चुकीची सकारात्मक गर्भधारणा चाचणी

0 17
चुकीची सकारात्मक गर्भधारणा चाचणी

संभाव्य गर्भधारणा आनंद किंवा चिंता उत्पन्न करू शकतेत्यामुळे आधी खात्री करणे आवश्यक आहेगर्भाधारणा झाली आहे किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी अगदी सोयीस्कर असणाऱ्या आणि घरी करता येणाऱ्या गर्भधारणा चाचणीवर बऱ्याच स्त्रिया अवलंबून असतात आणि ह्या गरोदर चाचणी किट्स फार्मसी आणि इतर अनेक वैद्यकीय स्टोअरमध्ये सहज उपलब्ध असतातयापैकी बहुतेक किट्स तुमच्या लघवीमध्ये असलेले गर्भधारणा संप्रेरक – एचसीजी (मानवी कोरिओनिक गोनाडोट्रोपिनची उपस्थिती शोधण्यासाठी डिझाइन केलेले असतातजरी ह्या चाचण्या ९७ते ९९अचूक असल्याचा दावा केला जात असला तरीक्वचित प्रसंगी तुम्हाला चुकीचेसकारात्मक किंवा नकारात्मक रिझल्ट्स मिळू शकतात.

चुकीची सकारात्मक गर्भधारणा चाचणी म्हणजे काय?

जेव्हा आपली गर्भधारणा चाचणी सकारात्मक परिणाम दर्शवितेपरंतु तुम्ही गर्भवती नसतातेव्हा त्यास चुकीची सकारात्मक (पॉझिटिव्हचाचणी म्हणतात.

चुकीच्या सकारात्मक गरोदरपण चाचणी निकालाची कारणे

तुम्ही आश्चर्यचकित आहात की गर्भधारणा चाचणी चुकीची सकारात्मक का असू शकतेकधीकधीकिट कदाचित त्याचे कार्य अगदी योग्य प्रकारे करीत असेलपरंतु परिणाम वेगवेगळ्या कारणांसाठी अपूर्ण असू शकतातजसे की:

अलीकडील गर्भपात प्रसूती

मागील ८ आठवड्यांत जर तुमची प्रसूती झाली असेल किंवा गर्भधारणा संपुष्टात आली असेल (गर्भपात झालेला असेलतर आपली एचसीजीची पातळी अद्याप तुलनेने जास्त असू शकतेह्या कारणामुळे चाचणी सकारात्मक येऊ शकते कारण गर्भधारणा संपुष्टात आल्यावर ह्या संप्रेरकाची पातळी हळू हळू कमी होते.

रासायनिक गर्भधारणा

रासायनिक गर्भधारणा म्हणजे रोपणानंतर फलित अंड्याचा विकास होत नाही आणि त्याचे गर्भात रूपांतर होत नाहीतांत्रिकदृष्ट्याजरी आपण चाचणी घेता तेव्हा आपण कदाचित गर्भवती असल्याचे निर्देशित केले जात असले तरी ही गर्भधारणागर्भपात होऊन संपुष्टात येतेअंदाजे २५४०गर्भपात झालेले लक्षात येत नाहीत आणि गर्भधारणा संपुष्टात येते.

एक्टोपिक गर्भधारणा

जेव्हा फलित झालेल्या अंड्याचे गर्भाशयाशिवाय इतर कोठेतरी रोपण होते त्यास एकटोपीक गर्भधारणा म्हणतातगर्भाशयाच्या बाहेर जागा नसल्यामुळे गर्भ वाढू शकत नाहीचुकीच्या सकारात्मक गर्भधारणा चाचणीचे एक कारण म्हणजे एक्टोपिक गर्भधारणापण असे झाल्यास ती मेडिकल इमर्जन्सी असतेआपल्याला एखाद्या एक्टोपिक गर्भधारणेबद्दल संशय असल्यासआपण वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

संकीर्ण वैद्यकीय समस्या

अंडाशयमूत्राशयमूत्रपिंडफुफ्फुसस्तन आणि पोटाचे कर्करोग यासारख्या काही वैद्यकीय परिस्थितीगॅस्टेशनल ट्रोफोब्लास्टिक डिसीजओवॅरियन सिस्ट्समूत्रपिंडाचा रोग किंवा मूत्रमार्गात संसर्गअँडेनोमायसिसमुळे एखाद्या महिलेची एचसीजीची पातळी वाढू शकते आणि चाचणीचा चुकीचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

रजोनिवृत्ती

जेव्हा स्त्रियांचे रजोनिवृत्तीमध्ये संक्रमण होते तेव्हा त्यांच्यात बहुतेक वेळा एचसीजी जास्त असतेयामुळे काही वृद्ध स्त्रियांमध्ये चाचणीचा परिणाम चुकीचा सकारात्मक येऊ शकतो.

चाचणीच्या सूचनांचे योग्यरीत्या पालन न करणे

जर आपण निर्मात्याच्या सूचनांचे योग्यरित्या पालन केले नाही तर कदाचित आपणास चाचणीचे परिणाम चुकीचेपॉझिटिव्ह मिळतीलनिश्चित केलेल्या चौकटीत निकाल तपासत आहात ना हे पहिले पाहिजेचाचणी निर्दिष्ट कालावधीपेक्षा जास्त वेळ राहू दिल्यास तुम्हाला सकारात्मक चाचणी रेषेसासारखीमूत्र बाष्पीभवन रेषा गोंधळात टाकू शकते.

सदोष गर्भधारणा चाचणी

कालबाह्य झालेलीकिंवा सदोष गर्भधारणा चाचणी चुकीचे परिणाम देऊ शकतेवापरण्यापूर्वी चाचणीची वैधता तपासून पहा.

खूप लवकर चाचणी करणे

काही अत्यंत संवेदनशील चाचण्या ओव्हुलेशननंतर काही दिवस सकारात्मक रिझल्ट्स दाखवू शकतातम्हणूनचपाळी चुकल्यावर आपण किमान एक आठवडा थांबून चाचणी करावीखोट्या सकारात्मक गर्भधारणेच्या चाचणीसाठी सर्वात लवकर चाचणी करणे हे सुद्धा एक सर्वसामान्यपणे आढळणारे कारण आहे.

दूषित लघवीचा नमुना

जर लघवीच्या नमुन्यामध्ये साबण किंवा रक्तासारख्या कोणत्याही अशुद्धी असतील तर तुम्हाला चाचणीचा निकाल चुकीचा मिळू शकतो.

अशी औषधे जी चुकीच्या सकारात्मक गर्भधारणा चाचणीस कारणीभूत ठरू शकतात

जर ओव्हुलेशनसाठी एचसीजी किंवा गोनाडोट्रॉपिनच्या शॉट्सच्या रूपात प्रजनन उपचार घेत असाल तर आपल्याला चुकीचासकारात्मक चाचणी निकाल मिळू शकेल.

त्याशिवायअँटीसायकोटिक्सअँटीहिस्टामाइन्सचिंताविरोधी औषधेडाययुरेटिक्सपार्किन्सन रोगावरील औषधे आणि मेथाडोनक्लोर्डियाझापोक्साइड किंवा प्रोमेथाझिन यासारखी औषधे चुकीच्या गर्भधारणा चाचणीस कारणीभूत ठरू शकतात.

फॅन्टम एचसीजी चाचणी म्हणजे काय आणि खोट्या सकारात्मक गर्भधारणा चाचणीशी त्याचा कसा संबंध आहे?

फॅन्टम एचसीजी म्हणजे गर्भवती नसलेल्या महिलेची रक्ताची गर्भधारणा चाचणी कारात्मक येणे होयएखाद्या व्यक्तीच्या शरीरातील काही विशिष्ट रसायनांमुळे चाचणीचे परिणाम चुकीचे सकारात्मक येतात.

लघवीची चाचणी नकारात्मक असल्यास तुमची फॅन्टम प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह टेस्ट सकारात्मक येते आहे का हे तुम्ही तपासून पाहू शकता.रक्ताची गरोदर चाचणी चुकीची सकारात्मक येण्याचे कारण काय आहे?

जर तुमची लघवीची गर्भधारणा चाचणी चुकीची पॉझिटिव्ह झाल्याची जाणीव झाल्यासडॉक्टर रक्ताची गर्भधारणा चाचणी करून बघण्याचा सल्ला देतातरक्त चाचणी लघवीच्या चाचणीपेक्षा अगदी सूक्ष्म पातळीवर एचसीजी ओळखू शकते आणि म्हणूनच ती चाचणी अधिक विश्वासार्ह असते आणि म्हणून गर्भधारणा झाली आहे किंवा नाही ह्याचे निदान आधी होते.

परंतु काही कारणांमुळे गुणात्मक एचसीजी रक्त तपासणी देखील चुकीची सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतेलघवी किंवा रक्त चाचणींचे परिणाम चुकीचे पॉझिटिव्ह मिळणे ह्यामागील कारणे सारखीच आहेत.

विशेषतकाही औषधे (वर नमूद केल्याप्रमाणे), ट्यूमर्सगर्भाशयाच्या कर्करोगलघवीमध्ये रक्त किंवा प्रथिने आणि एकाधिक गर्भधारणेमुळे एखाद्या महिलेमध्ये एचसीजीची पातळी जास्त असतेयाव्यतिरिक्तरासायनिक गर्भधारणारजोनिवृत्ती आणि प्रजनन प्रक्रिया देखील अशी काही कारणे देखील आहेत ज्यामुळे गर्भधारणा चाचणीचे परिणाम खोटे सकारात्मक येण्याची शक्यता असते.

जर तुमचे घरी केलेल्या चाचणीचे परिणाम सकारात्मक आले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटून रक्त तपासणीद्वारे निकालाची पुष्टी करणे चांगलेजर तुम्ही गर्भवती असाल तर नियमितपणे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटले पाहिजेतुम्ही तुमच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे महत्वाचे आहे तसेच निरोगी गर्भारपणासाठी तुम्ही डॉक्टरांच्या देखरेखीखाली प्रसुतीपूर्व काळजी घेण्यास सुरुवात केली पाहिजे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User