तुमचे ८ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

0 27
तुमचे ८ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

आपल्या बाळाच्या जन्माला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत आणि बाळाचे वजन किती वाढले पाहिजेत्याचे वजन किती असावे आणि सर्वसाधारणपणे त्याच्याकडून काय अपेक्षित आहे याबद्दल आपल्याला बरेच प्रश्न पडले असतीलआपल्या ८ आठवड्यांच्या बाळाबद्दल आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे.

८ आठवड्यांच्या बाळाचा विकास

आपल्या बाळामध्ये गेले दोन महिने सतत बदल होत आहे आणि बाळाचा विकास होत आहेआत्तापर्यंततुम्हाला बाळाची मनःस्थिती आणि वर्तन समजू शकले असेल आणि बाळाला खायला घालण्याचेअंघोळ घालण्याचे आणि खेळण्याचे रुटीन तयार झाले असेलस्वतःची आणि आपल्या बाळाची तुलना इतर मातांशी आणि त्यांच्या मुलांशी करू नयेआपण करत असलेल्या गोष्टींबद्दल आपल्याला स्वतःला आत्मविश्वास वाटत नसला तरीहीतुम्ही बाळाची किती चांगली काळजी घेतलेली आहे हे बाळाकडे पाहून लक्षात येईल!

बाळाला वेळेवर दूध पाजलेनीट झोप मिळाली आणि वेळेवर डायपर बदलले की बाळे शांत आणि समाधानी असते.

तुमच्या ८ आठवड्यांच्या बाळाचे वजन जन्मापासूनच ९०० ग्रॅम ते १ किलोग्रॅमच्या दरम्यान वाढले पाहिजेबाळाची लांबी देखील सुमारे ५ सेमी वाढते आणि त्याच्या गालावरपोटातहातावर आणि पायांवर काही प्रमाणात मांस दिसू लागतेआपल्या बाळाला आतापर्यंत प्राप्त झालेला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे हास्य (म्हणजे जेव्हा जेव्हा कोणी त्याच्याकडे पाहून स्मित करते तेव्हा तो परत हसतो)आणि जन्माच्या वेळेपेक्षा आता बाळ मान धरू लागले आहेआपण हे देखील लक्षात घ्याल की ८ आठवड्यांच्या बाळाची वाढ झाल्यामुळे संध्याकाळी बाळ जास्त दूध पिते आणि रात्रीचे दूध प्यायला थोडा त्रास देते.

८ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

  • तुमच्या बाळाला आता सभोवतालच्या गोष्टींविषयी कुतूहल वाटू लागेलआजूबाजूचे लोक आणि हलणाऱ्या आणि अपरिचित वस्तूंविषयी बाळाला रस आणि उत्सुकता वाटू लागते.
  • हसणे मजेदार आहे हे बाळांना समजण्यास सुरवात होतेजेव्हा तुम्ही बाळाला जवळ घेता किंवा तुमचा आवाज ऐकल्यावर किंवा आवडत्या लोकांना पाहिल्यावर बाळ हसू लागते.
  • बाळांना इतर खेळण्यांपेक्षा एखादे विशिष्ट खेळणे जास्त आवडेल आणि जेव्हा त्याला त्याचे आवडते खेळणे दिसेल तेव्हा बाळ हसू लागेल.
  • त्याची दृष्टी सुधारली आहे आणि आता त्याच्यापासून सुमारे २० सेमी अंतरावर असलेल्या वस्तू बाळ पाहू शकते.
  • बाळाला आता त्याचे हात व पाय अधिक समजू लागले आहेतम्हणून बाळाचे खूप पाय मारणे आणि हाताने तुमच्यापर्यंत पोहोचणे ह्याची अपेक्षा करासुरुवातीला त्याच्या हालचाली जरा अडकल्या सारख्या असतील परंतु आपल्या लक्षात येईल की काही वेळात त्या अधिक नियंत्रित झालेल्या आहेत.
  • ८ आठवड्यांच्या बाळाला दात येणे हे दुर्मिळ आहेपरंतु आपल्या बाळाच्या लाळेसंबंधी ग्रंथी जलद गतीने विकसित होत आहेतत्यामुळे बाळाची बरीच लाळ गळणार आहे.

८ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

दूध देणे

तुमच्या २ महिन्यांच्या बाळास अजूनही २४ तासांमध्ये किमान ६ वेळा दूध देण्याची आवश्यकता असतेया टप्प्यावरबाळाची वाढ वेगाने होत असल्यानेबाळांची पौष्टिकतेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अनेकदा संध्याकाळच्या वेळी बाळ खूप स्तनपान घेते ज्यास इंग्रजीमध्ये क्लस्टर फिडींग‘ असे म्हणतात क्लस्टर फीडिंग हे प्रथमच स्तनपान देणाया मातांना काळ्जीदायक वाटते जेणेकरुन आपल्याला पुरेसे दूध आहे की नाही याबद्दल त्यांना शंका वाटतेबाळाला दूध पुरेसे होत आहे की नाही हे सांगण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे आठवड्याला १५० ते २०० ग्रॅम्सची स्थिर वाढ आणि दररोज ६ किंवा अधिक डायपर ओले होणे हा होयतसेचजेव्हा आपल्या बाळाला पुरेसे दूध मिळेलतेव्हा तो आनंदी आणि सतर्क दिसेल.

आपण जर बाळाला बाटलीने दूध देत असाल तर बाळ एक बाटली संपवून आणखी शोधायला लागेलआपल्या डॉक्टरांशी त्याच्या वयासाठी आणि वजनासाठी आवश्यक असलेल्या दुधाच्या प्रमाणाबद्दल बोलामिश्रणात फॉर्मुल्याचे आणि पाण्याचे गुणोत्तर बदलू नये हे देखील महत्वाचे आहे – प्रमाणानुसार त्याला दूध द्या आणि जास्तीचे दूध फेकून द्या.

बाळाची झोप

तुमच्या ८ आठवड्यांच्या बाळाची झोप दिवसाचे ११ ते १५ तासांपर्यंत असेलपहिल्या काही आठवड्यांमध्ये बाळाची झोप १८ तासांची होतीया टप्प्यावर मध्यरात्री जरी बाळ जागे राहिले तरीहीबाळाने सलग ५६ तास झोपायला सुरुवात करावीकाही बाळे अधिक झोपतात आणि त्यांचे झोपेचे नियमित रुटीन असतेइतर बाळे अधिक सजग असतात आणि जेव्हा त्यांचे पालक त्यांना झोपवायचा प्रयत्न करतात तेव्हा ते झोपायला नकार देतातसर्वसाधारणपणेआपल्या ८ आठवड्यांच्या बाळाच्या झोपेच्या वेळापत्रकावर नियंत्रण नसते आणि तुम्हाला प्रतिसादाची लय त्यानुसार बदलण्याची आवश्यकता आहे.

तथापिया टप्प्यावर बाळांना त्यांच्या बिछान्यावर झोपवणे फायद्याचे आहेकारण पुढच्या महिन्यांत ते स्वत:चे स्वतः झोपण्यास शिकू शकतातनाहीतर बाळाला त्याच्या बिछान्यावर झोपवल्यास ते झोपी जाण्यासाठी पालकांवर अवलंबून राहतेआणि झोपेतून जाग आल्यावर पुन्हा झोपी जाण्याचे कौशल्य आत्मसात करू शकत नाही.

वागणूक

८ व्या आठवड्यातआपल्या बाळाच्या बर्‍याच हालचाली अजूनही सहज असतातलहान बाळांची अजूनही खेळण्यांवर घट्ट पकड नसतेपरंतु लवकरच बाळ विकासाचा तो टप्पा गाठेलबाळाची वस्तूंवरची पकड घट्ट होईलआपण काय बोलत आहात हे त्याला समजत नसले तरीही आपल्या बाळाशी वारंवार बोलणे चांगले आहेतुमच्या लक्षात येईल की बाळ लवकरच आपल्या बोलण्यावर स्मितहास्य करेल आणि वेगवेगळे आवाज काढून प्रतिक्रिया देईलसंशोधनात असे दिसून येते की बाळाची बडबड त्यांच्या सभोवतालच्या आणि विशेषतः तुमच्या बोलण्याचे अनुसरण करते

वागणूक

तुम्हाला मोठी मुले असल्यासत्यांना बाळाशी संवाद साधण्याची परवानगी द्यासाधे नाजूक खेळ आणि प्रेमळ प्रेरणा बाळाची सामाजिक कौशल्ये वाढविण्यास मदत करेलतुमच्या हे सुद्धा लक्षात येईल की आपले बाळ वेगवेगळे चेहरे ओळखू शकतेतो कदाचित चष्मा घालणार्‍या लोकांकडे जास्त वेळ पहात बसेल.

बाळाचे रडणे

तुमचे बाळ अजूनही नीट रुळलेले नाही आणि ते मधून मधून सारखे रडत असेल तर आश्चर्यचकित होऊ नकाबऱ्याच काळासाठी रडणे लहान बाळांसाठी कठीण असू शकते कारण कदाचित ते थकतात आणि त्यामुळे ते इतके रडतात की त्यांना शांत करणे कठीण होतेसकाळी किंवा दुपारी उशिरा बाळाचे रडणे खूप वाढू शकतेत्यामुळे बाळ रडणारच आहे हे ध्यानात असुद्याखबरदारी म्हणून बाळाला खाऊ घालणे व आरामदायी ठेवणे आवश्यक आहेकधीकधीपालक बरेच दिवस बाळाची अस्वस्थता पाहून मूळ कारणांबद्दल काळजी करू शकतातबऱ्याच बाळांमध्ये आढळणारी पोटशूळ ही समस्या तुमच्या बाळाला झाली आहे का अशी तुम्हाला शंका असल्यास त्याबाबत बालरोगतज्ञांशी संपर्क साधा.

८ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याविषयक टिप्स

  • या अवस्थेतील बाळ अजूनही दूध पिताना किंवा पिऊन झाल्यावर ते बाहेर काढतातकारण बाळ दुधासोबत हवासुद्धा आत घेतेत्यामुळे स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुमच्याकडे बरीच ब्लँकेट्स आहेत याची खात्री करा
  • आपल्या बाळाला बघण्यासाठी आणि हाताळण्यासाठी अनेक वस्तू द्यात्यामुळे बाळाची दृश्याविषयक आणि स्पर्शाविषयक कौशल्ये विकसित होण्यास मदत होते
  • दररोज तुमच्या बाळाला तुम्ही जवळ असताना जमिनीवर झोपवा त्यामुळे बाळाची मानखांदा आणि छातीचे स्नायू बळकट होण्यास मदत होते
  • बाळ झोपेत बऱ्याचदा पाय मारते त्यामुळे बेडशीट विस्कळीत होतेअशा परिस्थितीत बाळासाठीची स्लीपिंग बॅग चांगले काम करू शकते.
  • जर आपणास यापुढे आपल्या बाळाला बाटलीने दूध पाजायचे असल्यासस्विच करण्यासाठी आणि हळूहळू फीडिंग बॉटलची ओळख करुन देण्याची ही चांगली वेळ आहेतसेचकुटूंबातील एखादा सदस्य किंवा एखादा काळजीवाहक बाळाला बाटलीच्या सहाय्याने वारंवार दूध देऊ शकतो.

चाचण्या आणि लसीकरण

आपल्याबाळाचा वाढीचा दरवजन आणि संक्रमण तपासण्यासाठी ६ ते ८ आठवड्यांच्या कालावधीत सामान्य तपासणीची आवश्यकता असते८ आठवड्यांतआपल्या बाळाला हानीकारक जंतूपासून प्रतिबंधक लस देण्यासाठी प्रथम लसीकरण भेटीची वेळ देखील मिळेलहे पहिल्यांदा त्रासदायक ठरू शकतेम्हणून आपल्या पतीलाकुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा मैत्रिणीला सोबत घ्या.

मुलांना डिप्थीरियाटिटॅनसडांग्या खोकलापोलिओ आणि एचआयबी विषाणूपासून संरक्षण देणारी फाईव्ह इन वन लस हा प्रथम डोस दिला जातोबाळाला पहिली न्यूमोकोकल लस देखील दिली जाईलहि लस मेंदुज्वर आणि सेप्टीसीमिया होणाऱ्या जीवाणूपासून संरक्षण करतेअतिसार आणि आजारपणामुळे रोटावायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी तोंडावाटे रोटाव्हायरस लसीचे थेंब देखील दिले जातात.

खेळ आणि क्रियाकलाप

येथे काही सोपे खेळ आहेत ज्यांचा ह्या टप्प्यावर विचार केला जाऊ शकतो.

स्वेटिंग गेम

दुसऱ्या महिन्यापासूनतुमचे बाळ त्याच्या आवाक्यातल्या वस्तूंकडे झेप घ्यायला सुरुवात करेलविशेषतचमकदार आणि आकर्षक वस्तूंचा उपयोग त्याच्या हातातील डोळ्यांचा समन्वय विकसित करण्यासाठी आणि त्याच्या खांद्याचेसामर्थ्य वाढविण्यासाठी केला जाऊ शकतोतुम्हाला सिलिंग हुकतारमऊ व नाजूक सोपी खेळणीरॅटलर्स आणि कोट हॅन्गरची स्क्रूची आवश्यकता असेल.

तुमच्या पलंगावर किंवा बाळाची कॉट असलेल्या सिलिंग वर हुक लावा आणि एक मजबूत तार वापरुन सिलींगला कोट हँगर बांधाकोट हॅन्गरवर आपण हलक्या आणि चमकदार खेळण्यांचा गुच्छ लावू शकता जेणेकरून ते बाळाच्या पर्यंत पोहोचू शकतातपरंतु ही खेळणी बाळ पकडू शकेल इतकी जवळ नसावीत.

गो फिश

आपल्या बाळाचे लक्ष वेधण्यासाठी एखाद्या चमकदाररंगीबेरंगी वस्तूसारखे काहीही नाहीत्याला मासे पाहण्यासाठी मत्स्यालयाकडे नेणे हा एक चांगला व्यायाम आहे ज्यामुळे त्याची दृष्टी आणि वस्तू स्थिरतेची भावना निर्माण करतेतुम्हाला फक्त तुमच्या घरात किंवा मित्रमैत्रिणींच्या घरी मत्स्यालयाची आवश्यकता आहे ज्यात भरपूर रंगीबेरंगी मासे असतात.

बरेच मासे पाहण्यासाठी तुम्ही पाळीव प्राण्यांच्या स्टोअरला देखील भेट देऊ शकता.

गो फिश

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

खालील परिस्थितीत आपल्या बालरोग तज्ञांचा सल्ला घ्या

  • जर आपल्या लक्षात आले की बाळ फक्त थोडेच दूध पिते आहेबाळाचे डायपर कोरडे रहात आहेत आणि बाळाला वेदना होत आहेततर ते निर्जलीकरण आणि बद्धकोष्ठता असू शकतेअशा वेळी बाळाला त्वरित डॉक्टरांकडे नेले पाहिजे.
  • बाळाचे फॉन्टॅनेल्स (डोक्यावरचे मऊ भाग अद्याप जुळलेले नाहीत आणि थोडा काळ ते मऊ राहतीलजेव्हा बाळ रडत असेल तेव्हा ते किंचित फुगतात किंवा निर्जलीकरण झाल्यावर आत ओढले जातातबराच काळ ही परिस्थिती राहिल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अभिनंदन – तुम्ही तुमच्या बाळाच्या वाढीचा एक कठीण टप्पा पार केला आहेपुढे अजूनही असे रोमांचक टप्पे येणार आहेत!

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User