या 2 राशीचे लग्न म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा.

माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामध्ये मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये. मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

0 292
या 2 राशीचे लग्न म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा.
या 2 राशीचे लग्न म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा.

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो लग्न गाठी स्वर्गात बांधल्या जातात अस म्हणतात आणि काहींच्या जोड्या अगदी तशाच असतात एकमेकांसाठीच बनलेल्या असतात आणि त्यांच्याकडे बघून लोक सहज म्हणतात की, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे. जोतिष शास्त्रामध्ये सुद्धा राशींच्या अशा काही जोड्या सांगितल्या आहेत ज्यांना लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणता येईल. कोणत्या आहेत त्या जोड्या चला जाणून घेऊया. मित्रांनो आपल्या आजूबाजूला किंवा समाजात असे बघतो की काही नवरा बायकोंच्या जोड्या अगदी एकमेकांसाठी पूरक असतात. ज्योतिष शास्त्रात सुद्धा अशा काही जोड्यांबद्दल सांगण्यात आले आहे ज्यांची लग्न झाली तर ते एकमेकांसाठी पूरक सिध्द होतात. मग तुम्ही लग्न करण्याच्या विचारात असाल तर इ माहिती तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल आणि जर तुमचे लग्न झाले असेल तर तुम्हाला सुद्धा पडताळून पाहता येईल की, तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांसाठी किती पूरक आहात. चला तर बघुया की, तुमचा जोडा लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे की नाही. पहिल्या राशीची जोडी आहे ती म्हणजे तुळ आणि सिंह राशीची – या व्यक्तीचं उदाहरण म्हणजे दोघांचाही स्वभाव थोडासा सारखा असतो. ते मनमिळाऊ असतात. लोकांना भेटणं मनमोकळेपणाने बोलणं हा या दोघांचाही छंद असतो. त्यांना स्वतः ला मनमोकळेपणाने राहायला आवडते आणि त्याचमुळे या दोन राशींचे लग्न झाले तर ते लग्न दीर्घकाळ टिकू शकते म्हणून यांना लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणता येईल. दुसरी राशीची जोडी आहे ती म्हणजे मेष आणि कुंभ राशीची – या दोन्ही राशींची लोक एकमेकांचे जीवनसाथी झाले तर ते बहुतांशी उत्तम निर्णय घेऊ शकतात. या दोघांमध्येही प्रेम आणि रोमान्स खचून भरलेला असतो. अर्थात ही दोघही सृजनात्मक असतात. ते स्वतःचे छंद जोपासतात आणि नेहमीच आपल्या जोडीदाराला स्पेस देणं पसंत करतात.

मेष आणि कर्क राशी – मेष राशीचे लोक नेहमी बहादुर निडर असतात आणि कर्क राशीचे लोक उर्जावान असतात. हे जोडीदाराला देखील उर्जावान ठेवतात. त्यामुळे या दोघांची जोडी उत्तम जोडी मानली जाते.
मेष राशी आणि मीन राशी – मेष आणि मीन राशीच्या लोकांचे आपापसात अगदी स्नेहाचे संबंध बनतात. एकमेकांसोबत हे नेहमी कर्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ असतात. मेष राशी ही अग्नी तत्वाची राशी असल्यामुळे स्वभावाने थोडी तापट असते.परंतु त्यांचं लग्न जलतत्वाच्या मेष राशीच्या शांत स्वभाच्या व्यक्तीशी झाल्यास अस लग्न दीर्घकाळ टिकू शकते. आपल्याकडे एक म्हण आहे की, संसारात एकाने आग झालं तर दुसऱ्याने पानी व्हायचं असते. वृषभ राशी आणि कर्क राशी – या राशीचे दोघंही एकमेकांना समान आदर देणारे असतात. ते एकमेकांची भरपूर प्रशंसा देखील करतात. वृषभ आणि कर्क यांच्यात उत्तम ताळमेळ असतो. कर्क राशीची लोक ही खऱ्या मनाची असतात आणि वृषभ राशीची लोक दुसऱ्याला मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. दोघंही कुटुंबाचं महत्व जाणून असतात आणि मग ही दोघं एकमेकांसाठी उत्तम जोडीदार सिद्ध होतात.वृषभ राशीचे आणखी एका राशीसोबत चांगले पटते आणि ती राशी म्हणजे. मकर राशी – या राशीची लोक एकमेकांसोबत प्रेमाने आणि समजुतीने वागतात. वृषभ राशी असणारे नेहमी मकर राशीच्या लोकांच्या कामाची आणि प्रसन्न चिंता असण्याची नेहमी प्रशंसा करतात. तर मकर राशीचे लोक वृषभ राशीच्या लोकांच्या उदारतेला, समजदरीला पसंत करतात. मेष आणि धनु राशी – धनु राशीचे लोक नेहमी आपल्याच मनाचे ऐकतात. कुठल्याही प्रकारचा बनावटीपणा यापासून ते दूर राहतात. हास्य विनोद करायला त्यांना आवडते. तसेच मेष राशीची लोकही सामाजिक दृष्ट्या सक्रिय असतात आणि वास्तवात जगणं त्यांनाही जास्त आवडतं. आता बघुया स्पष्ट बोलणाऱ्या सिंह राशीच कोणाशी पटते – धनु राशीच्या लोकांशी यांचं चांगलं पटते. सिंह राशीची लोक स्वभावाने थोडी जिद्दी असतात. पण धनु राशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो. त्यामुळे हे दोघं प्रत्येक समस्येचे समाधान काढण्यात यशस्वी होतात. यानंतरची जोडी आहे कन्या आणि मकर राशी – कन्या राशीचे लोक काळजी करणारे असतात ज्याने त्यांचा स्वभाव अंतर्मुख होऊन जातो. पण कन्या राशीची लोक जेव्हा बोलतात तेव्हा खूप मनमोकळी बोलतात आणि त्यांचा हाच स्वभाव मकर राशीच्या लोकांना आकर्षित करतो. यानंतरची जोडी आहे वृश्चिक आणि कर्क राशी – दोन्ही जल तत्वाच्या राशी आहेत. या राशींचे लोक संवेदनशील असतात. एकमेकांना समजून घेण्याचा चांगला प्रयत्न करतात. कुंभ आणि मिथुन राशी – दोन्ही वायू तत्वाच्या राशी आहेत. या राशीची लोक जीवनातील प्रत्येक चढ उतार मध्ये एकमेकांची साथ देतात. मिथुन राशीचे लोक चांगल्या गोष्टींची प्रशंसा करतात. तर कुंभ राशींचे लोक सुद्धा प्रत्येक समस्येवर शांततेने तोडगा काढतात. तर मित्रांनो या होत्या त्या राशींच्या जोड्या ज्यांचं लग्न झालं तर त्यांना लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणता येईल.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामध्ये मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User