ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचा दामाजीवर विश्वास
ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचा दामाजीवर विश्वास संचालक श्री।सचिन शिवशरण
तालुक्यातील एकमेव सहकारी तत्वावर चालु असलेला श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना सभासदांची दिशाभुल करुन बंद पाडण्यासाठी विरोधकांनी शक्य तेवढे प्रयत्न केले। हंगामाच्या सुरुवातीला हे संचालक मंडळ मागील बिल
देणार नाही। कारखाना चालु होणार नाही। अशा अफवा विरोधकांनी उठवल्या। अनंत अडचणीवर मात करुन ऊसाचे बिल देवुन कारखाना चालु केला। मोठया प्रमाणावर व अवकाळी पाऊस झाल्याने ऊसाचे रिकव्हरीवर परिणाम झालेला संपुर्ण जिल्हा पाहतोय। राज्यातील सर्व साखर कारखान्यांचा दैनिक गाळप,साखर उत्पादन व साखर रिकव्हरी रिपोर्ट शासनाकडे जात असतो। तो रिपोर्ट पाहुन देशमुख यांनी आरोप केले असते तर बरे झाले असते। जिल्हयातील इतर कारखान्यांची रिकव्हरी पाहिली तर दामाजी कारखान्याचे रिकव्हरीबाबत वस्तुस्थिती सभासद शेतकÅयांचे लक्षात येईल। कारखान्याचा हंगाम चांगल्या प्रकारे चालु झालेने विरोधकांना बोलायला जागा नसल्याने सभासदांना भडकावुन बिनबुडाचे आरोप करुन
कारखान्याची आगामी होणारी निवडणुक डोळयासमोर ठेवून सभासदांची दिशाभूल करण्याकरता दामोदर इंगळे(देशमुख) खोटे आरोप करत असलेचे मत कारखान्याचे संचालक श्री सचिन शिवशरण यांनी व्यक्त केले। सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कारखाना कार्यक्षेत्रात नेहमी कमी ऊस क्षेत्र असते। परंतु या हंगामाकरिता वेळेवर व भरपूर प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यात मोठया प्रमाणात ऊस उपलब्ध आहे। आमचे संचालक मंडळ ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा उपलब्ध करुन चांगल्या प्रकारचे गाळप करण्याचे प्रयत्न करीत आहे। चालु हंगामाकरिता राज्य बँकेकडून दामाजी कारखान्यास अल्पमुदत कर्ज मिळु नये यासाठी कोणी प्रयत्न केले? कोणी अडचण आणली? हे देशमुख यांनी सभासदांसमोर जाहिर केले तर बरे होईल। बँकेचे कर्ज न मिळाल्यामुळे एफआरपी देणेसाठी थोडाफार विलंब झाला असला तरी इतर कारखान्याच्या बरोबरीने एफआरपी पूर्ण करुन गळीत हंगाम चांगल्या प्रकारे चालु आहे। मागच्या हंगामातील एफआरपी पुर्ण करुन गाळप परवाना घेवुन कारखाना सुरु केला असलेने आपला कारखाना रेडझोन मध्ये राहिलेला नाही। सभासदांच्या हितासाठी तसेच तालुक्यातील कोणत्याही ऊस उत्पादक शेतक-यांचा ऊस गळीतावाचुन राहू नये म्हणून प्रसंगी तोटा सहन करुन कारखान्याने गळीत हंगाम चालु केला आहे। कारखान्याकडे एकही सहप्रकल्प नसताना मागील चारही हंगामातील एफआरपी पुर्ण केली असुन प्रसंगी जादा ऊस बिलही दिले आहे। सन २०२०-२१ हंगामाची एफ आर पी रु।२११९।०६ प्रतिटन प्रमाणे पुर्ण केली आहे। कारखान्याने गळीत हंगामात उत्पादन झालेले प्रेसमडपासुन खत बनवुन दोन वर्षे सभासद शेतकÅयांना सवलतीचे दराने विक्री केले असुन मागील हंगामात रु।८००/- प्र।मे।टन या सवलतीचे दराने सभासद शेतकÅयांना विक्री केले
असलेची नोंद श्री। देशमुख यांनी करुन घ्यावी। आसपासच्या इतर कारखान्याच्या तुलनेत दामाजी कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळाने शेतकÅयांना नेहमी आधार देण्याचे काम केले आहे। दामाजी कारखान्याचे सभासद सुज्ञ असुन त्यांचा कारखान्याचे संचालक मंडळावर विश्वास आहे। स्वतःला आण्णा हजारे समजुन चालणार नाही त्यासाठी लागणारे विचार आचरणात आणणेची गरज असते। तालुक्यातील गोरगरीब शेतकÅयांना बळीराजा पतसंस्थेमार्फत कर्ज देवून दुष्काळी व कोरोना या संसर्गजन्य आजाराने शेतकरी भयभीत झाला असताना व दामाजी कारखान्याचे तोडणी वाहतुक यंत्रणेसाठी आपल्या पतसंस्थेने आपल्याच संचालक पदाचे काळात पुरवठा केलेले कर्ज शेतकरी फेडू शकत नाही हे माहित असताना सुध्द्ा शेतक-यांना सवलत देण्याऐवजी पतसंस्थेचे कर्ज वसुलीसाठी कोर्टात दावे दाखल केले व आपल्या मुलाच्या वकिली व्यवसायाची भरभराट केली। याशिवाय आपले दामाजी कारखान्याचे संचालक पदाचे काळात तोडणी वाहतुक यंत्रणेला दिलेल्या कर्जाचे पुर्नगठण करणेबाबत पतसंस्थेने दामाजी कारखान्यास लेखी मंजुरीपत्र दिले। सदर कर्जाचे पुर्नगठण करणेसाठी रु। २ कोटी ५० लाख कर्ज भरुन घेतले व कर्जाचे पुर्नगठन करणेस टाळाटाळ करुन कारखान्यास अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सदरहु ऊस तोडणी वाहतुक ठेकेदांरांवर कर्जवसुलीसाठी दावे दाखल करुन एकतर्फी निकाल घेवुन त्यांच्या ७/१२ उताÅयावर बोजा चढविण्याचे पाप करुन आपल्या मुलाचा वकीली व्यवसाय वाढविला।
कारखाना व्यवस्थापन व कामगार यांचेमध्ये वेळोवेळी चर्चा होवुन पगाराबाबत सामंजस्याने कामकाज चालु आहे। पगाराचा मुदद्ा घेवुन कामगारांची सहानुभुती मिळवणेसाठी प्रयत्न करित आहात। आपले संचालक मंडळाचे काळात कामगारांना
पगार कमी असतानासुध्द्ा बरेच महिने पगार थकीत होते याची आठवण असावी। कारखाना स्थापनेपासुन कारखान्यातील कामगार राजकीय दबावाला बळी पडले नाहीत व स्वार्थ साधला नाही।याची दुर्दैवाने आपणास कल्पना नसावी असे वाटते।
आपले संचालक पदाचे काळात काढलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे थकीत कर्जाची परतफेड आम्ही करित आहोत। आपण संचालक असताना किंवा आजपर्यंतच्या काळात कोणत्याही सहप्रकल्पाचा साधा प्रस्तावही दिला नाही। वास्तविक पाहता साखर कारखानदारी सध्या फारच अडचणीत असताना सुध्दा आम्ही पाचही गळीत हंगाम यशस्वी केले आहेत। कारखान्याची निवडणुक डोळयासमोर ठेवून दिशाभुल करण्याचे विरोधकांचे कुटील कारस्थान दामाजीचा सभासद कदापी सहन करणार नाही याची आम्हास खात्री असलेचे मत श्री सचिन शिवशरण यांनी व्यक्त केले।

संचालक श्री।सचिन शिवशरण
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)