आणखी एक निर्बंध , निर्बंधाचे फास आवळू लागले !

0 20
आणखी एक निर्बंध , निर्बंधाचे फास आवळू लागले !

नवी दिल्ली : ओमीक्रॉन आणि कोरो नाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने एकेक निर्बंध लागू लागले असतानाच आता सरकारी कार्यालयातील उपस्थि तीतीवर मर्यादा आणण्यात आली असून पुन्हा वर्क 'फॉर्म होम' सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.कोरोना आणि ओमीक्रॉन व्हेरिएंटने आता शासन आणि प्रशासन यांची पुरती झोप उडवली असून सरकार हळूहळू का होईना पण एकेक निर्बंध लावू लागले आहे. कोरोनाचा वेग प्रचंड असल्याने केंद्र आणि राज्यशासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्या वाच लागणार आहे. तोपर्यंत खबरदारीचे सगळे उपाय शासन पातळीवर होऊ लागले आहेत. केंद्र शासन सतत निर्बंध कडक करण्या बाबत राज्यांना सूचना देत आहे, त्यातच आता केंद्र सरकारने सरकारी कार्यालयातील उपस्थितीबाबत नव्याने निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने केंद्राच्या कर्मचाऱ्या साठी नवी नियमावली जारी केली असून त्यात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची मर्यादाही घालून देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्केच असावी आणि उरलेल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' दिले जावे असे या नव्या नियमावलीत म्हटले आहे. केंद्र सरकारने आपल्या सर्व विभागांना हे निर्देश दिले आहेत. अधिकारी आणि कर्मचारी यांची गर्दी कमी करण्यासा ठी वेळापत्रक तयार करण्याच्याही सूचना सर्व विभागांना दिल्या गेल्या आहेत.

शिवाय जे कर्मचा री, अधिकारी प्रतिबंधात्मक विभागात राहात असतील त्यांना कामासाठी कार्यालयात न बोलाविण्याच्या सूचना देखील देण्या त आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावूच नका असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. गर्भवती असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीमधून सूट देण्यात आली आहे. सरकारच्या या नव्या नियमांमुळे भविष्यात निर्बंध आणखी कडक होऊन ते लॉकडाऊनपर्यंत जाण्याचे हे संकेत मिळू लागले आहेत.दरम्यान निर्बंधांच्या नियमावलीबाबत देशात सर्वत्र समानता असावी अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राज्यात सद्यातरी लॉकडाऊन हा विषय नाही आणि माध्यमांनीही जनतेच्या मनात लॉकडाऊनची भीती निर्माण करू नये असे टोपे यांनी सांगितले आहे पण दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत तर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या आधीच महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने निघाल्याचे म्हटले आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोना सुसाट सुटला असून रोज आढळणाऱ्या रुग्णात भर पडताना दिसत आहे. आकड्यांचा हा आलेख चढत्या क्रमांकाने असून दररोज बाधीत रुग्णांचे आकडे वाढत आहेत. ओमीक्रॉन रुग्णांची संख्याही वाढती असून निर्बंध कडक करण्याबाबत केंद्र शासन सतत सूचना देत आहे. सरकारी कार्यालया त पन्नास टक्के उपस्थिती आणि वर्क फ्रॉम होम हे सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हळूहळू महाराष्ट्र सरकारलाही असे निर्णय घ्यावे लागणार असल्याची शक्यता व्यक्त होत असून चोरपावलांनी का होईना पण निर्बंधाचे फास आवळताना दिसत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User