तुमचे १३ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

0 40
तुमचे १३ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

अभिनंदनतुमचे बाळ आता १३ आठवड्यांचे आहे आणि तुम्हाला आता मातृत्वाची सवय झालेली आहेरात्रीची झोप नीट न मिळणेआपल्या बाळाला दिवसा किंवा रात्री केव्हाही स्तनपान देणे आणि बाळाला शौचास झाल्यास ते स्वच्छ करणे इत्यादींमुळे तुम्हाला जाणवले असेल की आई होणे सोपे नाहीहो ना परंतु आम्हाला माहित आहे की तुमचे तुमच्या छोट्या बाळावर किती प्रेम आहेया तीन महिन्यांततुमचे तुमच्या बाळासोबत बंध निर्माण झाले असतीलतुमचे बाळ मोठे झाल्यावर तुमच्याकडून बरेच काही शिकण्यास सुरवात करेल आणि कदाचित तुमची किंवा तुमच्या पतीची छटा बाळामध्ये तुम्हाला आधीपेक्षा अधिक स्पष्ट दिसू लागेलआपल्या बाळाचा विकास कसा होतो ते शोधा!

तुमच्या १३ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमचे १३ आठवड्याचे बाळ लवकरच तुमच्यासोबत आणि ओळखीच्या चेहऱ्यांसोबत आरामदायक होऊ लागेलइतरांशी संवाद साधण्यात किती मजा आहे हे त्याला समजताच तुमच्या बाळाचे सामाजिक पैलू विकसित होण्यास सुरवात होतेत्याच्या चेहऱ्यावरचे हास्य सर्वात स्वागतार्ह असेल आणि बाळाची पापी घेण्याचा मोह तुम्हाला आवरता येणार नाहीवेगवेगळे आवाज काढून प्रदीर्घ संभाषणे करणे हे त्याच्यासाठी दुसरा स्वभाव बनेलआवाजाच्या दिशेने बाळ मान वळवण्याचा प्रयत्न करू लागेलतुमच्या बाळाला रात्री झोप देखील येऊ शकतेजेणेकरून तुम्ही रात्री थोडीशी झोप घेऊ शकतातथापियावर लगेच विश्वास ठेवू नकाजर बाळ रात्री अजूनही जागे रहात असेल तर काही महिने थांबाकधीतरी बाळाला रात्रीची शांत झोप लागेलच आणि तुम्हाला सुद्धा रात्रीची झोप मिळेल.

तुमच्या १३ आठवड्यांच्या बाळाचे वाढीचे टप्पे

आतापर्यंत तुमच्या बाळाची बर्‍यापैकी इंद्रिये समान विकसित झाली आहेतयास आणखी काही काळ लागू शकेलपरंतु तिसऱ्या महिन्याच्या आसपास होणाऱ्या वाढीचा परिणाम म्हणूनया वयानुसार तुमच्या बाळाची दृष्टी सुधारू शकतेतुमचे बाळ अधिक लक्ष केंद्रित करण्यास सक्षम असेलजवळ किंवा लांब हा फरक बाळाला समजू शकेलपूर्वीपेक्षा वेगवेगळे रंग बाळाला अधिक स्पष्ट दिसू लागतील आणि आपले बाळ कदाचित इतरांपेक्षा काही विशिष्ट रंगांना प्राधान्य देईलएखाद्या कोपऱ्यात एखादे संगीत सुरु करा आणि आपले बाळ आता मान फिरवू शकेल आणि आवाज कुठून येत आहे हे पाहण्याचा प्रयत्न करू शकेलफुलांचा वास असलेले लोशन बाळासाठी वापरा आणि बाळाला जेव्हा त्याचा वास येईल तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ते भाव दिसतील.

तुमच्या १३ आठवड्यांच्या बाळाचे वाढीचे टप्पे

इद्रियांच्या वाढीसोबतचवेळेनुसार आपल्या बाळाच्या अवयवांमध्येही सुधारणा दिसू लागेलही वेळ अशी आहे जेव्हा तुमच्या बाळाला त्याला बोटे आहेत हे समजेल आणि त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो हे देखील त्याला समजेलजरी तो आत्ता कदाचित एखाद्या गोष्टीकडे बोट दाखवू शकत नाही किंवा कोणतीही गोष्ट योग्य प्रकारे पकडू शकत नाहीपरंतु त्याची बोटे आणि तळवे तो फिरवू लागेलत्याच्या हात आणि डोळ्यांचा समन्वय पूर्वीपेक्षा बराच चांगला होईल.

आपल्या स्वतच्या आवाजाचा शोध घेणे हा एक क्रियाकलाप देखील आपल्या बाळास खूप आवडेलस्वतःशी दीर्घ संभाषणे करणे आणि निरनिराळ्या टोन आणि मोड्यूल्ससह प्रयोग केल्यामुळे तो दिवसाचा बराच काळ व्यस्त राहीलगेम खेळत असतानाजेव्हा तुम्ही लपून बसता तेव्हा तो मोठ्याने रडू लागेल आणि जेव्हा तुम्ही येता तेव्हा बाळ समाधानाने हसू लागेलबरीच बाळे सकाळी लवकर उठतातजर पोट भरले असेल तर बाळ तसेच पडून राहतेवेगवेगळे आवाज काढत स्वतःच्या पायाकडे बघत राहते.

दूध देणे

जसजशी बाळाची दिनचर्या सेट होऊ लागते तसे तुमच्या १३ आठवड्यांच्या बाळाला तुम्ही सहज दूध पाजू शकताहोयतुमच्या लहान बाळाला स्तनपान करणे हे तुमच्या दोघांसाठी सुद्धा सोपे आणि सोयीचे होईलबाळाला स्तनपान देण्याची क्रिया सुरळीत होईलबाळाला कधी दूध दिले पाहिजे आहे आणि कधी नाही हे तुम्ही सांगू शकालभूक लागल्यावरचे बाळाचे रडणे तुम्ही ओळखू शकाल.

झोप

तुमच्या बाळाची वेगाने वाढ होत असल्यामुळेकदाचित दिवसा आणि रात्रीच्या विचित्र वेळेला त्याला दूध पाजावे लागेलरात्रीच्या वेळी स्तनपान करणार्‍या बाळालाबाटलीचे दूध पिणाऱ्या बाळापेक्षा जास्त दूध लागतेतथापिबहुतेक बाळे संपूर्ण रात्रभर झोपत नाहीतमध्ये न उठता सलग जास्तीत जास्त ६७ तास बाळ झोपू शकते.

दिनचर्या

आतापर्यंतआपण पालकत्व आणि आहार आणि झोपेची संपूर्ण प्रक्रिया कशी कार्य करते हे शोधण्याचा प्रयत्न केला असेलपरंतु आपल्या बाळासोबत सुमारे १३ आठवडे घालविल्यानंतरआपण दोघांसाठीही रुटीन सुरु करण्यासाठी हा एक चांगला काळ असू शकतोकाही बाळांचे त्यांच्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात रुटीन तयार होतेजर तुमच्या बाळाचे रुटीन नसेलतर त्याच्यासोबतचा नित्यक्रम तयार करण्याची वेळ आलेली आहे

दिनचर्या

लहान बाळे थोडी मोठी झाल्यावर त्यांना दूध हवे किंवा नको हा पर्याय ते स्वतः निवडतातएका विशिष्ट वेळेला तुम्ही बाळाला दूध दिले पाहिजेपरंतु कालांतरानेआपले बाळ काही वेळा पोट भरलेले असेल तर प्यायला नकार देऊ शकेलजोपर्यंत त्याचे वजन ठीक आहेतोपर्यंत आपल्याला काळजी करण्याची काही गरज नाहीबाळ जेव्हा तो वेगवान वाढीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतो तेव्हा त्याची भूक वाढेल आणि कदाचित बाळ नेहमीपेक्षा जास्त दुधाची मागणी करू शकेल.

जर तुमचे बाळ एकदा दूध प्यायल्यानंतर पुन्हा खूप वेळाने पुन्हा दूध पीत असेल तर तुम्ही दूध पाजण्याचा दोन वेळांमध्ये ३ ते ४ तासांचे अंतर ठेऊ शकताह्यामुळे तुम्हाला तुमचे स्वतःचे रुटीन तयार करता येईल तसेच थोडी विश्रांती घेता येईल तसेच तुमच्या बाळास चांगले अन्न आणि आराम देखील मिळेलबर्‍याच बदलांमुळे बाळाला त्रास होऊ शकतोम्हणूनच तुम्ही त्याच्यासाठी दिनचर्या लागू करण्याचा प्रयत्न केला पाहिजेजेव्हा त्याला माहित असेल की एकदा दूध दिल्यानंतरपुढील फीड काही तासांनंतर असेलतर तो शांतपणे झोपू शकतोरात्रीसुद्धा कदाचित तुमच्या बाळास तुम्ही झोपत नाही तोपर्यंत झोप येऊ शकत नाहीअशा वेळीआपले बाळ इतर वेळी झोपत नाही हे सुनिश्चित करणे महत्वाचे आहेबर्‍याच मातांना असा अनुभव आहे की त्यांचे बाळ आंघोळ घालताना किंवा दुपारच्या वेळी दूध पिताना झोपायला लागताततसे झाल्यास बाळाला जागे करा आणि क्रियाकलाप पूर्ण कराबाळ कदाचित चिडचिड करेल झोपणार नाहीअसे दोन दिवस चालू राहीलत्यानंतरत्याला वेळ समजेल आणि त्यानुसार झोपायला सुरुवात होईल.

तुमच्या १३ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स

तुमच्या १३ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी तुम्ही इथे दिलेल्या टिप्स पाळल्या पाहिजेत

  • तुमच्या बाळाची त्वचा खूप कोरडी होणार नाही याची काळजी घेऊन काळजी घ्याकोरडी त्वचा कायम राहिल्यास मॉइश्चरायझर्स आणि ह्युमिडिफायर्सचा वापर करा.
  • तुमच्या बाळाला उद्यानात किंवा बागेत बाहेर न्या किंवा जेव्हा आपण सकाळ किंवा संध्याकाळी फिरायला जाता तेव्हा त्याला इतर मुलांशी संवाद साधू द्या.
  • तुमच्या बाळाला निश्चित कालावधीपर्यंत झोपू द्या आणि सर्व क्रियाकलापांचे एक निश्चित वेळापत्रक तयार करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचे बाळ देखील त्याच्याकडे लक्ष देऊ शकेल.

चाचण्या आणि लसीकरण

बाळाने वयाचे ३ महिने पूर्ण केले आहेत आणि वेळेवर लसीकरण करण्याच्या दृष्टीनेत्याला लसीच्या दुसर्‍या फेरीसाठी तयार करण्याची वेळ आली आहेहे इंजेक्शन्सद्वारे किंवा तोंडी औषधे देऊन देखील करता येते.

डीआयपीपी आयपीव्ही एचआयबी आणि हिपॅटायटीस बी ह्या लसी १३ व्या आठवड्यांनंतर दिल्या जातातडिप्थीरियापेर्ट्युसिसटेटॅनसहेमोफिलस इन्फ्लुएंझा आणि हिपॅटायटीस बी तसेच पोलिओ आणि इतर अनेक रोगांची ह्या लसी काळजी घेतातन्यूमोकोकल लस ही न्यूमोकोकल बॅक्टेरियामुळे होणार्‍या संक्रमण आणि आजारांची काळजी घेतेअखेरीसरोटाव्हायरस लसीची पुढील फेरी दिली जातेपरंतु लस केवळ तोंडाद्वारे दिली जाते.

खेळ आणि क्रियाकलाप

तुमच्या बाळाची श्रावण क्षमता बर्‍याच प्रमाणात वाढेलध्वनीसंगीत समजून घेतल्यास वेगवेगळ्या नोट्समध्ये सारखा आवाज कसा येतो हे त्यांना लक्षात येऊ लागतेपरंतु फक्त संगीत वापरण्याऐवजी आपण आपल्या मुलास वातावरण बदलण्यासाठी स्वयंपाकघरात घेऊन जाऊ शकता आणि त्याला एक ड्रमिंग १०१ सत्र देऊ शकताघरातील भांडीप्लॅस्टिक बॉक्सपुठ्ठे बॉक्स किंवा इतरांपेक्षा वेगळी असणारी कोणतीही वस्तू वापराह्या सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी ठेवूनएक लहान काठी किंवा पळी घ्या आणि आवाज करण्यासाठी प्रत्येक वस्तूवर हळूहळू मारावेगवेगळ्या आवाजांमुळे आपल्या बाळाला उत्सुकता वाटेल आणि उत्साह वाढेलकुठला तरी ताल धराकदाचित आपल्या बाळाने देखील टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली असेलमगबाळाचा चेहरा तुमच्याकडे फिरवा आणि त्याच ड्रमबीटचा आवाज काढण्यासाठी तुमच्या तोंडाचा वापर कराहा क्रियाकलाप तुमच्या बाळास बरेच दिवस व्यस्त ठेवेल.

बाळांना पाणी आणि त्याबरोबर खेळायला आवडतेआपल्याकडे बाथटब किंवा त्याहूनही लहान टब असल्यास तो कोमट पाण्याने भरा आणि त्यामध्ये हळूवारपणे आपल्या बाळाला धराबाळाचे डोके नेहमी पाण्याच्या पातळीपेक्षा वर आहे ह्याची खात्री करा आणि पाणी उडवण्यासाठी तुमचे हात वापरानंतर शिडकाव तयार करण्यासाठी त्याचे पाय घ्यापायाने पाण्याचा शिडकाव कसा होतो हे शोधण्यासाठी आपल्या बाळाला थोडा वेळ द्याएकदा बाळाला ते समजल्यावर तुमचे स्नानगृह काही वेळातच वॉटर पार्कमध्ये बदलेल.

खेळ आणि क्रियाकलाप

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

या वयातचबाळांना यीस्टसंबंधित संसर्गाचा त्रास होतो ह्यास इंग्रजीमध्ये थ्रश म्हणतातह्यामध्ये गाल आणि ओठांसह तोंडाच्या आतील भागात पांढरे डाग किंवा ठिपके येतातहे स्तनपान करताना आईकडे देखील जाते आणि स्तनाग्रांना दुखवू शकतेअशी स्थिती असल्यास आपल्या डॉक्टरांशी बोला.

४ थ्या महिन्याकडे वेगाने पुढे जातानाआपले बाळ बर्‍याच उपक्रमांची निवड करण्यास सुरुवात करेल आणि बर्‍याच नवीन गोष्टी शिकेलत्याची वाढ तुम्हाला आश्चर्यचकित करेलत्या सर्व आठवणी जपून ठेवा आणि बाळाबरोबर शक्यतो जास्तीत जास्त वेळ घालवा.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User