बाळांसाठी नैसर्गिक सनस्क्रीन – ते का वापरावे आणि कसे तयार करावे?

0 10
बाळांसाठी नैसर्गिक सनस्क्रीन – ते का वापरावे आणि कसे तयार करावे?

उन्हात बसणे तुमच्यासाठी आनंददायक असू शकते परंतु तुमच्या बाळासाठी नाहीखरं तरते आपल्या लहान बाळासाठी अत्यंत हानिकारक असू शकतेम्हणूनच आपल्या बाळाच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहेबाजारामध्ये बऱ्याच प्रकारचे सनस्क्रीन उपलब्ध असले तरी नैसर्गिक गोष्टींची निवड करणे नेहमीच चांगले.

बाळांसाठी नैसर्गिक सनस्क्रीन का वापरावे?

बाळासाठी ओव्हरकाउंटर सनस्क्रीन वापरत असताना पालकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहेकारण ही उत्पादने त्वचेसाठी हानिकारक असलेल्या रेटिनाइल पॅलमेटएकेएरेटिनॉल आणि ऑक्सीबेन्झोन सारख्या रसायनांनी भरलेली असतातजरी सूर्यापासून त्वचेचे रक्षण करण्याचे उद्दीष्ट असणार्‍या उत्पादनांमध्ये ह्या रसायनाचा वापर केला जात असला तरी त्वचेचा उन्हाशी संपर्क आल्यास रेटिनॉल हे रसायन त्वचेचा ट्यूमर आणि जखमांची निर्मिती वाढवू शकतेऑक्सीबेन्झोन त्वचेमध्ये शोषले जाते आणि त्वचेच्या ऍलर्जीस कारणीभूत ठरू शकते आणि त्यामुळे हार्मोन्समध्ये व्यत्यय येऊ शकतोअशा प्रकारे६ महिन्यांपेक्षा लहान मुलांसाठी नैसर्गिक सनस्क्रीन वापरणे नेहमीच चांगले.

घरी तयार केलेल्या सनस्क्रीनमध्ये वापरल्या जाणार्‍या नैसर्गिक घटकांमध्ये असलेल्या एसपीएफ विषयी जाणून घ्या

सन प्रोटेक्शन फॅक्टर (एसपीएफसूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यास सनस्क्रीन किती प्रमाणात सक्षम आहे ह्याचे मोजमाप करतेअतिनील किरणांमुळे त्वचेचा क्षोभत्वचेचा कर्करोग आणि त्वचेचे नुकसान होऊ शकते असे म्हणतात.

जेव्हा नैसर्गिक घटकांचा विचार केला जातो तेव्हा आपण त्यामधील एसपीएफ चा अंदाज अगदी सहजपणे काढू शकतो.

गाजर बियाणे तेल

गाजर बियाणे तेलात एसपीएफ ३०४० असतेलहान मुलांसाठी हि पातळी थोडी जास्त असली तरीहीघरी केलेल्या सनस्क्रीनमध्ये घालण्यासाठी तो एक चांगला घटक आहे

लाल रास्पबेरी बियाणे तेल

त्यात एसपीएफ सामग्री २५३० दरम्यान आहे.

3. नारळ तेल

नारळ तेलात ४ ते ६ पर्यंत एसपीएफ असते परंतु ते सर्वात परवडणारे एसपीएफ तेल आहे.

बदाम तेल

बदाम तेल बाळांसाठीच्या अनेक उत्पादनांमध्ये घटक म्हणून वापरले जाते आणि ते मालिशसाठी सर्वाधिक पसंत केलेले तेल आहेया तेलात सुमारे ५ एसपीएफ आहे आणि हा एक चांगला पर्याय आहे कारण यामुळे त्वचेला व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात शोषून घेता येईल.

शीया बटर

४ ते ६ च्या एसपीएफ असलेले शिया बटरतुमच्या मौल्यवान बाळाचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते

बाळांसाठी नैसर्गिक सनस्क्रीन लोशन तयार करण्याची रेसिपी

सर्वोत्कृष्ट नैसर्गिक एसपीएफ घटकांकडे पाहिल्यानंतरनैसर्गिक सनस्क्रीन घरी कसे बनवायचे ते पाहुयात.

सनस्क्रीन घरी तयार करण्यासाठी आवश्यक गोष्टी

एक काचेचे भांडेएक लहान सॉस पॅन आणि ब्रश घ्या आणि सनस्क्रीन तयार करण्यास प्रारंभ करातयार सनस्क्रीन लोशन ठेवण्यासाठी झाकण असलेल्या काही काचेच्या बरण्या घेण्यास विसरू नका.

  • एसपीएफ तेल

तुमच्या आवडीचे तेल १ औंस घ्यावापरण्यास उत्तम तेल म्हणजे बदाम तेलपरंतु थोडे स्वस्तात बसण्यासाठी बदाम तेल आणि नारळाचे तेल समान प्रमाणात मिसळू शकता.

  • इतर तेल

तीळसूर्यफूल किंवा जोजोबा तेल १औंस तुम्ही घेऊ शकतापरंतु अधिक संवेदनशील त्वचेसाठीजोजोबा तेलाची निवड करा.

  • झिंक ऑक्साईड

नॉननॅनो आकाराच्या झिंक ऑक्साईडची निवड करा कारण ते विषारी नसते आणि त्वचेला त्रास देत नाहीतसेच सूर्याच्या हानिकारक किरणांपासूनसंरक्षण प्रदान करते.झिंक ऑक्साईड २ ते ५ दरम्यान एसपीएफ देते

  • शिया बटर

शिया बटरचे ८ औंस घ्या.

  • बीवॅक्स ग्रॅन्यूल

ह्याचे दोन चमचे सनस्क्रीन लोशनमध्ये काही जलरोधक गुणधर्म जोडतील

सनस्क्रीन घरी तयार करण्यासाठीची कृती

  • काचेच्या भांड्यात एसपीएफ तेलशिया बटरजोजोबा तेल (किंवा आपल्या आवडीच्या इतर तेलांपैकी एकआणि बी वॅक्स घ्या
  • हे काचेचे भांडे एक किंवा दोन कप उकळते पाणी असलेल्या सॉस पॅन मध्ये ठेवा
  • सर्व काही वितळेपर्यंत मिश्रण गरम कराबी वॅक्स सर्वात शेवटी वितळेलआणि ते पूर्ण वितळल्यावर सर्वकाही मिसळा
  • आपला चेहरा वैद्यकीय मास्क किंवा कशानेतरी झाकून घ्या कारण जस्त ऑक्साईडचे कण श्वासोच्छवासाद्वारे आत घेतले जातील आणि ते हानिकारक असेल
  • आवश्यकप्रमाणात ते मिसळा
  • एका गडद रंगाच्या काचेच्या बरणीमध्ये ठेवा आणि आपण ते वापरत नसताना फ्रिजमध्ये ठेवा

बाळाच्या त्वचेवर सनस्क्रीन वापरण्यासाठी टिप्स

बाळाच्या त्वचेवर घरी तयार केलेले सनस्क्रीन वापरताना येथे काही महत्त्वपूर्ण टिप्स आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजेत

  • दर काही तासांनी सनस्क्रीन पुन्हा वापरा
  • जर आपल्या मुलास खूप घाम आला असेल तर वारंवारता वाढवा
  • हे फ्रीजमध्ये साठवण्याने त्याचे शेल्फ लाइफ सहा महिन्यांपर्यंत वाढते

हे घरी तयार केलेले सनस्क्रीन वापरण्याव्यतिरिक्ततुम्ही तुमच्या बाळाच्या त्वचेवर मसाज करण्यासाठी केळीसारख्या ताज्या फळांच्या साले देखील वापरू शकता.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User