गर्भनिरोधक स्पंज – वापर, प्रभावीपणा, फायदे आणि बरंच काही

0 20
गर्भनिरोधक स्पंज – वापर, प्रभावीपणा, फायदे आणि बरंच काही

कधीकधी काही अप्रत्यक्ष दुष्परिणामांमुळे काही स्त्रियांसाठी जन्म नियंत्रणाच्या सामान्य पद्धती काम करू शकत नाहीतअशा परिस्थितीतकुणीतरी योनि स्पंज किंवा गर्भनिरोधक स्पंजची निवड करू शकतेयोनि स्पंज जन्म नियंत्रणाचे एक साधन आहे जे रिव्हर्सिबल आहेकाही स्त्रिया गर्भधारणा टाळण्यासाठी योनी स्पंज वापरण्यास प्राधान्य देतात कारण बहुतेक औषधांच्या दुकानात ते अगदी प्रिस्क्रिप्शनशिवाय सहज उपलब्ध होतात आणि वापरण्यासही सोपे असताततथापिपुरुष काँडोमच्या तुलनेत योनिमार्गातील स्पंज एचआयव्ही सारख्या लैंगिक संक्रमित रोगापासून (एसटीडीसंरक्षण देऊ शकत नाही.

गर्भनिरोधक स्पंज म्हणजे काय?

गर्भनिरोधक स्पंज हे डोनटच्या आकाराचे स्पंज असतेह्याचा आकार सुमारे दोन इंच इतका असतोहे मऊगोल योनी स्पंज पॉलीयुरेथेन फोमपासून बनविलेले असतेस्त्रियांसाठीचे हे स्पंज नाकेबंदी आणि शुक्राणुनाशक पद्धतींद्वारे गर्भधारणा रोखण्यास मदत करते.

लैंगिक संबंधात गर्भ निरोधक स्पंज योनीमध्ये खोलवर घातलाजातोस्पंज गर्भाशय मुखावर एक संरक्षक आवरण बनवते आणि शुक्राणूंना गर्भाशयात जाण्यापासून थांबवतेप्रत्येक स्पंजमध्ये जोडलेल्या कपड्याचा एक लूप असतो ज्यामुळे ते बाहेर काढणे सोयीचे होतेस्पंज पुन्हा वापरण्यायोग्य नसतो आणि वापरल्यानंतर टाकून द्यावा.

त्याचे कार्य कसे चालते?

स्पंजचे काम डायफ्रामसारखेच असतेस्पंज जन्म नियंत्रणाचे कार्य दोन प्रकारे करतेस्पंजला एक खाच असते ज्यामुळे स्पंज गर्भाशयात घट्ट बसू शकते आणि संरक्षणात्मक अडथळा निर्माण होतो आणि शुक्राणूंचा प्रवेश आत होत नाहीगर्भाशयाच्या मुखामध्ये (म्हणजेच योनी आणि गर्भाशयाच्या दरम्यानचा मार्गप्रवेश करण्यापूर्वी स्पंज वीर्य शोषून घेतो.

योनिमार्गाच्या स्पंजमध्ये शुक्राणूनाशक पदार्थ असतो जो शुक्राणूंना अंड्यात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतोशारीरिक संबंधांपुर्वी स्त्रियांनी स्पंज वापरण्याची योग्य पद्धत अवलंबणे आवश्यक आहेयोनीमध्ये खोलवर घालण्यापूर्वी स्पंजला पाण्यात भिजवून थोडा ओला करणे जरुरी आहेसंभोग करण्यापूर्वी आपण सुमारे २४ तास योनीमध्ये स्पंज घालू शकता.

वापरानंतरआपण लूपच्या मदतीने स्पंज बाहेर खेचू शकतास्पंजचा वापर करताना कॉन्डोमचा वापर केला तरी चालतो किंवा फक्त स्पंज वापरला तरी चालतोतथापिकंडोमसह वापरल्यास गरोदरपणापासून चांगले संरक्षण मिळू शकते

गर्भनिरोधक स्पंजचा प्रभावीपणा

स्पंजचा वापर केल्याने गर्भधारणा टाळण्यास कशी मदत होते ते इथे दिले आहे

गर्भधारणा रोखण्यासाठी स्पंजचा प्रभावीपणा

जेव्हा आपण जन्म नियंत्रणाबद्दल बोलतोतेव्हा गर्भनिरोधक स्पंज बाजारात उपलब्ध असणारी सर्वोत्तम पद्धत असू शकत नाहीपरंतुलैंगिक संबंधात सर्वात प्रभावी होण्यासाठी स्पंजचा योग्य वापर करणे आवश्यक आहेउत्पादनाच्या सूचना योग्यरित्या पाळणे गरजेचे आहे आणि प्रत्येक वेळी शारीरिक संबंध ठेवण्याआधी त्याचा वापर केल्यास त्याची कार्यक्षमता वाढू शकतेपण खरे सांगायचे तर प्रत्येक वेळी त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे पूर्णपणे शक्य होणार नाही.

ज्या स्त्रीने बाळाला जन्म दिलेला नाही आणि स्पंजचा वापर योग्य रित्या करत आहे अशा स्त्रियांच्या बाबतीत यशाचा दार ९१इतका जास्त असतोपरंतु खरे पाहता त्याचा प्रभावीपणा ८८पेक्षा जास्त नसतोपरंतु जर स्त्रीने आधी बाळाला जन्म दिला असेल तर यशाचा दर ८०पेक्षा सुद्धा कमी असतोम्हणून मुले असलेल्या स्त्रियांसाठी ह्या गर्भनिरोधक साधनाची निवड तितकीशी योग्य नाही.

त्यामुळे गर्भनिरोधक स्पंज वापरणाऱ्या १०० स्त्रियांपैकी ९ ११ स्त्रियांना गर्भधारणा राहते.

स्पंजची परिणामकता वाढवण्यासाठी मार्ग

स्पंज प्रभावीपणे काम करण्यासाठीतुम्ही लैंगिक संबंध ठेवण्याआधी स्पंज वापरू शकताशारीरिक संबंध ठेवण्याआधी स्पंज सातत्याने वापरल्यास त्याची कार्यक्षमता वाढतेस्पंजची परिणामकता वाढवण्यासाठी ते गर्भनिरोधक गोळ्या किंवा पुरुषांचे कॉन्डोम ह्यासोबत वापरणे चांगले.

दुसरा मार्ग म्हणजे तुमच्या पतीने आतमध्ये वीर्यस्खलन न करणे आणि योनीत स्खलन होण्याआधीच शिश्न बाहेर काढून घेणे हा होयस्पंज आणि पुरुषांनी कॉन्डोम वापरणे हा सर्वात चांगला मार्ग आहे त्यामुळे लैंगिक संबंधांपासून पसरणारे आजार कमी होतील.

स्पंज मुळे लैंगिक संबंधातून होणाऱ्या आजारांपासून संरक्षण होते का?

स्पंजमुळे लैंगिक संबंधांपासून पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळत नाहीउलटपक्षीस्पंज मुळे एचआयव्ही सारख्या आजारांचा धोका जास्त असतोशुक्राणूनाशक स्पंजची परिणामाकता लक्षणीयरीत्या कमी होते कारण स्पंजवर असलेल्या शुक्राणूनाशक आवरणामध्ये नोनोकझिनॉल ९ सारख्या रसायनामुळे योगनिमार्गाच्या भित्तिकांना इजा होते आणि त्यामुळे एसटीडी पसरवणारे जिवाणूंचा योनीमार्गातून सहज शरीरात प्रवेश होतोत्यामुळे एसटीडीना आळा घालण्यासाठी तुम्ही त्याची नियमितपणे तपासणी करून घेणे चांगले.

स्पंज कसा वापरावा?

प्रभावी जन्म नियंत्रणासाठी स्पंजचा योग्य वापर तितकासा अवघड नाहीएकदा तुम्ही तो वापरण्याचा पुरेसा सराव केला की स्पंज वापरणे सोपे आहेस्पंज घालणे हे टॅम्पॉन योनीमध्ये ढकलण्यासारखे आहे.

गर्भनिरोधक स्पंज घालणे

स्पंज वापरताना खालील गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत.

  • स्पंज घालण्यापूर्वी पाणी आणि साबणाने व्यवस्थित हात धुणे महत्वाचे आहे
  • स्पंजचे आवरण काढून टाकल्यानंतर थोडे पाणी घालून स्पंज ओला करा
  • स्पंज काही वेळा किंवा फेस होईपर्यंत हलके पिळून घ्याशुक्राणूनाशक सक्रिय होण्यासाठी स्पंज संपूर्ण ओले होणे आवश्यक आहे
  • स्पंज पिळून कोरडे पडू नये ह्याची काळजी घ्या
  • स्पंजची उपयोगाची बाजू वरच्या बाजूस ठेवून कडांना वळा (जसे की आपण एखादी गोष्ट अर्ध्यावर दुमडली आहेजेणेकरून स्पंज लांब आणि निमुळता होईलस्पंजची उपयोगाची बाजू शरीराच्या दिशेने आणि स्पंजला जोडलेले लूप विरुद्ध बाजूस असावे
  • एखाद्या खुर्चीच्या काठावर तुम्ही स्वतःस संतुलित ठेवून आरामदायक स्थितीत बसण्याचा प्रयत्न करातुम्ही झोपून किंवा उभे राहून एक पाय खुर्चीवर ठेवून स्पंज घालू शकता
  • आपल्या बोटाच्या मदतीने स्पंज योनीत खोल ढकलाशक्य तेवढा तो वर सरकवून पहातुम्ही स्पंज सोडल्यावर तो आपोआप उलगडेल आणि घट्ट बसेल आणि गर्भाशयाचे मुख झाकले जाईल
  • आपली बोटे सर्वत्र आणि स्पंजच्या काठावर फिरवून स्पंजने गर्भाशयाचे मुख नीट झाकले गेले आहे ह्याची खात्री करातसेचलूप स्पंजच्या तळाशी असल्याचे सुनिश्चित करा

तुम्ही प्रत्येक तपशील लक्षात ठेवण्याचा ताण घेऊ नकासर्व उत्पादनांवर तपशीलवार सूचना असतातत्यांचे पालन केल्यास तुम्हाला स्पंजचा वापर योग्य रित्या करता येऊ शकेल.

स्पंज आतमध्ये केव्हा घालू शकतो?

संभोगाच्या आधी २४ तास तुम्ही स्पंज आतमध्ये घालू शकताशुक्राणूनाशक सक्रिय झाल्यावर आणि योनीमार्गात घातल्यानंतर स्पंज कार्य करण्यास तयार असतोम्हणूनशारीरिक संबंध ठेवण्याच्या आधी गर्भनिरोधक घातले पाहिजेएकदा योनीमार्गात स्पंज घातल्यानंतर तुम्ही पुढचे २४ तास कुठलाही व्यत्यय न येता तुम्हाला हवे तेवढे वेळा शारीरिक संबंध ठेवू शकताह्या कालावधीत तुम्हाला स्पंज बदलण्याची गरज नाही.

आतमध्ये किती काळ तुम्ही स्पंज ठेवू शकता?

संभोगानंतर तुम्ही कमीत कमी ६ तास स्पंज आतमध्ये तसाच ठेवला पाहिजेपरंतु एकूण ३० तासांपेक्षा जास्त काळ स्पंज आतमध्ये राहता कामा नयेएकूण ३० तास स्पंज आत ठेवण्याची सक्ती नाही परंतु सुरक्षिततेसाठी लैंगिकतेनंतर ६ तास पाळले पाहिजे.

स्पंज काढणे

तुम्ही हात काळजीपूर्वक धुतल्यानंतरतुमच्या योनीमध्ये बोट सरकवा आणि ते स्पंजच्या लूपमध्ये घालामग लूपच्या मदतीने अगदी हळूवारपणे आणि स्थिरतेने स्पंजला योनीतून बाहेर काढाजर तुम्हाला स्पंजचे लूप सापडत नसेल तर तुम्ही स्पंजला पकडू शकता आणि हळू हळू त्यास सरकवू शकतातुम्हाला स्पंजपर्यंत पोहोचण्यात अडचण येत असल्यासयोनिमार्गाच्या स्नायूंच्या मदतीने तेथे पोहोचण्याचा प्रयत्न करावापरलेल्या स्पंजची कचरापेटीत टाकून काळजीपूर्वक विल्हेवाट लावावीटॉयलेटमध्ये फ्लश करू नये.

गर्भनिरोधक स्पंज किती सुरक्षित आहे?

  • जन्म नियंत्रण स्पंजचा वापर सामान्यपणे सुरक्षित मानला जातोपरंतु काही स्त्रिया काही विशिष्ट दुष्परिणाम अनुभवू शकतात
  • काही स्त्रियांना त्यांच्या योनीत बोट घालणे आवडत नाही
  • काही वेळास्त्रियांना योनीच्या आत स्पंज योग्यरित्या घालणे कठीण वाटू शकते
  • मासिक पाळीच्या वेळी स्पंज वापरणे टाळा
  • त्याच्या सुरक्षित वापराबद्दल काही शंका असल्यासगर्भनिरोधक स्पंज वापरण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

स्पंजचे धोके काय आहेत?

तुमच्याकडे खालील वैद्यकीय समस्या असल्यास,स्पंजचा वापर टाळता येऊ शकेल:

  • तुम्ही पॉलीयुरेथेनशुक्राणूनाशकसल्फाइटस इत्यादींना संवेदनशील किंवा ऍलर्जिक असल्यास
  • टीएसएसचा वैद्यकीय इतिहास असल्यास (टॉक्सिक शॉक सिंड्रोम)
  • नुकताच गर्भपात किंवा बाळाचा जन्म झालेला असल्यास
  • योनीला संसर्ग झालेला असल्यास
  • योनीतून रक्तस्त्राव होत असल्यास

स्पंज वापरताना आपल्याला खाली सूचीबद्ध असलेल्या लक्षणांपैकी काही आढळल्यास त्याचा वापर बंद करा आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधाती लक्षणे अशी असू शकतात:

  • अनपेक्षित तीव्र ताप
  • अतिसार
  • उलट्या होणे
  • लाल पुरळ उठून त्याला खाज सुटणे आणि सनबर्न सारखे दिसते
  • घशात वेदना किंवा खवखव
  • सांधे आणि स्नायू दुखणे
  • चक्कर येणे आणि अशक्तपणा वाटणे

जन्म नियंत्रण स्पंजचे फायदे

खालील फायद्यांमुळे बर्‍याच स्त्रियांना जन्म नियंत्रण स्पंजची निवड करणे आवडते:

  • बर्थ कंट्रोल स्पंज स्वस्त असल्याने तसेच त्याचा आकार लहान असल्यामुळे सोबत ठेवणे सोयीचे आहेहे फक्त कोणत्याही पर्समध्ये किंवा खिशात बसू शकते.
  • जेव्हा योग्यरित्या घातले जातेतेव्हा कदाचित आपल्यास किंवा आपल्या जोडीदारास स्पंज आहे हे समजणार देखील नाही
  • स्त्रीच्या नैसर्गिक संप्रेरकांवर त्याचा काही परिणाम होणार नाही
  • हे आपण स्तनपानादरम्यान वापरू शकता
  • बहुतेक औषधांच्या दुकानात प्रिस्क्रिप्शनविना ते सहज खरेदी करता येते
  • कोणतीही अडचण न येता तुम्ही ऑनलाइन खरेदी करू शकता
  • जन्म नियंत्रण स्पंजच्या वापरास डॉक्टरांच्या हस्तक्षेपाची आवश्यकता असू शकत नाही कारण आक्रमक शस्त्रक्रिया किंवा फिटिंगची आवश्यकता नसतेते तुम्ही स्वतःच घालू शकता
  • हे तुम्हाला २४ तासांपर्यंत गर्भधारणा संरक्षण देऊ शकते
  • बर्थ कंट्रोल स्पंज मुळे तुम्हाला गर्भधारणेपासून संरक्षण मिळते कारण तुम्ही ते लैंगिक संबंधांच्या अगोदर योनीमध्ये ठेवू शकता आणि ३० तासांपर्यंत तो तसाच राहिला तर चालते
  • स्पंज वापरणे सोपे आहे आणि यामुळे तुमची किंवा तुमच्या जोडीदाराची गैरसोय होत नाही
  • त्याचा वापर थांबविणे तितकेच सोपे आहेतुम्ही गर्भवती होऊ इच्छित असल्यास,लैंगिक संबंधांच्या वेळेला स्पंजचा वापर करू नका
  • योनीत स्पंज ठेवल्यानंतरतुम्ही पुढचे २४ तास कुठलाही व्यत्यय न येता बर्‍याचदा सेक्स करू शकता

तोटे

जन्म नियंत्रणाच्या इतर सर्व पद्धतींप्रमाणेच स्पंजचेही काही तोटे असू शकतातजरी बहुतेक स्त्रियांना सामान्यतस्पंज वापरणे सुरक्षित वाटत असले तरी काही स्त्रियांनी गर्भनिरोधक स्पंजचे दुष्परिणाम देखील नोंदवले आहेतत्याचे काही तोटे खालीलप्रमाणे असू शकतातः

  • योनीमध्ये स्पंज घालताना काही स्त्रियांना गैरसोय किंवा अडचण येऊ शकतेस्पंजचा योग्य वापर करण्याची कौशल्ये शिकण्यासाठी त्याचा सराव करावा लागू शकतो
  • कधीकधी योनीतून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान स्पंजचे लूप मध्येच तुटू शकतेअशा परिस्थितीतत्याचे अवशेष काढून टाकण्यासाठी वैद्यकीय मदत घेणे जरुरीचे आहे
  • स्पंजमधील शुक्राणूनाशकांमुळे काहीवेळा योनीमध्ये जळजळ होण्याची शक्यता असते
  • कधीकधी आपण स्पंज वापरत असल्यासलैंगिक संबंधांदरम्यान घाण वाटू शकते कारण आपण आपल्या योनीमध्ये घालण्यापूर्वी स्पंज थोडा ओला करून फेस येणे आवश्यक आहे
  • स्पंजची परिणामकता प्रत्येक वेळी आपण संभोग करताना त्याच्या योग्य वापरावर अवलंबून असतेप्रत्यक्षात स्पंजचा योग्य वापर करणे प्रत्येक वेळी सोपे नसतेम्हणूनचएखाद्याला जन्म नियंत्रणाची एक प्रभावी पद्धत म्हणून स्पंजच्या परिणामकतेबद्दल खात्री देऊ शकत नाही
  • कधीकधी स्पंजचा वारंवार आणि सतत वापर केल्याने काही स्त्रियांना संभोग करताना योनीमध्ये कोरडेपणा जाणवू शकतो कारण स्पंज योनीतील ओलावा शोषू शकतो
  • एकदा स्पंज वापरल्यानंतर पुन्हा वापरता येणार नाही
  • लैंगिक संबंधांच्या प्रत्येक वेळी स्पंज वापरणे गरजेचे आहे
  • आपण संभोग केल्यानंतर केवळ ६ तासांनंतर स्पंज काढू शकताएकूण ३० तासांपेक्षा जास्त काळ स्पंज योनीमध्ये असू शकत नाही.
  • स्पंज आपल्याला लैंगिक आजारांपासून संरक्षण देत नाही
  • स्पंजचा सतत वापर केल्याने एचआयव्ही आणि अशा इतर संसर्गाचा धोका वाढू शकतो कारण स्पंजमधील शुक्राणूनाशकामुळे योनीच्या भित्तिकांना जळजळ होऊ शकते ज्यामुळे शरीरात एसटीडी जंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
  • काही स्त्रियांस नॉनऑक्सिनॉल ९ ची ऍलर्जी असू शकतेस्पंजच्या शुक्राणूनाशकातील ह्या रासायनिक पदार्थामुळे अस्वस्थता आणि चिडचिड होऊ शकते
  • ज्या स्त्रिया स्पंजचा वापर गर्भनिरोधक पद्धती म्हणून करतात त्यांना टीएसएस (टॉक्सिक शॉक सिंड्रोमनावाचा एक दुर्मिळ पण धोकादायक रोग होण्याचा धोका असतो
  • स्पंजची शुक्राणूनाशकाची चव अप्रिय वाटेल

आपण ते कोठे खरेदी करू शकता?

शुक्राणूनाशक स्पंज बहुतेक औषधांच्या किंवा केमिस्टच्या कोणत्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय खरेदी करता येतोगर्भ निरोधक स्पंज ऑनलाइन देखील उपलब्ध आहे.

गर्भनिरोधक स्पंजची किंमत तुम्ही कुठे राहता आणि जेथे खरेदी करीत आहात त्यानुसार वेगळी असू शकतेउदाहरणार्थअमेरिकेमध्ये मध्ये जन्म नियंत्रण स्पंजचा प्रचलित ब्रँड म्हणजे द टुडे स्पंज‘ ह्याची किंमत तीनच्या पॅक साठी १५ डॉलर आहेपरंतु सामुदायिक आरोग्य केंद्रे किंवा क्लिनिकमध्ये विनामूल्य स्पंज किंवा कमी किंमतीचे स्पंज उपलब्ध असू शकतात.

गर्भनिरोधक स्पंज योग्य पद्धतीने आणि सातत्याने वापरणे अत्यावश्यक आहेविश्वसनीय जन्म नियंत्रण पद्धत म्हणून त्याचा प्रभावीपणा निश्चित करण्याचा हा एकमेव मार्ग आहेउत्पादनाच्या सूचनांचे पालन केल्यास स्पंजचा योग्य वापर करण्यास मदत होईलसराव करूनयोग्यप्रकारे त्याचा वापर करण्यास सोपे जातेस्पंजला सातत्याने वापरणे शक्य नसल्यास तुम्ही जन्म नियंत्रणाची इतर पद्धती निवडू शकता जी तुलनात्मकपणे वापरण्यास सोपी असू असतेइम्प्लांट्स किंवा आययूडी सारख्या गर्भनिरोधक पद्धती अधिक विश्वासार्ह असतातकोणत्याही परिस्थितीतस्पंज वापरताना पुरुषांनी कॉन्डोम वापरल्याने आपल्याला गर्भधारणेपासून आणि एसटीडी पासून उत्कृष्ट संरक्षण मिळते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User