प्रेमविवाह केल्याचा राग, भावाकडून बहिणीचं खुरप्यानं मुंडकं उडवण्याचा प्रयत्न, कोल्हापूर हादरलं

कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या गुढे गावात ही घटना घडली आहे. गुढे गावात एका मुलीनं घरच्यांच्या मनाविरूद्ध प्रेमविवाह केला. या विवाहाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे संतापलेल्या भावानं आपल्या बहिणीवर प्राणघातक हल्ला करत खुरप्यानं तिचं मुंडकं उडवण्याचा प्रयत्न केला.

0 12
प्रेमविवाह केल्याचा राग, भावाकडून बहिणीचं खुरप्यानं मुंडकं उडवण्याचा प्रयत्न, कोल्हापूर हादरलं

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात एक भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आलाय. बहिणीने घरच्यांच्या मनाविरूद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीवर प्राणघातक हल्ला केला. चक्क खुरप्यानं बहिणीचं मुंडकं उडवण्याचा प्रयत्न केलाय. सुदैवानं या हल्ल्यात बहिण थोडक्यात बचावली आहे. पण या घटनेनं कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

काय आहे घटना?

कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या गुढे गावात ही घटना घडली आहे. गुढे गावात एका मुलीनं घरच्यांच्या मनाविरूद्ध प्रेमविवाह केला. या विवाहाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे संतापलेल्या भावानं आपल्या बहिणीवर प्राणघातक हल्ला करत खुरप्यानं तिचं मुंडकं उडवण्याचा प्रयत्न केलाय मात्र, ती या हल्ल्यात बालंबाल बचावली. खुरप्याने वार केल्यानं बहिणीच्या पाठीवर आणि मानेवर जखमा झाल्या आहेत.

पन्हाळा मार्गावर तरूणाला बेदम मारहाण

पन्हाळ्याच्या गुढे गावात ही थरारक घटना घडलेली असताना दुसरीकडे कोल्हापुरातच पन्हाळा मार्गावर एका तरुणाला बेदम माहराण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वरातीत नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून या तरूणाला मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तरूणाला मारहाण करत असताना टोळक्याने तरूणाची सोन्याची चेन आणि रोख रक्कमही लंपास केल्यासं समोर येत आहे. त्यामुळे या मारहाण करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

गाडी अडवत लाकडी दांडक्याने मारलं

वरातीत नाचल्याचा राग मनात ठेवून संतापलेल्या टोळक्याने आधी तरूणाची गाडी अडवली. त्याला गाडीतून बाहेर काढत त्याच्यावर टोळक्यानं हल्ला केला. लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने तरूणाला रस्त्यावरच बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ कोल्हापुरात व्हायरल होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User