत्यादी अवयवांवर लक्ष केंद्रित करू शकतेनिरनिराळे आवाज काढणे आणि दूध हवे असल्यास जीभ दाखवणे इत्यादी गोष्टी बाळ स्वतःचे स्वतः करू लागतेकधीकधी वेगवेगळे आवाज काढते आणि हालचाली करते आणि ते सगळे आपल्यासाठी नवीन असू शकतेखात्री बाळगाही तुमच्या बाळाची फक्त अनोखी ओळख आहे.

३ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

३ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी येथे काही टिप्स आहेत

योग्य आहार

ह्या काळात बाळाला सारखे दूध पाजणे खूप कंटाळवाणे होऊ शकते परंतु तरीही नियमितपणे दूध देणे महत्वाचे आहेदूध पीत असताना कदाचित बाळ झोपी जाऊ शकेल किंवा स्तनपान झाल्यावर लगेच ते जागे होईलत्यांना आवश्यक तेवढे दूध मिळत असल्याची खात्री करा.
झोपेच्या पद्धतींचे समायोजन

तुमचे बाळ झोपल्याबरोबर तुम्हाला झोपायला आवडेलपरंतु काही तासांनंतर बाळाला भूक लागल्यावर जागे व्हाकाही वेळा दूध पाजल्यानंतर काही वेळा बाळाला झोपवण्यासाठी तुम्हाला बाळाला जवळ घेऊन थोपटावे लागेलझोप अनियमित असली तरी त्यांना चांगली झोप मिळते आहे ना हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

पोटावर झोपवण्याची वेळ

पोटावर झोपवण्याची वेळ

बाळाच्या शरीराच्या वरच्या भागाची शक्ती वाढत आहे हे त्यांना समजणे आवश्यक आहेआपल्या बाळाला अधूनमधून त्याच्या पोटावर झोपवले पाहिजे जेणेकरून बाळ धरू लागेल किंवा आधारासाठी हातांचा वापर करु शकेलआजूबाजूचा परिसर पाहण्याकरिता बाळ डोळे फिरवू लागेलजर बाळ रडण्यास सुरूवात करत असेल तरत्याला पुन्हा पाठीवर झोपवा आणि काही काळानंतर पोटावर झोपवण्याचा प्रयत्न करा.

नॅपी नियमित बदलणे

दूध पिण्याचे प्रमाण वाढल्यावर बाळाचे शी करण्याचे प्रमाण सुद्धा वाढतेवेळेवर नॅपी बदलणे ही एक गरज बनतेनॅपी बदलण्यासाठी एखादी जागा ठरवून ठेवणे चांगलेकारण तुम्हाला स्वच्छ जागा आणि लागणाऱ्या साहित्याची शोधाशोध करावी लागणार नाही.

नाभीजवळील भागाची काळजी

ह्या काळातआपल्या बाळाच्या नाभीजवळील नाळेचा भाग सुकलेला असतो आणि नाळ पडलेली असतेतथापिती जागा अजूनही थोडीशी संवेदनशील आहेम्हणूनचबाळाला अंघोळ घालताना काळजीपूर्वक घालणे आवश्यक आहेनाभीजवळील भाग कोरडा राहून त्यास हवा लागली पाहिजे.

स्वच्छता

आपल्या बाळाला दररोज आंघोळ करणे आवश्यक नसले तरी बाळाच्या शरीराचे सर्व भाग स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ आवश्यक आहेतसेचछान अंघोळ घातल्यास बाळ शांत राहून त्यास आरामदायक वाटेल आणि बाळाला सहज झोप येण्यास मदत होईल.

शौचास नियमित होणे

काही बाळांना बद्धकोष्ठतेचा सामना करावा लागतोआपल्या बाळाला प्रत्येक वेळेला पाजल्यावर शी होते आहे कि नाही हे तपासणे महत्वाचे आहेकाही वेळाबाटलीचे दूध पिणाऱ्या बाळांना एका दिवसात फक्त ३ वेळा शौचास होऊ शकतेकोणत्याही परिस्थितीतजर आपल्या बाळाने २३ दिवस किंवा त्याहून अधिक काळ शौचास केलेली नसेल तर ते डॉक्टरांच्या लक्षात आणून देणे आवश्यक आहे.

चाचण्या आणि लसी

आधी सांगितल्याप्रमाणेजर पहिल्या आठवड्याच्या सर्व लसी त्या आठवड्यात किंवा त्या पुढील आठवड्यात यशस्वीरित्या दिल्या गेल्या असतील तर ह्या आठवड्यात कोणत्याही लसींची अजिबात गरज नाही.

खेळ आणि क्रियाकलाप

ह्या वयात आपले बाळ विविध आवाज काढण्यास सुरुवात करतेत्यामुळे त्याला बोलण्यात गुंतवणे चांगले आहेजेव्हा तुम्ही बोलू लागता तेव्हा तुमचे डोळे आणि तोंड पाहण्याचा पाहण्याचा बाळ प्रयत्न करेल आणि तुमच्याकडे पाहून तसेच करण्याचा प्रयत्न करेलतुम्ही सुद्धा पुन्हा त्याच हावभावांची पुनरावृत्ती करून बाळाशी बोलत राहाअसे केल्याने बाळ आनंदी होईल आणि तुमच्याशी कनेक्ट होईलतुमच्या बाळास पूर्वीपेक्षा बरेच काही चांगले दिसू शकतेमजेदार चेहरे बनविणेतुमचा हात देऊन त्याला व्यस्त ठेवणे ह्या सर्व गोष्टी एखाद्या बाळाच्या जीवनात आनंद आणण्यासाठी आवश्यक आहेत्याच्या पायापासून डोक्यापर्यंत जाण्यासाठी तुमच्या दोन बोटांचा वापर करा आणि त्यासोबत हळूहळू वाढणारा आवाज कराशेवटी कलायमॅक्सला बाळाला हसू येईल.

खेळ आणि क्रियाकलाप

आपल्या डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधाल?

आहार वाढल्यामुळे ह्या टप्प्यातील बाळांना अतिसाराचा सामना करावा लागतोजर हा त्रास एका आठवड्यापेक्षा जास्त काळ चालू राहिला आणि त्यातून रक्त पडत असेल तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

उलट्या होणे आणि थुंकणे उद्भवू शकतेपरंतु एका दिवसापेक्षा जास्त काळ ते टिकू नये किंवा एकाच दिवसात सुमारे १० पेक्षा जास्त काळ तसे होता कामा नयेबाळाला दररोज शौचास होणे आवश्यक आहेम्हणूनचजर दोन दिवसांपर्यंत बाळाला शौचास होत नसेल तर लवकरच आपल्या डॉक्टरांना सांगा.

३ आठवड्यांतआपले बाळ आपल्याशी अधिक वेळा संवाद साधण्यास सुरवात करेलत्यामुळे बाळासोबतचा हे क्षण खूप आनंदाचे असतात आणि आपल्याला बऱ्यापैकी व्यस्त ठेवतातबाळासोबत खेळण्यासाठी आपल्या पतीला सुद्धा सहभागी करून घेणे चांगले आहे कारण आपल्यालाही विश्रांतीची आवश्यकता आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User