२२ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहारतक्ता आणि पाककृती

0 8
२२ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहारतक्ता आणि पाककृती

पहिल्यांदाच पालक होत असल्यास बाळाला भरवणे हे आव्हानात्मक वाटू शकते१८२२ महिने ह्या वयोगटातील मुले ही खूप खेळकर आणि सक्रिय असतातत्यांना त्यांच्या आवडीच्याच गोष्टी खायच्या असतात त्यामुळे त्यांना पोषक आहार खायला लावणे म्हणजे तुमच्या साठी खूप अवघड होऊन बसतेजर तुमचे २२ महिन्यांचे बाळ तुम्हाला पोषक आहार घेण्यास त्रास देत असेल तर हा लेख वाचाह्या लेखामध्ये अन्नपदार्थांचे काही पर्याय आणि पाककृती दिल्या आहेत ज्या तुम्ही तुमच्या २२ महिन्यांच्या मुलाला देऊ शकता.

२२ महिने वयाच्या मुलासाठी पोषणाची गरज

बाळाची निरोगी वाढ आणि विकास व्हावा म्हणून बाळाला योग्य पोषण हे अत्यावश्यक आहेपालक म्हणून तुम्ही बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासास लागणारी पोषणमूल्ये मिळत आहेत ना ह्याची खात्री करा२२ महिन्यांच्या बाळाला लागणारी वेगवेगळी पोषणमूल्ये आणि बाळाची वाढ आणि विकासात त्यातील प्रत्येकाचा सहभाग खालीलप्रमाणे आहे.

प्रथिने

शरीराच्या टिश्यू आणि स्नायूंच्या विकासासाठी प्रथिनांचा महत्वाचा सहभाग आहेवाढत्या बाळाच्या शरीरातील टिश्यू आणि स्नायू निर्मिती आणि दुरुस्तीसाठी प्रथिने मदत करतात.

कर्बोदके

दिवसभर सक्रिय राहण्यासाठी कर्बोदके बाळास ऊर्जा देतातकर्बोदकांमुळे बाळाच्या मेंदूचा विकास पण चांगला होतोवाढणाऱ्या बाळाने दिवसभरात ६ वेळा कर्बोदके घेतली पाहिजेतबाळाची कर्बोदकांची गरज भागण्यासाठी तुम्ही बाळाला संपूर्ण धान्यब्रेडसीरिअलपास्तामका आणि गहू दिले पाहिजेत.


चरबी

बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी चरबी गरजेची आहेचरबीमुळे स्नायूंची हालचाल होते आणि पेशी तयार होण्यास मदत होतेत्यामुळे तुमच्या बाळाला निरोगी चरबी असलेले अन्नपदार्थ देण्यास संकोच बाळगू नकातुम्ही बाळाला तूपऑलिव्ह ऑइलआणि बटर देऊ शकतामुलांना दररोज ३ टीस्पून चरबी मिळाली पाहिजे.

व्हिटॅमिन

शरीराची पचनक्रियाहाडे आणि स्नायूंची दुरुस्तीप्रतिकारप्रणालीचा विकास ह्या सगळ्यामध्ये व्हिटॅमिन्सचा महत्वाचा सहभाग असतोत्यामुळे वाढत्या बाळासाठी ते लागणारे पोषणमूल्य आहेतुम्ही बाळाला दूधचीझअंडीफळे आणि भाज्या देऊ शकतामुलांना दिवसातून कमीत कमी १ कप शिजवलेल्या भाज्या आणि १ कप फळे दिली पाहिजेत.

२२ महिने वयाच्या मुलासाठी पोषणाची गरज

व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन डी

गुणसूत्रांची निर्मितीतांबड्या रक्तपेशींची निर्मितीमेंदूचे कार्य सुरळलीत चालावे म्हणून व्हिटॅमिन बी १२ हे महत्वाचे आहेहे नैसर्गिकरित्या भाज्यांमध्ये नसतेम्हणून शाकाहारी लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला व्हिटॅमिन बी १२ च्या गोळ्या दिल्या पाहिजेतव्हिटॅमिन बी १२ असलेले अन्नपदार्थ सुद्धा बाळाला दिले पाहिजेत जसे की दुग्धजन्य पदार्थमांसमासे इत्यादीशरीर व्हिटॅमिन डी ची निर्मिती करते आणि सूर्यप्रकाश उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्य करतेतुमच्या बाळाला सकाळी किंवा संध्याकाळी पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो आहे ना ह्याची खात्री करा.

खनिजद्रव्ये

शरीराच्या वेगवेगळ्या कार्यासाठी खनिजद्रव्ये महत्वाची आहेतलोहकॅल्शिअमफॉस्फरससोडियमकॉपरक्लोराईडसल्फरजस्तसेलेनियम वगैरे हे आवश्यक आहेतही सगळी खनिजद्रव्ये बाळाच्या आरोग्यपूर्ण विकासासाठी लागतातही खनिजद्रव्ये दुग्धजन्य पदार्थफळेभाज्यामांस मासेसुकामेवाहिरव्या पालेभाज्या ह्यांच्या मध्ये आढळतात.

तंतुमय पदार्थ

पचनसंस्था निरोगी राहण्यासाठी तंतुमय पदार्थ जरुरी आहेततंतुमय पदार्थांमुळे अन्नपदार्थ पुढे सरकतात आणि पचन चांगले होतेमुलांसाठी तंतुमय पदार्थांमध्ये साल न काढलेले सफरचंदपेअरकेळीबियांसहित बेरी आणि संपूर्णधान्य जसे की ओटस आणि दही ह्यांचा समावेश होतो.

पाणी

बाळाने सजलीत राहणे हे महत्वाचे आहेबाळाच्या वजनाच्या ६०वजन हे पाण्याचे असते१ ते ३ वर्षे वयाच्या मुलांना १ लिटर पाणी लागतेबाळाने घ्यायावयाच्या द्रवपदार्थांमध्ये सूपज्यूसदूध ह्यांचा सुद्धा समावेश होतोपरंतु पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

२२ व्या महिन्यांत बाळाला किती अन्नाची गरज असते?

२२ व्या महिन्यात बाळाचे पोट म्हणजे त्याच्या बंद केलेल्या मुठीच्या आकाराएवढे असतेम्हणून तुम्ही मोठ्या माणसाइतके बाळाने खाल्ले पाहिजे अशी अपेक्षा करता कामा नयेबाळाचे जेवण कमी ठेवासरासरी २२ महिन्यांच्या बाळाला त्यांच्या आकार आणि सक्रियतेच्या पातळीनुसार १००० १४०० कॅलरी अन्न दिवसाला लागतातह्यामध्ये ८०८५ ग्रॅम्स संपूर्ण धान्य१ कप भाज्या१ कप फळे२ काप दूध (४५०५०० मिलीआणि ५५ ग्रॅम्स मांस आणि बीन्स लागतात.

२२ महिन्यांच्या बाळाला लागणारे सर्वोत्तम अन्नपदार्थ

२२ महिन्यांच्या बाळासाठी इथे काही पोटभरीचे आणि पोषक अन्नपदार्थांचे पर्याय दिले आहेत.

भाज्यांचे पराठे

पनीरगाजरकॉलीफ्लॉवर आणि उकडलेले बटाटे भरून बाळासाठी छोटेतळव्याच्या आकाराचे पराठे तुम्ही करू शकतात्यासोबत एक छोटा चमचा तूप घालात्यामध्ये कर्बोदकेतंतुमय पदार्थ आणि इतर भरपूर पोषणमूल्ये असतात आणि बाळाला त्यांच्या विकासास मदत करतात.

चीझ डोसा

नेहमीप्रमाणे डोसा करा आणि त्यामध्ये चीझ किसून टाकातुमच्या बाळाला ते आवडेलतथापितुमच्या बाळासाठी छोटा डोसा कराबाळ तो पटकन खाऊन टाकेलचीझमुळे बाळाला कॅल्शिअम मिळते ते बाळाच्या हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असतेबाळाला दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी नाही ह्याची खात्री करा.

व्हेजिटेबल इडली

व्हेजिटेबल इडली

साध्या इडल्यांऐवजीइडलीच्या पिठात कुस्करलेला मटार किंवा किसलेला कोबीगाजर घाला आणि मग उकाडाह्या भाज्या घातल्यामुळे बाळाला भरपूर व्हिटॅमिन कव्हिटॅमिन बी ६ मिळेल जे बाळाच्या केसनखे इत्यादींसाठी महत्वाचे आहे.

भाज्या आणि चिकन घातलेले अप्पम

ही डिश नेहमीपेक्षा वेगळी आहे पण पोषक सुद्धा आहेचिकन सूप आणि व्हेजिटेबल सूप यांच्यासोबत तांदळाच्या पिठापासून केलेले अप्पम म्हणजे तुमच्या बाळासाठी पोषणमूल्यांचे एक संपूर्ण पॅकेज आहेसूप मध्ये जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात ज्यामुळे तुमच्या बाळाची बाळाची पचनसंस्था चांगली रहाते.

भाज्या घालून केलेली खिचडी

भात आणि मसूर दोन्ही मुलांसाठी चांगले असतातआणि भाज्या घालून खिचडीचा अजून फायदा होतोभारतीय घरांमध्ये हे मुख्य पोषण आहेआणि गरम गरम वाढल्यास मुलांना सुद्धा खिचडी आवडतेभात आणि मसूर हे दोन्ही सुद्धा अतिशय उपयोगी प्रथिने असून बाळाच्या विकासासाठी ते उत्तम आहेत.

भाज्यांचे काप कबुली चण्याच्या पेस्ट सोबत

लहान मुलांना कबुली चणे वाटून त्याची पेस्ट केलेली खूप आवडतेबाळाच्या मेंदूच्या आणि डोळ्यांच्या विकासासाठी त्याची मदत होतेतो लोहाचा सुद्धा उत्तम स्रोत आहे आणि तुमच्या बाळाला शिजवलेल्या भाज्यांचे काप त्यासोबत खायला खूप आवडतील.

हंगामी फळे

तुमच्या मुलाला बाजारात उपलब्ध असलेली हंगामी फळे द्यात्यामुळे बाळांना वेगवेगळ्या फळांमधून बरीच पोषणमूल्ये मिळाल्याची खात्री होईलफळांचे पोषणासाठी वेगवेगळे फायदे होतील आणि त्यामुळे आरोग्य चांगले राहीललोहाचा एक चांगला डोस घेतल्यास तांबड्या पेशींच्या निर्मितीस मदत होते आणि तंतुमय पदार्थांमुळे बाळाच्या पचनसंस्थेस आराम पडतो.

जेवण संयोजन

छोले भटुरेपालक पनीररोटीडाळ भात आणि भेंडीची भाजी तसेच टोमॅटोची चटणी आणि डोसा हे बाळाला देऊन पहाह्या प्रत्येक पदार्थाचे काही विशिष्ट फायदे आहे जसे की छोले हे प्रथिनांनी समृद्ध असतातपालकामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असतातह्यामुळे बाळाचे स्नायू विकसित होतात आणि बाळाची निरोगी वाढ होते.

टोमॅटोकांदा आणि चीझ घालून अंडा भुर्जी

टोमॅटो, कांदा आणि चीझ घालून अंडा भुर्जी

कांदाटोमॅटो परतून त्यामध्ये अंडी फोडून घाला अंडाभुर्जी करावरून चीझ किसून घालाअंडीलोह चरबी आणि प्रथिनांनी समृद्ध आहेत आणि वाढत्या बाळासाठी हे फार महत्वाचे आहे.

१०सँडविचेस

मऊ चीझकाकडी आणि गाजर घातलेली सँडविचेस बाळासाठी पोषक असतातकाकडी आणि गाजर हे तंतूंचे चांगले स्रोत आहेततुम्ही बाळाला देण्याआधी काकडीचे साल काढून टाकत आहात ना ह्याची खात्री करा.

२२ महिन्यांच्या बाळासाठी आहार तक्ताआहार योजना

२२ महिन्यांच्या बाळासाठी खाली आहार तक्ता – भारतीय:

  • २२ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना – १ ला आठवडा

दिवस न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला ढोकळा कापलेली फळे गाजरपालक रायता आणि मेथीचा पराठा उकडलेले रताळे आणि चाट मसाला चिकन सूप आणि हक्का नूडल्स
दिवस २ रा अंड्याचा पराठा आणि केशर वेलची दूध केळंशेंगदाणा लाडू अप्पेभाज्यांचे सूप बीटरूट रायता गव्हाची बिस्किटे आणि दही पालक डीप पोळी +भाजी डाळ फ्राय
दिवस ३ रा बदाममनुके घातलेला दलियाचा शिरा आणि दूध मोड आलेले मूगसफरचंदपुदिना चाट नाचणीगहू रोटीमोड आलेली कडधान्ये आणि पालक काही चेरी टोमॅटो खीर भाज्यांचे सूप पालक पनीर पराठा
दिवस ४ था ओट्स वॉफेल आणि चॉकलेट मिल्क फ्रुट चाट पोळी+डाळ +आवडीची भाजी गाजराचे काही काप हातसडीच्या तांदळाचा भात पनीरचे छोटे तुकडे मध आणि चाट मसालासोबत टोमॅटो भोपळामसूर डाळ सूप आणि हातसडीच्या तांदळाचा भात
दिवस ५ वा मिक्स डाळींचे धिरडे आणि पुदिन्याची चटणी गाजर सफरचंद सूप पालक पनीर पराठा

काही चेरी टोमॅटो

शेवयांचा उपमा केशर वेलची दूध मोड आलेले मूग आणि ओट्स चे कटलेटघरी केलेल्या खजूरटोमॅटोपुदिना चटणीसोबत
दिवस ६ वा ठेपला चुंदा केशरवेलची दूध फ्रुट चाट संपूर्णधान्य रोटीडाळआवडीची भाजी उकडलेल्या बीटरुटचे काही काप हातसडीच्या तांदळाचा भात खाकरा आणि दही बेसनज्वारीकोथिंबीर धिरडे आणि दही
दिवस ७ वा बेसन पराठा१ ग्लास दूध लिंबू सरबत बाजरीची भाकरीवांग्याचे भरीतडाळ मिक्स व्हेज रायता दूध आणि पोहे थालीपीठलोणी आणि ताक
  • २२ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना – २ रा आठवडा

जेवण न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला शेवयांचा उपमा चीझ लावलेला टोस्ट पनीर कटलेट किंवा भाजलेला मासा आणि कोथिंबीरटोमॅटो सूप

बेसनमेथी पराठा आणि गाजरपालक रायता

साधे दही आणि केळं/सफरचंदकुठलेही हंगामी फळ पनीर कटलेट किंवा भाजलेला मासा आणि कोथिंबीरटोमॅटो सूप
दिवस २ रा मिक्स धान्यांचे धिरडे बदाम मिल्कशेक फ्रुट चाट अप्पम भाज्यांचे सूप बीटरूट रायता शेंगदाण्याची चिक्की /२ कप हंगामी फळाचे काप शिजवलेले बीन्स आणि टोस्ट
दिवस ३ रा बदाम वोफल्स (waffales) मनुके आणि मधासहित काकडीचे काप आणि दही मासे किंवा सोयाची आमटी आणि भात काकडी आणि टोमॅटो सलाड फ्रुट मिल्कशेक सफरचंदखोबरेदही चटणी
दिवस ४ था खीर बेसन लाडू रोटीडाळ आवडीची भाजी गाजराचे काही काप हातसडीचा तांदळाचा दलिया दलिया हक्का न्युडल्स मक्याचे सूप
दिवस ५ वा ओट्स बदाम खीर मखाना भाजलेला पालक पनीर पराठा चेरी टोमॅटो पनीर मधासोबत आणि बदाम मेथी पिठलं आणि ज्वारीची भाकरी
दिवस ६ वा पोहे टोमॅटो आणि भोपळी मिरची चॉकलेटबदाम मिल्कशेक खजुराचे काप आणि बदाम व काजू संपूर्णधान्य रोटी +डाळ +आवडीची भाजी उकडलेल्या बीटरुटचे काही काप हातसडीच्या तांदळाचा भात फळे कापून पराठादही किंवा लस्सी
दिवस ७ वा चिकन सँडविच आणि टोमॅटोचे काप

योगर्ट

बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत +डाळ +भाज्यांचा रायता बटाटा भाजून चीझसोबत बेसन पराठागाजर आणि पालक रायता
  • २२ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना – ३ रा आठवडा

जेवण न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला पोहे दूध साधा खाकरा आणि दही बेसनमेथी पराठागाजर पालक रायत्यासोबत केळेस्ट्रॉबेरीबदाम स्मूदी व्हेजिटेबल रायता +व्हेजिटेबल पुलाव मूग डाळ सूप
दिवस २ रा रवा डोसा आणि सांबार कुस्करलेला बटाटा आणि किसलेले पनीर अप्पेव्हेजिटेबल सूप बीटरूट रायता बदामअंजीर मिल्कशेक व्हेज रिसोतो
दिवस ३ रा ओट्सबदाम खीर३ घरी केलेली बिस्किटे दूध काकडीचे काप आणि दही

मासे आणि सोया आमटी आणि भात

फळांचा मिल्कशेक

सफरचंदनारळ– दही चटणी

दिवस ४ था पोहेटोमॅटो आणि भोपळी मिरची घालून मसाला मखाना केळ्याचा मिल्कशेक रोटी डाळ आवडीची भाजी गाजराचे काही काप

दलिया

हक्का नूडल्स स्वीट कॉर्न व्हेज सूप

दिवस ५ वा केळ्याचा पॅनकेक राजगिरा चिक्की दुधात घालून पालक पनीर पराठा काही चेरी टोमॅटो फ्रुट मिल्कशेक मेथी ठेपलाबटाटा भाजी आणि दही
दिवस ६ वा गव्हाच्या पिठाचा शिरा आणि दूध खाकरा आणि दही छोटी पोळी डाळ आवडीची भाजी टोमॅटो/काकडी/गाजराच्या काही फोडी १ चमचा कोथिंबीर/पुदिना चटणी घरी केलेला दहीवडा छोटी पोळी +डाळ +आवडीची भाजी टोमॅटो/काकडी/गाजराच्या काही फोडी १ चमचा कोथिंबीर/पुदिना चटणी
दिवस ७ वा भात आणि छोले आमटी फळे कापून बाजरीची भाकरीवांग्याचे भरीतडाळव्हेजिटेबल रायता आलू टिक्की आणि पुदिन्याची चटणी मोड आलेल्या मुगओट्स कटलेटघरी केलेल्या खजूरटोमॅटोपुदिना चटणी सोबत
  • २२ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना – ४ था आठवडा

जेवण न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला किसलेली काकडीओट्स पॅनकेक फ्रुट चाट बेसनमेथी पराठा आणि गाजरपालक रायता कापलेली फळे डाळ खिचडी आणि भोपळ्याचे सूप
दिवस २ रा व्हेजिटेबल उपमा आणि ताक केळं/सफरचंद किंवा एखादे हंगामी फळ अप्पे आणि भाज्यांचे सूप बीटरूट रायता काकडीचे काप आणि दही छोले पुरी आणि लस्सी
दिवस ३ रा ऑम्लेट ब्रेड किंवा पनीर सँडविच केळं/सफरचंद/हंगामी फळ छोटी पोळीडाळ आवडीची भाजी गाजर/काकडी/टोमॅटो चे काही काप १ चमचा कोथिंबीर/पुदिना चटणी शिरा दुधी भोपळामेथी मुठिया आणि ताक
दिवस ४ था राजगिरागहू शिराकुस्करलेले बदाम घालून सफरचंदाचा रसचाट मसाला घालून रोटी डाळ आवडीची भाजी गाजराचे काही काप हातसडीच्या तांदळाचा भात कुस्करलेला बटाटा शाही पनीर पराठा आणि टोमॅटो मशरूम सूप
दिवस ५ वा दूध पोहेकेळ्याचे किंवा सफरचंदाचे तुकडे घालून केळं/सफरचंद किंवा हंगामी फळ पालक पनीर पराठा काही चेरी टोमॅटो नाचणीचा लाडू पनीर कटलेट किंवा भाजलेला मासा =, बीन्स सूप आणि किसलेल्या गाजराची कोशिंबीर
दिवस ६ वा ज्वारीच्या लाह्यांची खीर चिकू संपूर्णधान्य रोटी डाळ आवडीची भाजी उकडलेल्या बीटरुटचे तुकडे हातसडीच्या तांदळाचा भात सफरचंदाचे काप टोमॅटो आणि दुधीभोपळ्याचे सूप आणि पोळी/पराठा
दिवस ७ वा टोमॅटो आणि दुधी भोपळा सूप आणि पोळी/पराठा उकडलेला बटाटा चीझ घालून बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत डाळ मिश्र भाज्यांचा रायता दहीमॅश केलेले केळं/पपई/अननस रायता बिसिबेळे भातदही आणि काकडीचे काही काप

२२ महिन्यांच्या मुलासाठी काही पोषक पाककृती

२२ महिन्यांच्या मुलांसाठी इथे काही पोषक पाककृती दिल्या आहेत:

डाळभात आणि भाज्या घालून केलेली खिचडी

२२ महिन्यांच्या बाळासाठी हे चविष्ट आणि पोषक जेवण आहे.

घटक

मूग डाळ ३ टेबलस्पूनहळद १ चिमूट३ टेबलस्पून तांदूळ१ छोटे गाजरस्वच्छ धुवून चिरलेला पालकसाल काढून बटाट्याचे तुकडे/२ टीस्पून तूप आणि पाणी

कृती

डाळ आणि तांदूळ १/२ तास भिजत घालाप्रेशर कुकर मध्ये चिरलेल्या गाजरासोबत डाळ तांदूळ घालून प्रेशर कुकरमध्ये ३ शिट्ट्या करून मऊ होईपर्यंत शिजवाथंड होऊ द्याजिरे मोहरीची फोडणी घालून वाढा.

डाळ, भात आणि भाज्या घालून केलेली खिचडी

भाज्या घालून केलेले मसूर डाळ सूप

मसूर डाळ पटकन शिजते आणि त्यामध्ये प्रथिने खूप जास्त प्रमाणात असताततुमचे बाळ ते सहज पचवू शकेल.

घटक

१ छोट्या गाजराचे तुकडे/२ कांदा बारीक चिरलेला१ छोटा बटाटातुकडे करूनटीस्पून तूपपाणी२ टेबलस्पून मसूर डाळ.

कृती

तव्यात तूप घालून मंद आचेवर ठेवाचिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्यागाजर आणि बटाटे घालून काही मिनिटांसाठी परतून घ्यामसूर डाळ आणि पाणी घालाचांगले उकळून घ्याजोपर्यंत डाळ आणि भाज्या चांगल्या मऊ शिजत नाहीत तोपर्यंत २० मिनिटांसाठी ते शिजवून घ्याफूड प्रोसेसर मध्ये प्युरी करून घ्या आणि थोडे गरम असताना खायला द्या.

मिश्र भाज्यांचे सूप

हा पदार्थ बाळासाठी अगदी स्वादिष्ट आणि पोषक आहे.

घटक

६ पालकाचो पाने१ छोटा बटाटा१ टीस्पून मटार१ लसूण पाकळी/२ गाजरपाणी/२ टीस्पून तूप

कृती

भाज्या चिरून घ्या आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवा आणि चिमूटभर मीठ घालाभाज्या मऊ होईपर्यंत कुकरमध्ये शिजू द्याकुकरच्या ३ शिट्ट्या करातूप घालून हे मिश्रण मिक्सर मधून मऊ करून घ्याव्हेजिटेबल सूप आता तयार आहे.

मिश्र भाज्यांचे सूप

स्ट्रॉबेरी मिल्कशेक

मुलांना हा चविष्ट मिल्कशेक खूप आवडेल

घटक

१ कप धुतलेल्या स्ट्रॉबेरी१५० मिली दूध१ टीस्पून योगर्ट१ टीस्पून साखर

कृती

मऊ होईपर्यंत वरील सर्व घटक मिक्सरमधून काढून घ्यागाळून बिया वेगळ्या करून घ्या आणि वाढा.

स्ट्रॉबेरी मिल्कशेक

ब्रेड पिझ्झा

मुलांसाठी हा पदार्थ चविष्ट आणि पोषक आहे

घटक

कडा काढून टाकलेले ब्रेड स्लाईसकिसलेले शेडर किंवा मोझारेला चीझटोमॅटोहिरवी किंवा पिवळी भोपळी मिरची बारीक चिरलेलीकिसलेले गाजर आणि मटार

कृती

ब्रेड टोस्ट करा आणि त्यावर थोडे बटर लावाकिसलेले चीझ त्यावर एकसारखे पसरावाभाज्या शिजेपर्यंत परतून घ्याकिसलेल्या चीजवर पसरवाओव्हन मध्ये काही मिनिटे ठेवा आणि वितळू द्यातुमचा ब्रेड पिझ्झा तयार आहे.

ब्रेड पिझ्झा

भरवण्याचा काही टिप्स

२२ महिन्यांच्या बाळाला भरवण्यासाठी काही टिप्स

  • २२ महिन्यांच्या बाळाच्या आहारात भाजी आणि फळे ह्यांचा समावेश असला पाहिजेफळांचे छोटे तुकडे करा आणि भाज्या कापून त्या मऊ शिजू द्या जेणेकरून बाळाच्या घशात अडकणार नाही.
  • घास छोटे ठेवातुमच्या बाळाला खूप जास्त अन्न भरवू नका.
  • जर बाळाला खूप खावेसे वाटत नसेल तर बाळाची काय इच्छा असेल ती स्वीकारा आणि बाळाला जबरदस्तीने भरवू नकाबाळांमध्ये एक प्रक्रिया असते ज्यामुळे बाळ खूप जास्त खात नाहीजर बाळाला खूप जास्त भरवले तर त्यामुळे पोट भरल्यावर थांबण्याची बाळाची क्षमता विकसित होत नाही.
  • मुलांना निदान ७१० वेळा नवीन अन्नपदार्थ दिले पाहिजेत जेणे करून ते तो पदार्थ खायचा असे ठरवतीलत्यामुळे संयम बाळगा आणि नवीन पदार्थ एक चमचा एका वेळेला असा भरवा.
  • मुले थोडा गोंधळ घालतात आणि अन्नपदार्थांसोबत खेळताततुम्हाला त्याची चिंता वाटू देऊ नकातुमच्या बाळासमोर ताटात पदार्थ ठेवाबाळाला जेवढे हवे तेवढे खाऊ द्या आणि नंतर स्वच्छ करा.
  • तुमच्या २२ महिन्यांच्या बाळाने संपूर्ण चरबी असलेले गाईचे दूध प्यायले पाहिजेबाळाने १००१५० मिली दूध दिवसातून २ वेळा प्यायले पाहिजे.
  • तुमच्या बाळाला आहारातून पुरेसे लोह आणि कॅल्शिअम मिळत आहे ना ह्याची खात्री कराजर तुम्ही बाळाच्या पोषणाच्या कमतरतेविषयी जागरूक असाल तर तुमच्या डॉक्टरांशी पूरक औषधांविषयी बोला.
  • तुमच्या बाळाला कुटुंबासोबत टेबलवर जेवायला बसवा त्यामुळे बाळाला खाण्याच्या योग्य सवयी लागतील आणि बाळ नवीन पदार्थ खाऊन बघेल.
  • तुमच्या बाळाला जेवणासाठी २३ पर्याय निवडण्यास सांगामुलांना अन्नपदार्थांचा रंगपोत आणि चवीनुसार पदार्थाची आवड किंवा नावड निर्माण होते.
  • मुलांच्या आहाराची योजना म्हणजे एक सर्वसाधारण मार्गदर्शन आहेप्रत्येक मूल हे वेगळे असते आणि बाळाच्या पोषणाच्या गरजा आणि चवीची गरज ही वेगळी असतेएका बाळासाठी जे योग्य आहे ते दुसऱ्यासाठी योग्य असेलच असे नाही.

बाळाच्या भुकेमध्ये खूप बदल होत असतोबाळाची वाढदात येणे आणि बाळाचे विकासाचे टप्पे ह्यानुसार त्यामध्ये बदल होत असतोम्हणून वेगवेगळ्या मुलांच्या भुकेची तुलना करू नकाजर तुम्हाला असे लक्षात आले की मुलाला पुरेसे पोषण मिळत नाही तर तुमच्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधा.

अस्वीकारण:

  1. प्रत्येक मूल हे वेगळे असते त्यामुळे तुमच्या विवेकबुद्धीनुसार ह्या आहाराच्या योजना वापरातुम्ही तुमच्या मुलाच्या आवडीनुसारगरजेनुसार ह्या आहार योजनांमध्ये बदल करू शकता
  2. बाळाला जबरदस्तीने कधीच भरवू नका
  3. फॉर्मुला तयार करताना बॉक्सवरील सूचना पाळा आणि त्याबरोबर दिलेला मापाचा चमचा वापरा
  4. बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना सुरुवातील पाणीदार सूप करूंन द्यावेजसजसे बाळाची वाढ होईल तसे बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने किंवा आईने बाळाला गिळता येईल अशा पद्धतीने सूपचा घट्टपणा वाढवावाखूप घट्ट अन्नपदार्थांमुळे बाळाचे पोट बिघडते किंवा जड होतेआणि खूप पातळ पदार्थांमुळे बाळ भुकेले राहू शकते.
  5. काही मुले काही दिवस कमी खातात ज्या मुळे काळजी करण्याचे काही कारण नाहीतथापिजर बाळ सलग ३४ दिवस कमी खात असेल तर तुमच्या डॉक्टरांची मार्गदर्शनासाठी भेट घ्या
  6. दात येताना किंवा बाळाला बरे नसेल तर तो किंवा ती कमी खाऊ शकतेतुम्ही स्तनपान किंवा फॉर्मुला ह्या दिवसात वाढवू शकताबाळ बरे झाल्यावर पुन्हा तुम्ही हे अन्नपदार्थ बाळाला देऊ शकता.
  7. बाळाला जुलाब होत असतील तर बाळाला भरवणे बंद करू नका.
  8. जर तुमचे मूल सुरुवातीला अन्नपदार्थ खात नसेल तर दालचिनीजिरेपावडरलिंबाचा रसकढीपत्त्याची पाने वापरून तुम्ही अन्नपदार्थांची चव बदलू शकता.
  9. तुमच्या मुलाला सुकामेवाग्लूटेन किंवा अंड्यांची ऍलर्जी असेल तर बाळाला कुठलेही अन्नपदार्थ भरवण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी कृपया संपर्क साधा

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User