तुमचे २६ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

0 7
तुमचे २६ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

वेळ किती भर्रकन पुढे सरकतोनाही कातुमचे बाळ ६ महिन्यांच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे आणि तुम्ही बाळामध्ये विकासाची विविध चिन्हे आता पहात असालतुमचे बाळ आजूबाजूच्या वातावरणातील गोष्टींचे झपाट्याने आकलन करू लागेलतुमचे बाळ आता २६ आठवड्यांचे झाले आहे आणि पालक म्हणून ह्या आणि ह्यापुढील आठवड्यात तुम्हाला त्याचे वाढीचे महत्वाचे टप्पे आणि विकास ह्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहेमग वाट कसली बघताय२६ आठवड्यांच्या तुमच्या बाळाच्या विकासाविषयी जाणून घेण्यासाठी खाली स्क्रोल करा.

तुमच्या २६ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमच्या २६ आठवड्यांच्या बाळाचा विकास

  • वाढलेली मोटर कौशल्य: तुमच्या बाळाने २६ व्या आठवड्यात प्रवेश केला आहे आणि बाळाचे लहान स्नायू आता लवचिक होण्यास सुरुवात झाली आहेबाळाचे शरीर त्यांना सरळ चालण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे प्रशिक्षण देईल.
  • आवाजाकडे लक्ष देणेआवाज ग्रहण करणारा मेंदूचा भाग ह्या काळामध्ये सक्रिय होईलकारण बाळाचा विकास वेगाने होत आहे आणि तुम्ही तुमच्या मुलाच्या श्रवणशक्तीमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा करू शकता.
  • दात येणेयावेळीबाळांना दुधाचे दात येण्यास सुरुवात होईलजेणेकरून ते घन आहार घेण्यास प्रारंभ करू शकतात.

तुमच्या २६ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

  • तुमचे बाळ थोडे चपळ होईल
  • तुमच्यापैकी काही जण आता नोकरी करत असतील आणि बाळाची काळजी घेण्यासाठी मदतनीस ठेवली असेलमदतनीस बाईंना बाळ चांगले प्रतिक्रिया देते हे पाहून तुम्हाला वाईट वाटेलपरंतु बाळाला त्याचे पालक आणि मदतनीस ह्यांच्यातील फरक समजू लागेलम्हणजेच बाळाला दिवसाच्या शेवटी तुमच्याच कुशीत यावेसे वाटेल
  • या काळातील सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजेतुमचे बाळ स्वतंत्र होऊ लागते आणि दिवाणखाना असो किंवा मनोरंजन पार्क असोबाळाला नवीन गोष्टींना शोध घ्यायला आवडेल तसेच फिरायला आवडेल
  • बाळाची श्रवणक्रिया जसजशी चांगली होत जाईल तसतसे ते ऐकत असलेल्या काही आवाजांचे अनुकरण करण्यासाठी त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करण्यास सुरवात करतीलजरी त्यांची बोलण्याची क्षमता मर्यादित असली तरीही तुम्ही बाळाच्या बोबड्या बोलांची अपेक्षा करू शकताबाळे सहसा व्यंजन पुन्हा पुन्हा उच्चारतात आणि तेव्हा तुम्ही तुमच्या लहान बाळाचे पहिले शब्द मामा‘ किंवा दादा‘ बोलण्याची अपेक्षा करू शकताकृपया लक्षात घ्या की बाळाचा शब्दसंग्रह अस्तित्त्वात नसला तरीही बाळ काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे हे तुम्ही सहजपणे सांगू शकता
  • त्यांची श्रवणशक्ती वेगवान वेगाने विकसित होते आणि बाळांकडून तुम्ही कोणत्याही असामान्य आवाजांवर त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्याची अपेक्षा करू शकता
  • आपले बाळ काही सेकंद किंवा काही मिनिटे आधाराशिवाय बसणे देखील सुरु करू शकते

आहार देणे

२६ व्या आठवड्यात आपल्या बाळासाठी घन पदार्थ (सुरुवातीला अर्ध घन पदार्थ ठीक आहेत सुरु करणे ठीक आहेहा संक्रमणाचा काळ आहे त्यामुळे स्तनपानापासून नवीन अन्नपदार्थांसाठी पचनप्रणाली अजूनही समायोजित होत आहेअशा प्रकारेजर तुम्हाला बाळाच्या शौचामध्ये न पचलेल्या अन्नाचे तुकडे आढळले तर काळजीचे काही कारण नाहीया काळात तुमच्या बाळाला बद्धकोष्ठता सुद्धा होऊ शकतेबाळाच्या पचनसंस्थेत झालेल्या बदलामुळे असे होऊ शकतेआहारात पपईसुके प्लम फळगाजर आणि पालक सारख्या फायबरसमृध्द पदार्थांची ओळख करुन आपण या परिस्थितीवर उपाय करू शकता.

तुम्ही तुमच्या बाळाला पाण्याची ओळख देखील करून देऊ शकताबाळाला पाणी देण्यापूर्वी पाणी उकळले आहे ह्याची खात्री करा कारण बाळाची रोगप्रतिकारशक्ती अजूनही विकसित होत आहेतुम्ही बाळाला सिप्पी कप वापरण्यास शिकवू शकता जेणेकरून कमीत कमी पाणी सांडेलजर तुमचे बाळ अजूनही घनपदार्थ घेत नसेल तर निराश होऊ नका तो आज ना उद्या नक्की घन आहार घेण्यास सुरुवात करेलबाळाला जबरदस्तीने भरवू नका कारण बाळ जिभेच्या साहाय्याने अन्न पुन्हा बाहेर काढू शकेल.

बाळाची झोप

काही २६ आठवड्यांची बाळे दीर्घ कालावधीसाठी झोपी जाताततर असे बरेच लोक आहेत जे कदाचित इतके भाग्यवान नसतीलदात येणे आणि रात्रीचे दूध पिण्यास उठणे यासारख्या अनेक घटकांमुळे विचलित केलेली झोप असू शकतेकृपया लक्षात घ्या की रात्रीच्या वेळी आपल्या बाळाला कमीतकमी एकदा स्तनपान देणे अगदी शक्य आहेअभ्यासानुसार असे दिसून आले आहे की या वेळी किमान ७८मुले रात्री उठतात.

तुमच्या २६ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स

तुम्ही तुमच्या छोट्या बाळाची कशी काळजी घेऊ शकता ते इथे दिलेले आहे

  • या वयातील तुमच्या बाळाला आजूबाजूच्या वातावरणाचा शोध घ्यायचा आहे त्यामुळे तुम्ही योग्य काळजी घेतली नाहीत तर बाळाला इजा पोहचू शकतेत्यामुळे बाळाला हानी पोहचू नये म्हणून धारदार कडा झाकून घर आणि आजूबाजूचा परिसर बेबीप्रूफ करा.
  • याकाळात बाळाला दात येण्यास सुरुवात होईल आणि आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी बाळ तोंडात घालू लागेलत्यामुळे बाळाच्या घशात अडकेल अशी कोणतीही वस्तू किंवा खेळणे नाही अशी खात्री करुन घ्याआपल्या बाळाची खेळणी नियमितपणे स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे.
  • जर बाळ त्याचा डावा हात वारंवार वापरत असेल तर बाळाला उजवा हात वापरण्यास प्रोत्साहित करणे टाळाकारण तसे केल्याने त्यांचे कौशल्य रोखले जाईलतसेचते २३ वर्षांचे होईपर्यंत बाळ डावखुरे आहे की सामान्य हे समजत नाही
  • तुम्ही बाळाला बाथ टब मध्ये अंघोळ घालत असाल तर दक्ष राहा कारण अगदी ४५ सेंमी पाणी सुद्धा प्राणघातक अपघात होण्यासाठी पुरेसे आहे
  • या वयात मूल विभक्त चिंतेने (separation anxiety) ग्रस्त होऊ शकतोहा टप्पा कायम रहात नाही कालांतराने तो कमी होतोत्यामुळे बाळाला आपली सवय होईल ही भीती न बाळगता त्यांच्याकडे लक्ष द्या.

चाचण्या आणि लसीकरण

ह्या काळात दिल्या जाणाऱ्या लसींमध्ये खालील लसी समाविष्ट आहेत

  • डीटीएपी आणि हिब
  • आता आणि वय वर्षे १८ महिने दरम्यान अंतिम हेपेटायटीस बी डोस
  • इन्फ्लूएंझा लस
  • क्षय रोग एक साथीचा रोग आहे जो शिशुंसाठी घातक ठरू शकतोजर तुमच्या जवळच्या कुटूंबातील कुणाला क्षयरोग झाला असेल तर तुमच्या मुलाची तपासणी करुन घ्या
  • दंत तपासणीसाठी आपण दंतचिकित्सकाकडे जाऊ शकता कारण आजकाल बऱ्याच लहान मुलांमध्ये दंतपोकळी निर्माण होण्याची शक्यता असते
  • सुरक्षित राहण्यासाठी आपण नेहमीच लीड स्क्रीनिंग चाचणीसाठी जाऊ शकतासाधारणपणे बाळाने कोणत्याही विषारी पदार्थांचे सेवन केले आहे की नाही हे पाहण्यासाठी हे केले जाते

खेळ आणि क्रियाकलाप

येथे काही खेळ आणि क्रियाकलाप आहेत जे तुम्ही तुमच्या लहान मुलास गुंतवून ठेवण्यासाठी करून बघू शकता

  • कथा सांगणेचांगली कथा कोणाला आवडत नाहीबाळाला तोंडी सांगितलेली माहिती पटकन समजतेहि संधी साधून तुम्ही बाळाला रात्री गोष्टी सांगण्यास सुरुवात करू शकतागोष्टीच्या विशिष्ट टप्प्यावर बाळाचे लक्ष वेधण्यासाठी तुम्ही आवाजाची पट्टी वर खाली करू शकता.
  • वाद्य वस्तू वापरातुम्ही संगीत खेळण्यांचा साठा करू शकता आणि तुमच्या बाळास गुंतवून ठेवण्यासाठी एका वेळी एक वापरू शकतातुमच्या बाळाची श्रवणशक्ती समजून घेण्यासाठी आणि आवाज कोठून येत आहे हे समजण्यास मदत करण्यासाठी वेगवेगळ्या बाजूनी खेळणी हलवून पहा.
  • मजेदार गाणे म्हणाआपल्या बाळाचे कपडे बदलताना किंवा ते स्वच्छ करताना बाळांसाठी मजेदार गाणे म्हणा आणि बाळ कशी प्रतिक्रिया देतात ते पहाहे क्रियाकलाप आपल्या बाळाशी असलेले आपले बंध आणखी मजबूत करेलऐकण्याची भावना सुधारेल आणि नवीन शब्द शिकण्यास मदत करेलतुम्ही बाळाला सोबत गाण्यासाठी प्रोत्साहित देखील करू शकतातुमच्याशी संवाद साधण्यासाठी आणि गाण्यासाठी तुमचे लहान बाळ बोबडे बोल म्हणेल.
  • चेंडूचा मागोवाएखादा चेंडू किंवा खेळणे शोधा ज्यामध्ये बाळाला विशेष रस असेल आणि त्यास खोलीच्या दुसऱ्या बाजूला ठेवाबाळाला खोलीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जायला लावाह्यामुळे त्याच्या पायांच्या स्नायूंचा विकास होण्यास आणि चालण्याच्या प्रक्रियेस गती मिळण्यास मदत होईल.
  • ब्लॉक्ससह खेळणेतुलनेने लहान वस्तूंबरोबर बाळाला खेळू दिल्यास त्याचे कौशल्य सुधारण्यास मदत होऊ शकते.परंतु घशात अडकतील इतक्या सुद्धा ह्या वस्तू लहान असू नयेत.
  • सामाजीकरणः आपल्या बाळाला बाहेर घेऊन जा आणि इतर मुलांशी खेळू द्याआपल्या मुलास इतर मुलांचे निरीक्षण करू द्या आणि त्यांच्याशी संवाद साधू द्या म्हणून तुमच्या बाळाच्या वयाची मुले असलेल्या शेजारील स्त्रिया किंवा मित्रमैत्रिणींना आमंत्रित करा.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

पुढील बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घ्या:

  • दात येण्याची कुठलीही चिन्हे नसताना बाळाला खूप जास्त ताप येत असेल तर लवकरात लवकर बाळाला बालरोगतज्ञांकडे न्या
  • जर बाळ आवाजास कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नसेल तर ते काळजीचे कारण आहेबाळाला वाचा– भाषा तज्ञांकडे न्याते ऑडिओलॉजिस्टच्या मदतीने श्रवण चाचणी घेऊ शकतात
  • जर आपले बाळ कुपोषित दिसत असेल तर बाळाला डॉक्टरकडे नेण्याची आवश्यकता असू शकते

प्रत्येक बाळाचा त्याच्या स्वतच्या गतीने विकास होतोम्हणूनजर तुमच्या बाळाचा वरीलप्रमाणे विकास होत नसेल तर काळजी करू नकातो नक्की तिथे पोहोचेलतोपर्यंत तुमच्या बाळासोबतचा प्रत्येक क्षण साजरा करा आणि बाळासोबतचा हा वेळ मौल्यवान बनवा!

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User