पोलिसांच्या मारहाणीनंतर नागपुरात तरुणाची आत्महत्या, गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी

चार्ली कमांडो किशोर सेनाड आणि प्रविण आलम यांनी नागपूरमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय महेश राऊतला मारहाण केल्याचा दावा केला जातो. महेशने 100 नंबरवर फेक कॉल केला, या कारणामुळे पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप होत आहे.

0 8
पोलिसांच्या मारहाणीनंतर नागपुरात तरुणाची आत्महत्या, गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी

नागपूर : नागपुरातील महेश राऊत याच्या आत्महत्या प्रकरणाची  गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. पोलिसांनी मारहाण केल्यानंतर अपमानित झाल्याने 35 वर्षीय महेशने आत्महत्या केल्याचा आरोप झाला होता. नागपूरमधील मनोज ठवकर  या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

चार्ली कमांडो किशोर सेनाड आणि प्रविण आलम यांनी नागपूरमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय महेश राऊतला मारहाण केल्याचा दावा केला जातो. महेशने 100 नंबरवर फेक कॉल केला, या कारणामुळे पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर महेशने आत्महत्या केल्यामुळे अपमानित झाल्याच्या भावनेतून महेशने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे. नागपूर जिल्ह्यातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडल्याची माहिती आहे.

महेश राऊत आत्महत्या प्रकरणात काल (बुधवारी) दिवसभरात पाच जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी महेश राऊतच्या नातेवाईकांनी केली आहे. सध्या आत्महत्या प्रकरणाची गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. दोषींवर कारवाई करण्यासाठी पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत.

मनोज ठवकर मृत्यू प्रकरण काय आहे?

याआधी, पोलिसांच्या मारहाणीत 35 वर्षीय मनोज ठवकर या नागपुरातील दिव्यांग तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. मनोज ठवकर मेकॅनिक म्हणून काम करत होता. नागपूर शहरातील पारडी चौक हनुमान मंदिर परिसरात सात जुलैच्या रात्री पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. रात्री साडेआठ-नऊ वाजताच्या सुमारास मनोज या मार्गाने घरी चालला होता. मनोजची दुचाकीही थांबवण्यात आली, मात्र वेळीच ब्रेक न लागल्याने त्याची दुचाकी पोलीस वाहनावर धडकली.

पोलिसांच्या मारहाणीनंतर बेशुद्ध

मनोजने मुद्दाम धडक मारल्याचा पोलिसांचा समज झाला, असा दावा केला जातो. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे याच्यासह तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनी मनोज ठवकरला मारहाण केल्याचा आरोप आहे. पुढे त्याला पोलीस स्टेशनमध्येही नेण्यात आले. मात्र शुद्ध हरपलेल्या मनोज ठवकरला नागपुरातील भवानी मल्टिस्पेशालिटी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्याआधीच मृत घोषित करण्यात आलं होतं. पारडी पोलीस स्टेशन हद्दीत सात जुलैच्या रात्री ही घटना घडली होती.

या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, नायक नामदेव चरडे, आकाश शहाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आधी तिघा पोलिसांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. मास्क न घातल्यामुळे तिघा पोलिसांनी मनोज ठवकरला मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. मनोज ठवकर मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User