तुमचे २ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

0 39
तुमचे २ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

शांतउबदार आणि सुखावह अशा जगात राहण्याची सवय असताना अचानकथंडीउष्णतावारागोंगाट आणि भूक ह्या जाणिवा एकाच वेळी अनुभवल्याची कल्पना कराबाळ जन्माला आल्यावर असेच घडतेबाळ सुद्धागर्भाशयाबाहेर जगण्याचा आणि ह्या सगळ्या भिन्न गोष्टी काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतेपालक म्हणून तुम्ही तुमच्या बाळासोबत सदैव रहा आणि बाळाचा विकास योग्य पद्धतीने होत आहे ना ह्यावर लक्ष ठेवू शकता.

२ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमच्या बाळाला तुम्हाला काही सांगायचे असेल तर संवादाचा एक प्राथमिक मार्ग म्हणजे रडणेह्या टप्प्यावरलक्ष केंद्रित करण्यास आणि काहीतरी समजून घेण्यास सक्षम होण्यासाठी पूर्ण दृष्टी विकसित झालेली नसतेपरंतु बाळांना मानवी चेहर्‍याबद्दल आकर्षण असतेआणि बाळाने सतत आपला चेहरा पाहणे महत्वाचे आहेतसेच बाळाला जवळ घेतल्यासत्याला तुमचा स्पर्श होऊ दिल्यास ह्या सर्व गोष्टी बाळे लक्षात ठेवतात आणि आपला विश्वास वाढवतात आणि तुमचा संपूर्ण चेहरा माहिती नसूनसुद्धा बाळ तुम्हाला ओळखू लागते.

दोन आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

दुसर्‍या आठवड्यापर्यंतनाळेचा लहानसा तुकडा सुकतो आणि खाली पडतोज्यामुळे बाळाच्या पोटाजवळ फक्त नाभीची गाठ पडतेम्हणूनचतो तुकडा पडेपर्यंत नाभीच्या आजूबाजूच्या भाग सौम्यपणे आणि काळजीपूर्वक हाताळला पाहिजेतुमच्या बाळाला आंघोळ घालणे महत्वाचे आहे परंतु नेहमीच्या पाण्याने भरलेल्या टबमधील आंघोळीऐवजीबाळासाठी स्वच्छ आणि नाभी क्षेत्र सुरक्षित ठेवू शकणार्‍या स्पंज बाथची निवड करा.

ह्या कालावधीत तुम्ही कदाचित दवाखान्यातून घरी आलेला असाल आणि दिनक्रम स्थापित करण्यामध्ये व्यग्र असालतुम्ही बाळासोबत बहुधा हॉस्पिटलच्या खोल्यांमध्ये आणि घरातच होतातसंपूर्ण वेळ घरातच राहिल्यामुळे तुम्हाला आणि बाळाला कंटाळा येऊ शकतो घरामागील अंगणात किंवा टेरेस मध्ये थोडा वेळ चाला किंवा फक्त काही क्षणांसाठी बाहेर पडा आणि आपल्या बाळासह मोकळा श्वास घ्या

दूध देणे

दोन आठवड्यांच्या वयातबाळाला अन्न मिळवण्याचे प्राथमिक माध्यम म्हणजे स्तनपान होयकधीकधीस्तनपान देण्याच्या प्रक्रियेमुळे मातांना थोडा त्रास होऊ शकतो किंवा वेदना होऊ शकतातकारण स्तनाग्र नेहमीच्या प्रसूतीच्या नंतरच्या तुलनेत अधिक संवेदनशील असताततथापिस्तनपान देण्याची प्रक्रिया होणे महत्वाचे आहेकारण बाळाला स्तनाची सवय लागणे सुरू होते आणि बाळाला लॅचिंग आणि स्थितीचे योग्य आकलन झाल्यासतुमच्या स्तनांनाही आराम मिळेलस्तनपानाची प्रक्रिया सुलभ होईल.

दूध देणे

२ आठवड्यांच्या बाळाला लागणारे दुधाचे प्रमाण हे वाढ आणि वजनाप्रमाणे बदलू शकतेभूक लागण्याच्या वेळेसह समक्रमित होण्यासही स्तनांना थोडा वेळ लागेल२ आठवड्याच्या कालावधीत बाळाचे दूध देण्याचे वेळापत्रक तयार करणे म्हणजे ते खूप लवकर होईलत्यामुळे बाळाला जेव्हा भूक लागेल तेव्हा दूध देणे चांगलेत्यामुळे दूध तयार होण्याची प्रक्रिया जलद होते आणि आपल्या बाळाच्या वाढत्या आहारातील मागणीसाठी आपल्याला तयार ठेवते.

झोप

२ आठवड्यांच्या बाळासाठीह्या टप्प्यावर झोप आणि खाणे हे त्यांचे आयुष्य आहेदिवसभर त्यांचे आलटून पालटून हेच रुटीन असतेतुमचे बाळ कदाचित भूक लागल्याने घाबरून रडत असेलमग काही काळ जागे राहील त्याच्या सभोवतालचे जग पाहिल आणि झोपी जाईलकधीकधीबाळाला पाजल्यानंतर सुद्धा बाळाची रडण्यास सुरवात होईल आणि तुम्हाला नक्की लक्षात येईल की त्याला काय त्रास आहेत्याला शांत करण्यासाठी एकापेक्षा जास्त तंत्रांचा प्रयत्न करूनही बाळ शांत झाले नाही तर तुम्हाला आपण एक चांगली आई आहे की नाही असा प्रश्न पडेलतथापिआशा गमावून स्वतःबद्दल वाईट वाटून घेऊ नकाआपल्या बाळाला कवेत घ्याबाळाच्या कानात थोडी बडबड कराहळूवारपणे झुलवून किंवा आंघोळ घालून शांत करा आणि हे सुनिश्चित करा की आपल्या बाळाला पुन्हा झोपवा.

झोपतानातुमच्या बाळाला स्वतःचे क्रिब किंवा एक स्वतंत्र बेड असावा आणि तो सुद्धा तुमच्या शेजारीच असेल तर उत्तमबाळ ठीक आहे की नाही हे तपासत राहण्याची आणि भूक लागल्यास त्याला दूध देण्याची सतत आवश्यकता असेलबाळाला आपल्या जवळ ठेवणे दोघांसाठीही सुलभ होईलझोपेच्या संपूर्ण कालावधीतबाळ वेगवेगळ्या प्रकारचे आवाज करतेबाळ रडेलबाळाला कंटाळा येईल किंवा बाळे विचित्र आवाज काढू शकतातहे सर्व आपल्या बाळाच्या वाढीची सामान्य चिन्हे आहेत.

वागणूक

प्रत्येक मनुष्यप्राण्याप्रमाणेप्रत्येक लहान बाळाची वागणूक वेगवेगळी असतेतथापित्यापैकी बहुतेक बाळे सामान्यतभूकझोपेच्या चक्रात येतातहे कदाचित स्पष्ट दिसत नाही परंतु एक बाळ स्तनाला शोषून घेण्यासाठी त्याच्यात बरीच उर्जा वापरतोत्यामुळे त्यांना स्तनपान मिळाल्यानंतर बाळ जवळजवळ लगेच झोपायला जातेअकाली जन्मलेली मुलं इतरांपेक्षा जास्त वेळा झोपतात आणि डॉक्टर त्यांना जागे करण्याचा सल्ला देतात जेणेकरून त्यांना आवश्यक तो आहार पूर्णपणे मिळेल.

काही वेळाबाळांचे डोळे विस्फारलेले असतात आणि त्यांना कुतूहल असतेहि बाळे बराच काळ जागी असतातआवाजाला प्रतिसाद देतातचेहरे दिसतात तेव्हा सभोवताली पाहतात आणि हावभाव करण्याचा प्रयत्न करतातस्तनपान करतानाहीत्यांचे डोळे खोलीतील कोणत्याही आवाजांकडे जाऊ शकतातकाही हालचाली किंवा चेहऱ्यावरील हावभाव कदाचित तुम्हाला स्वतःचे बालपण किंवा आपल्या जोडीदाराची आठवण करुन देतीलसतत किरकिर करणाऱ्या बाळामुळे तुम्हाला त्रासदायक वाटेलतथापिहे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की बहुतेक बाळांमध्ये समान प्रवृत्ती असतात आणि मोठे होऊन त्यांचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व तयार होते.

२ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

  • आपल्या बाळासाठी असलेले क्रिब किंवा पाळणा त्याला आरामदायक वाटले पाहिजेक्रिबला असलेल्या दांड्यांमध्ये फार अंतर असू देऊ नकाक्रिबची गादी टणक असावीक्रिब अशा प्रकारे ठेवा की जेणेकरून बाळाला थेट वारा लागू नयेपाळण्यात खेळण्यांची गर्दी करु नका.

२ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

  • बाळाच्या आंघोळीसाठी पाण्याची तयारी करताना आपले कोपर बुडवून तपमान तपासाबाळाला ते खूप गरम होणार नाही ना ह्याची खात्री करा कारण बाळाची त्वचा तुमच्या त्वचेपेक्षा खूप संवेदनशील असते.
  • बाळाबरोबर खेळताना किंवा त्याची काळजी घेत असताना त्याच्याभोवती कोणतीही लहान वस्तू ठेवू नकाहाताच्या हालचालीमुळे बाळ ती छोटी वस्तू घेऊन तोंडात घालू शकेल.
  • दोन आठवड्यांतबाळे अद्याप त्यांचे शरीर पूर्णपणे हलवू शकत नाहीतम्हणूनचआपल्या बाळाला त्याच्या पाठीवर झोपविणे आवश्यक आहेत्याच्या जवळ ब्लँकेट ठेवू नका ज्यामुळे चुकून त्याचा चेहरा झाकला जाईल.
  • तुमच्या बाळाला कधीही एकटे सोडू नकाघराचे योग्यप्रकारे प्रूफिंग करा आणि आवश्यक असल्यास बाळासाठी मॉनिटर्स वापरा.
  • जर तुमचे बाळ अकाली जन्मलेलं असेल किंवा डॉक्टरांनी प्रतिकारशक्ती कमी असल्याचे नमूद केले असेल तर तुमच्या बाळास अनोळखी लोकांपासून किंवा नातेवाईकांपासून दूर ठेवणे चांगलेआपल्या बाळाशी संवाद साधणार्‍या किंवा त्याला जवळ घेणाऱ्या लोकांची संख्या प्रतिबंधित करातुमच्या बाळाला स्पर्श करणारी व्यक्ती सॅनिटायझर वापरते आहे ना ह्याची खात्री करुन घ्या.
  • आपल्या डॉक्टरांचा नंबर जवळ ठेवा आणि आपल्या बाळास ताप आल्यास किंवा काही असामान्य लक्षणे दिसल्यास तपासून घेण्यास संकोच करू नका.

चाचण्या आणि लसीकरण

बहुतेक चाचण्या आणि लसीकरण बाळाच्या पहिल्या आठवड्यातच केले जातेह्यामध्ये क्षय रोगाची बीसीजी लसपोलिओसाठी आयपीव्ही आणि हिपॅटायटीस बीची लस ह्यांचा समावेश आहेकोणत्याही कारणास्तवह्या लशी घेण्यास पहिल्या आठवड्यात उशीर झाला तर डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्यांचा पुढील आठवड्यात पाठपुरावा केला जाऊ शकतोजर ते वेळापत्रकानुसार केले गेले असेल तर दुसरा आठवडा हा लसीकरणमुक्त आहे.

खेळ आणि क्रियाकलाप

जसे जसे आपल्या बाळाला त्याच्या सभोवतालच्या वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लागतोत्यापैकी त्याला जाणवणारी आणि आठवणारी गोष्ट म्हणजे स्पर्श करण्याची भावनात्याचे हात त्याच्या सभोवतालच्या विविध गोष्टी पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत राहतील आणि एखाद्या गोष्टीचा स्पर्श विशिष्ट का होतो हे समजेलत्यामुळे केवळ वस्तू बाळांना अधिक चांगल्या प्रकारे समजल्या जातात असे नाहीपरंतु ते काय पहात आहेत आणि एका विशिष्ट दिशेने जाण्यासाठी त्यांचे हात कसे नियंत्रित करू शकतात हे समजण्यास सुरवात होतेहाताने केलेल्या समन्वयाचा हा विकास बर्‍यापैकी होतो.

तुम्ही भिन्न पोत असलेल्या विविध वस्तू वापरुन आपल्या बाळाबरोबर खेळू शकताजसे की बाळासाठी योग्य असणारी प्लॅस्टिकची खेळणीमखमली कापडरेशीम स्कार्फछान मऊ ब्लँकेटतुमचे केस इत्यादी असू शकतेतुमच्या बाळाला ह्या प्रत्येक गोष्टीएका वेळी एक ह्या पद्धतीने पकडू द्या आणि त्याच्या प्रतिक्रियेचे निरीक्षण करात्याच्याशीही संवाद साधा आणि आपल्याला काय वाटते ते सांगत शब्द उच्चारत बाळाला हाक मारालहान बाळे स्वतःशी आणि एकमेकांशी होत असलेल्या भावनिक संप्रेषणामधून बरेच काही शिकतातकधीकधी आपल्या बाळास ती वस्तू त्याच्या तोंडात घालण्याची इच्छा असू शकते आणि ती कशी वाटते हे पहाजर ती वस्तू स्वच्छ असेल आणि बाळाला हानी पोहोचवत नसेल तर बाळाला ते करूद्याकाही वेळात्यामुळे बाळाला वस्तूचे आकलन चांगले होते.

खेळ आणि क्रियाकलाप

तुमचे बाळ त्याच्या नवीन शोधामध्ये व्यस्त असताना तुम्ही बाळाला छान मालिश करून त्याला अधिक आरामदायक करू शकताबाळाला अनुकूल मसाज तेल घ्या आणि उबदार होण्यासाठी तळहातावर चोळाबाळाच्या पायपासून प्रारंभ करूनतुम्ही त्याच्याशी बोलत असताना हळूवारपणे मालिश करण्यास सुरवात कराघोट्यांपासून सुरुवात करा आणि मांडी आणि नंतर पोटापर्यंत मालिश सुरू ठेवासौम्य आणि हळू हळू मालिश करण्यास सुरुवात करा कारण बाळाला काय होत आहे हे देखील ओळखण्यास मदत होईलपोट आणि छातीच्या भागातनाळेकडील भागात नाळ अद्याप खाली न पडल्यास सावधगिरी बाळगाबाळाच्या डोळ्यात बघून त्याला शांत आणि व्यस्त ठेवण्यासाठी त्याच्याशी बोलासुखदायक आवाजात बोलणे अत्यंत फायदेशीर आहेजर आपले बाळ कोणत्याही क्षणी प्रतिकार करत असेल तरमालिश करणे थांबवा आणि त्याला जवळ धरा जेणेकरून बाळ रडणार नाही

खालील परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

खालील परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे

कावीळ

बर्‍याच बाळांना लहानपणी कावीळ होण्याचा त्रास होतोपरंतु स्तनपान देऊन किंवा काही विशिष्ट वैद्यकीय दिव्यांची मदत घेऊन काळजी घेतली जाऊ शकतेजर तुमच्या बाळाचा चेहरा आणि छातीचा रंग पिवळा असेल तर डॉक्टरांना त्वरित कळविणे महत्वाचे आहे.

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठता ही आणखी एक समस्या आहे ज्यामुळे बर्‍याच बाळांना शौचास त्रास होतोआतड्यांची हालचाल कमी असल्यास थोडेसे पाणी द्या किंवा वेगळा फॉर्मुला देऊन काळजी घेतली जाऊ शकतेह्यापैकी कोणताही प्रयत्न करण्यापूर्वीत्याबद्दल आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

शिंका येणे किंवा वाहणारे नाक

सर्वत्र प्रदूषित हवेमुळे किंवा अगदी धुळीच्या कणांमुळेआपल्या बाळाला शिंका येणे सुरू होईल किंवा नाक वाहू शकेलतीव्र झाल्यास मीठाच्या पाण्याचे नाकाचे थेंब वापरुन पहा.

त्वचेवरील पुरळ

तोंडातून सतत लाळ गळल्यामुळे बहुतेकदा पुरळ होऊ शकतेस्वच्छता राखल्यास ही पुरळ आपोआप नाहीशी होतेजर हे कायम राहिले किंवा आणखी वाढले तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांना कॉल करा.

कोरडी त्वचा

बर्‍याच मुलांना त्वचा कोरडी असण्याची समस्या उद्भवते ह्याचे रसायन विरहीत बाळांचा साबण वापरुन सहज निराकरण करता येतेमॉइश्चरायझिंग लोशन वापरल्याने त्वचेचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

कोरडी त्वचा

रिफ्लक्स

बाळ खूप वेळा दूध तोंडाबाहेर काढतेजेव्हा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात दूध पाजले जाते तेव्हा हे घडतेजर आपल्या मुलाचे अपेक्षेनुसार वजन वाढत राहिले आणि दूध किंवा अन्नपदार्थ अडकून बाळ गुदमरले नाही तर बाळाने दूध ओकणे सामान्य आहेनेहमीपेक्षा थोड्या प्रमाणात दूध पाजणे आणि दूध पाजल्यानंतर प्रत्येक वेळेला ढेकर काढणे ह्याचे काळजीपूर्वक पालन केल्यास रिफ्लक्सची समस्या कमी होईल.

पाण्याने भरलेले डोळे

काही वेळाबाळाच्या अश्रु नलिका अवरोधित केल्या जाऊ शकतातत्यामुळे बाळाचे डोळे अधूनमधून पाण्याने भरतातडोळ्याच्या संसर्गाची चिन्हे दिसत नसल्यास काळजी करण्याची ही स्थिती नाहीअशा परिस्थितीत आपले डॉक्टर बाळाच्या डोळ्यांसाठी सुरक्षित थेंबाची शिफारस करतात.

डायपर रॅश

डायपरमध्ये बाळाचे शौच बराच काळ तसेच राहिल्यास पुरळ होऊ शकतातडायपरकडील भाग स्वच्छ ठेवून डायपर नियमितपणे बदला आणि तो भाग स्वच्छ राहील याची खात्री करुन घ्या.

श्वसन समस्या

खोकला आणि सर्दीमुळे एखाद्या लहान बाळालाही त्रास होऊ शकतो आणि त्यासाठी अत्याधुनिक औषधे आवश्यक नसतातताप वाढल्यास किंवा श्वासोच्छवासाची समस्या उद्भवल्यासडॉक्टर त्याचे निराकरण करण्यासाठी योग्य उपाययोजना करतील.

दुसऱ्या आठवड्यातम्हणजेच अगदी काही दिवसांतच कदाचित आपल्या बाळाची बरीच वाढ झालेली असल्याचे आपल्याला वाटेलवारंवार दूध पाजल्यानंतर आणि बाळाचे वजन वाढल्यावरतुम्हाला हे समजेल की तुमचे बाळ निरोगी मूल होण्याच्या मार्गावर आहे आणि येणाऱ्या काळात तुम्ही त्याच्याबरोबर अद्भुत दिवसांचा आनंद घ्याल.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User